जागृत महाराष्ट्र न्यूज ई-पेपर
सांस्कृतिक

तुळसमध्ये ८ ते १५ नोव्हेंबरदरम्यान ‘दीपावली शो टाईम २०२६’चे आयोजन!

दादा सारंग • 06 November 2026, 12:27 PM

वेंगुर्ला प्रतिनिधी✍️: श्री. यशवंत बाळू परब मित्र मंडळ आणि आरसीसी देऊळवाडा, तुळस यांच्या संयुक्त विद्यमाने तुळस गावातील कला आणि संस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी ‘दीपावली शो टाईम २०२६’ या भव्य सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. ८ ते १५ नोव्हेंबर या कालावधीत जयतीर मंदिर, तुळस येथे विविध सांस्कृतिक, सामाजिक आणि मनोरंजनात्मक कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे.




रविवार ८ नोव्हेंबर रोजी सकाळी १० ते दुपारी १२ या वेळेत गावमर्यादित रांगोळी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. सायंकाळी ६.३० वाजता दीपोत्सव होणार असून, रात्री १० वाजता गावमर्यादित व्हॉलीबॉल स्पर्धेला सुरुवात होणार आहे.




शुक्रवार १३ नोव्हेंबर रोजी सकाळी १० ते दुपारी ३ या वेळेत तुळस गावातील ग्रामस्थांसाठी मोफत नेत्रतपासणी शिबिर आयोजित करण्यात आले आहे. रात्री ७ वाजता कार्यक्रमाचे उद्घाटन होईल. त्यानंतर रात्री ८ वाजता तुळस गावातील शाळा आणि ग्रामस्थांचे सांस्कृतिक कार्यक्रम सादर होतील. यावेळी जिल्हास्तरीय आणि गावमर्यादित वेशभूषा स्पर्धाही आयोजित करण्यात आली आहे.




शनिवार १४ नोव्हेंबर रोजी रात्री ७ वाजता उद्घाटनानंतर हेरंब दशावतार नाट्य मंडळाचा भव्य पौराणिक दशावतारी नाट्यप्रयोग सादर होणार आहे.




रविवार १५ नोव्हेंबर रोजी रात्री ७ वाजता कार्यक्रमाचे उद्घाटन होणार असून, यावेळी मोफत चष्मा वाटप आणि बक्षीस वितरण समारंभ आयोजित करण्यात आला आहे. रात्री १० वाजता डबलबारी भजनाचा जंगी सामना रंगणार आहे.




करमणूक, सामाजिक उपक्रम आणि कोकणच्या समृद्ध लोककलेचा सुंदर संगम असलेल्या या महोत्सवात हास्य, संगीत आणि विविध रंगांची उधळण अनुभवता येणार आहे. तुळस गावातील नागरिकांसह परिसरातील रसिकांनी आपल्या कुटुंबीयांसह उपस्थित राहून या महोत्सवाचा आनंद घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.




अधिक माहितीसाठी संपर्क :




- गौरेश तुळसकर – ७७३८७९०५०२

- दीपेश परब – ८४११०९८८७२

- प्रथमेश परब – ८९९९६५०३७६

- रमेश कबरे – ९३७०१५२७६९




स्थळ : जैतीर मंदिर, तुळस.

मूळ वेबसाईटवर सविस्तर वाचा (View Full Web Version)