जागृत महाराष्ट्र न्यूज ई-पेपर
सामाजिक

महिलांच्या स्वावलंबनासाठी लघुउद्योग मार्गदर्शन शिबिर

दादा सारंग • 02 November 2026, 08:18 AM

मुंबई प्रतिनिधी✍️ : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शाखा क्रमांक २च्या वतीने महिलांच्या स्वावलंबनाला चालना देण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका बचत गटांतर्गत आयोजित करण्यात आलेल्या ‘अंत्योदय योजना – लघु उद्योग मार्गदर्शन शिबिरा’चे यशस्वीरीत्या आयोजन करण्यात आले. शिबिर पूर्ण केलेल्या महिलांना यावेळी प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.




महिलांनी स्वतःच्या पायावर उभे राहून लघुउद्योगाच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावे, तसेच स्वावलंबनाचा नवा मार्ग निर्माण करावा, हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश होता. लघुउद्योग सुरू करण्यासाठी आवश्यक मार्गदर्शन आणि माहिती महिलांना या शिबिराच्या माध्यमातून देण्यात आली.




या कार्यक्रमाला महिला विभाग संघटिका सौ. शुभदा शिंदे, युवासेना कार्यकारिणी सदस्या धनश्री कोलगे, शाखाप्रमुख उत्तम परब आणि महिला शाखा संघटिका सौ. दीपाली आवारी यांची प्रमुख उपस्थिती होती.




महिला सक्षमीकरण हे केवळ संकल्पनेपुरते मर्यादित न राहता प्रत्यक्ष कृतीतून साकारले पाहिजे, या उद्देशाने महिलांच्या स्वावलंबनासाठी आणि प्रगतीसाठी विविध उपक्रम राबविण्यात येत असल्याचे यावेळी सांगण्यात आले. भविष्यातही महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी असे उपक्रम सातत्याने सुरू ठेवण्यात येणार असल्याचे आयोजकांकडून स्पष्ट करण्यात आले.

मूळ वेबसाईटवर सविस्तर वाचा (View Full Web Version)