जागृत महाराष्ट्र न्यूज ई-पेपर
सांस्कृतिक

श्री.गजानन महाराज पळसेवाडी मठ कुडाळ येथे नवरात्र उत्सव साजरा होणार

दादा सारंग • 11 October 2026, 10:23 AM

श्री.गजानन महाराज पळसेवाडी कुडाळ येथे प्रतिवर्षीप्रमाणे दिनांक ११/१०/२२६ ते १९/१०/२०२६ रोजी यादरम्यान श्री गजानन महाराज मठात नवरात्र उत्सव साजरा होत आहे तरी या निमित्ताने कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे दिनांक ११/१०/२०२६ रोजी रविवारी देवी मातेची संध्याकाळी ठीक सात वाजता विधिवत प्राणप्रतिष्ठापना होणार आहे. दिनांक १२/१०/२०२६ व १३/१०/२०२६ रोजी सोमवार आणि मंगळवार संध्याकाळी सात वाजता आमंत्रित भजनाचा कार्यक्रम होणार दिनांक १४/१०/२०२६ रोजी बुधवार संध्याकाळी चार वाजता श्री सत्यविनायक महापूजा संपन्न होणार व नंतर संध्याकाळी सात वाजता आमंत्रित भजनाचा कार्यक्रम होणार आहे.गुरुवार दिनांक १५/१०/२०२६ रोजी सकाळी नऊ वाजता श्रींची मंदिर परिसरात पालखी प्रदक्षिणा होणार दुपारी एक वाजता आरती महाप्रसाद व संध्याकाळी चार वाजता श्री सत्यविनायक महापूजा संपन्न होणार आणि रात्रो ठीक सात वाजता भजनाचा कार्यक्रम होणार आहे.शुक्रवार दिनांक १६/१०/२०२६ रोजी सकाळच्या सत्रात श्री नवचंडी अनुष्ठान संपन्न होणार आहे.दुपारी ठीक एक वाजता महाआरती आणि महाप्रसाद संध्याकाळी ठीक सात वाजता आमंत्रित भजनाचा कार्यक्रम होणार आहे. शनिवार दिनांक १७/१०/२०२६ रोजी संध्याकाळी सात वाजता आमंत्रित भजनाचा कार्यक्रम होणार आहे.रविवार दिनांक १८/१०/२०२६ रोजी संध्याकाळी ठीक सात वाजता आमंत्रित भजनाचा कार्यक्रम होणार आहे.सोमवार दिनांक १९/१०/२०२६ रोजी दुपारी आरती महाप्रसाद संध्याकाळी चार वाजता स्थानिक भजन मंडळाचा कार्यक्रम होणार आहे आणि संध्याकाळी ठीक सहा वाजता श्रीदेवी मातेच्या विसर्जनाचा सोहळा सुरू होणार तरी भक्त मंडळींनी, सर्वांनी या कार्यक्रमाला सहपरिवार उपस्थित राहून आमचा आनंद द्विगुणीत करावा व स्वामींचे कृपाशीर्वाद घ्यावेत असे यावेळी श्री. गजानन महाराज पळसेवाडी बिबवणे भक्त परिवारा कडून आमंत्रण देण्यात येत आहे.

मूळ वेबसाईटवर सविस्तर वाचा (View Full Web Version)