जागृत महाराष्ट्र न्यूज ई-पेपर
सांस्कृतिक

सोनुर्लीच्या श्रीदेवी माऊलीच्या चरणी विशाल परब नतमस्तक

दादा सारंग • 25 November 2026, 05:40 PM

सावंतवाडी प्रतिनिधी✍️ : दक्षिण कोकणचे प्रति पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोनुर्ली येथील श्रीदेवी माऊलीच्या भव्य जत्रोत्सवानिमित्त भाजपाचे राज्य युवा नेते विशालभाई परब यांनी देवीचे मनोभावे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी माऊलीच्या चरणी नतमस्तक होत सर्वांच्या सुख, समृद्धी आणि उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना केली. तसेच सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचा सर्वांगीण विकास घडावा, अशी मनोकामनाही व्यक्त केली.




श्रीदेवी माऊलीच्या दर्शनावेळी मंदिर परिसरात भक्तिमय वातावरण होते. विशाल परब यांनी श्रद्धापूर्वक देवीचे दर्शन घेत आशीर्वाद घेतले. यावेळी माजी मंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांची त्यांची भेट झाली. या भेटीदरम्यान विशाल परब यांनी केसरकर यांना सस्नेह नमस्कार केला. त्यांच्या या संस्कारशील आणि स्नेहपूर्ण कृतीने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.




देवीच्या चरणी श्रद्धा आणि मनात भक्तिभाव ठेवत सर्वांच्या कल्याणासाठी प्रार्थना करणाऱ्या विशाल परब यांच्या उपस्थितीची जत्रोत्सव परिसरात चर्चा होती. श्रीदेवी माऊलीचा आशीर्वाद सर्वांवर सदैव राहो, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

मूळ वेबसाईटवर सविस्तर वाचा (View Full Web Version)