जागृत महाराष्ट्र न्यूज ई-पेपर
सांस्कृतिक

तेंडोलीच्या श्री अनलादेवीचा जत्रोत्सव २६ नोव्हेंबरला

दादा सारंग • 25 November 2026, 08:27 AM

कुडाळ प्रतिनिधी✍️ : कुडाळ तालुक्यातील तेंडोली-भोमवाडी येथील प्रसिद्ध श्री देवी अनलादेवीचा वार्षिक जत्रोत्सव गुरुवार, २६ नोव्हेंबर रोजी भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात येणार आहे. या जत्रोत्सवानिमित्त विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.




जत्रोत्सवाच्या दिवशी सकाळपासून देवीची ओटी भरण्याचा कार्यक्रम होणार आहे. रात्री ९.३० वाजता पुराणवाचन, १० वाजता श्री देवीचा पालखी सोहळा पार पडणार आहे. त्यानंतर मध्यरात्री १२ वाजता मामा मोचेमाडकर दशावतार मंडळाचा दशावतारी नाट्यप्रयोग सादर होणार आहे.




या वार्षिक जत्रोत्सवासाठी भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून श्री देवी अनलादेवीचे दर्शन आणि धार्मिक कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन अनलादेवी ग्रामस्थ मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

मूळ वेबसाईटवर सविस्तर वाचा (View Full Web Version)