जागृत महाराष्ट्र न्यूज ई-पेपर
प्रशासन

रायगड जिल्हा नियोजन समितीची बैठक संपन्न

दादा सारंग • 20 October 2026, 12:57 PM

रायगड प्रतिनिधी✍️ रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री भरत गोगावले यांच्या अध्यक्षतेखाली व ज्येष्ठ नेते तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय खा. सुनिल तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज जिल्हा नियोजन समितीची बैठक संपन्न झाली. या बैठकीच्या माध्यमातून जिल्ह्यातील विविध विकासकामांचा आढावा अदिती तटकरे यांनी घेतला. लोकप्रतिनिधींच्या पाठपुराव्यातून विकासकामांसाठी मिळालेल्या निधीचा विहित कालमर्यादेत सदुपयोग व्हावा असे निर्देश या बैठकीच्या माध्यमातून संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर रस्ते, पाणीपुरवठा, आरोग्य व शिक्षण सुविधांना प्राधान्य द्यावे, तसेच शेतकरी, महिला सक्षमीकरण आणि कुपोषण निर्मूलनावर भर द्यावा असेही निर्देश देण्यात आले. विकासकामांची गुणवत्ता, पारदर्शकता व नियमित पाहणी सुनिश्चित करावी अशा सूचना सर्व विभागांना देण्यात आल्या.

यावेळी खासदार श्रीरंग बारणे आमदार अनिकेत तटकरे आमदार महेंद्र दळवी आमदार रवींद्र पाटील आमदार महेंद्र थोरवे जिल्हा परिषद अध्यक्ष मंगेश वाकडीकर जिल्हा परिषद उपाध्यक्ष मधुकर पाटील जिल्हाधिकारी किशन जावळे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती नेहा भोसले जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीमती आँचल दलाल पनवेल महानगरपालिका आयुक्त मंगेश चितळे जिल्हा नियोजन अधिकारी उमेश सूर्यवंशी तसेच निवासी उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के यांच्यासह इतर मान्यवर आदी उपस्थित होते.

मूळ वेबसाईटवर सविस्तर वाचा (View Full Web Version)