जागृत महाराष्ट्र न्यूज ई-पेपर
सामाजिक

संविधान दिनानिमित्त वेंगुर्ल्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या व्यक्तिरेखेवर आधारित वेशभूषा स्पर्धा

दादा सारंग • 25 November 2026, 05:53 PM

वेंगुर्ला प्रतिनिधी✍️ : संविधान दिनाचे औचित्य साधून आधार फाऊंडेशन, सिंधुदुर्ग यांच्या वतीने महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनकार्यावर आधारित वेशभूषा स्पर्धेचे आयोजन गुरुवार, २६ नोव्हेंबर रोजी करण्यात आले आहे. श्रीराम समर्थ व किरण ट्रेडर्स यांच्या सहकार्याने, तर वेंगुर्ला गॅस सर्व्हिस यांच्या प्रायोजकत्वाखाली ही स्पर्धा दुपारी ३ ते सायंकाळी ६ या वेळेत नगरवाचनालय, वेंगुर्ला येथे होणार आहे.


या स्पर्धेत पहिली ते चौथी, पाचवी ते सातवी, आठवी ते दहावी आणि खुला गट अशा चार गटांचा समावेश करण्यात आला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार, त्यांचे महान कार्य आणि सामाजिक योगदान नव्या पिढीपर्यंत पोहोचावे, तसेच विद्यार्थ्यांमध्ये संविधानाबद्दल जागरूकता निर्माण व्हावी, हा या उपक्रमामागील उद्देश आहे.


स्पर्धेतील सर्व विजेत्या स्पर्धकांना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावरील पुस्तके बक्षीस म्हणून देण्यात येणार आहेत. तसेच सहभागी होणाऱ्या सर्व स्पर्धकांना आयोजकांतर्फे सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.


वेंगुर्ला तालुक्यातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी आणि इच्छुक स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन आधार फाऊंडेशनच्या अध्यक्षा माधुरी वेंगुर्लेकर, उपाध्यक्ष किरण वेंगुर्लेकर, सचिव ॲड. नंदन वेंगुर्लेकर आणि खजिनदार डॉ. वंदन वेंगुर्लेकर यांनी केले आहे.


स्पर्धेसाठी नावनोंदणी व अधिक माहितीसाठी डॉ. वंदन वेंगुर्लेकर (९९७०८८२०२३), ॲड. नंदन वेंगुर्लेकर (९४२२४३४३५६), किरण वेंगुर्लेकर (९३२११५२००७) आणि माधुरी वेंगुर्लेकर (९८२३६०४३५६) यांच्याशी संपर्क साधावा.

मूळ वेबसाईटवर सविस्तर वाचा (View Full Web Version)