जागृत महाराष्ट्र न्यूज ई-पेपर
प्रशासन

झोपडपट्टीधारकांच्या पुनर्वसनाबाबत महत्त्वपूर्ण संयुक्त बैठक पार पडली

दादा सारंग • 14 October 2026, 01:07 PM

आज मंत्रालयात, मा. गृहराज्यमंत्री श्री. योगेशजी कदम, महसूल विभाग, पोलीस प्रशासन, मुंबई महानगरपालिका, वन विभाग आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांची संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील वन विभागाच्या जागेवरील झोपडपट्टीधारकांच्या पुनर्वसनाबाबत महत्त्वपूर्ण संयुक्त बैठक पार पडली.

या बैठकीत, वन विभागाच्या कारवाईमुळे त्रस्त असलेल्या क्रांती नगर, सावित्रीबाई फुले नगर, आप्पा पाडा, कुरार व्हिलेज, कालिमाता नगर, आंबेडकर नगर, आदिवासी नगर व पिंपरी पाडा परिसरातील रहिवाशांच्या पुनर्वसनाचा प्रलंबित प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावण्यासाठी सविस्तर चर्चा करण्यात आली. 

या बैठकीसाठी महसूल विभाग, पोलीस प्रशासन, मुंबई महानगरपालिका, वन विभाग व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे संबंधित वरिष्ठ अधिकारी तसेच शिवसेनेचे विभागप्रमुख श्री. वैभव भरडकर, माजी नगरसेवक व विधानसभा संघटक श्री. आत्माराम चाचे, विधानसभा संघटक श्री. अरुण सुर्वे व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

मूळ वेबसाईटवर सविस्तर वाचा (View Full Web Version)