जागृत महाराष्ट्र न्यूज ई-पेपर
सांस्कृतिक

कोकणच्या संस्कृती, परंपरा आणि खाद्यवैभवाचे जोगेश्वरीत दर्शन!

दादा सारंग • 21 November 2026, 01:33 PM

मुंबई प्रतिनिधी✍️ : जोगेश्वरी सिटीझन फाउंडेशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भव्य कोकण महोत्सवाला जोगेश्वरी (पूर्व) विधानसभा मतदारसंघाचे आमदार अनंत (बाळा) नर यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी महोत्सवाच्या माध्यमातून कोकणच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचे, पारंपरिक लोककलांचे आणि अस्सल कोकणी खाद्यसंस्कृतीचे दर्शन घडले.




कोकणची माती, तेथील संस्कृती, परंपरा आणि खाद्यवैभव यांचा परिचय नव्या पिढीला करून देण्याच्या दृष्टीने अशा महोत्सवांचे महत्त्व मोठे आहे. आपल्या मूळ गावाशी आणि कोकणच्या संस्कृतीशी असलेली नाळ जपण्याचे काम या उपक्रमातून होत आहे. कोकणातील माणसांचे प्रेम, आपुलकी आणि सांस्कृतिक परंपरा यांचा सुंदर मिलाफ या महोत्सवात अनुभवायला मिळत असल्याचे आमदार अनंत (बाळा) नर यांनी यावेळी सांगितले.




अशा सांस्कृतिक उपक्रमांमुळे कोकणची स्वतंत्र ओळख अधिक दृढ होण्यास मदत होते. तसेच कोकणचा समृद्ध वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याचे महत्त्वपूर्ण कार्यही घडते. या सुंदर महोत्सवाचे आयोजन केल्याबद्दल जोगेश्वरी सिटीझन फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी, आयोजक आणि कार्यकर्त्यांचे त्यांनी अभिनंदन केले तसेच पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.




यावेळी नगरसेवक कैलासनाथ पाठक, शाखाप्रमुख नंदकुमार ताम्हणकर, शाखा समन्वयक उदय हेगिष्टे, कार्यालयप्रमुख अविनाश रासम तसेच विविध उपशाखांचे पदाधिकारी आणि गटप्रमुख उपस्थित होते.

मूळ वेबसाईटवर सविस्तर वाचा (View Full Web Version)