जागृत महाराष्ट्र न्यूज ई-पेपर
सांस्कृतिक

सातोसे येथे १५ नोव्हेंबरला भव्य अभंग गायन स्पर्धेचे आयोजन!

दादा सारंग • 11 November 2026, 06:52 AM

सावंतवाडी प्रतिनिधी✍️ : दिवाळीच्या शुभमुहूर्तावर सांस्कृतिक आणि आध्यात्मिक परंपरेचा वारसा जपण्याच्या उद्देशाने श्री देव ब्राह्मण मंडळ,सातोसे (दुर्गवाडी) यांच्या वतीने सातोसे गाव मर्यादित भव्य अभंग गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

रविवार,दिनांक १५ नोव्हेंबर २०२६ रोजी सायंकाळी ठीक ४.०० वाजता सातोसे (दुर्गवाडी) येथे ही स्पर्धा उत्साहपूर्ण आणि भक्तिमय वातावरणात पार पडणार आहे.

अभंग,भक्तिगीते आणि संत साहित्याच्या माध्यमातून समाजामध्ये भक्तिभाव, अध्यात्मिक विचार आणि सांस्कृतिक जाणीव वृद्धिंगत व्हावी,तसेच स्थानिक कलाकारांना आपल्या गायनकलेचे सादरीकरण करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध व्हावे,हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश आहे.

महाराष्ट्राच्या संतपरंपरेचा अमूल्य ठेवा असलेल्या अभंग गायनातून भक्तिरसाची अनुभूती देणारा हा सोहळा संगीतप्रेमींसाठी विशेष पर्वणी ठरणार आहे.या कार्यक्रमाला ग्रामस्थ,संगीतप्रेमी आणि भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून स्पर्धकांचा उत्साह वाढवावा व या भक्तिमय सोहळ्याचा आनंद घ्यावा,असे नम्र आवाहन श्री देव ब्राह्मण मंडळ,सातोसे (दुर्गवाडी) यांच्या वतीने करण्यात आले आहे.

मूळ वेबसाईटवर सविस्तर वाचा (View Full Web Version)