जागृत महाराष्ट्र न्यूज ई-पेपर
सांस्कृतिक

सावंतवाडीत ७ नोव्हेंबरला भव्य नरकासुर स्पर्धा

दादा सारंग • 27 October 2026, 05:18 AM

सावंतवाडी प्रतिनिधी✍️: दीपावलीच्या पारंपरिक उत्साहाला अधिक रंगत आणण्यासाठी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा, सावंतवाडी विधानसभा क्षेत्राच्या वतीने शनिवारी, ७ नोव्हेंबर २०२६ रोजी भव्य नरकासुर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा मोती तलाव येथे अमोल आईस्क्रीमसमोरील कॉर्नरवर होणार आहे.




या स्पर्धेच्या माध्यमातून स्थानिक कलाकारांच्या कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याबरोबरच दीपावलीच्या पारंपरिक संस्कृतीचे आणि उत्सवाच्या परंपरेचे जतन करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.




या उपक्रमाला भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, युवा मोर्चाचे पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांचे सहकार्य लाभणार आहे.




युवकांनी निरोगी जीवनशैलीचा अंगीकार करावा, क्रीडा क्षेत्रात आपल्या कौशल्याची आणि क्षमतेची ओळख निर्माण करावी तसेच दीपावलीचा सण उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करावा, या उद्देशाने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.




या स्पर्धेत नागरिक, क्रीडाप्रेमी आणि युवकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा, सावंतवाडी विधानसभा क्षेत्राच्या वतीने करण्यात आले आहे.

मूळ वेबसाईटवर सविस्तर वाचा (View Full Web Version)