मुंबई प्रतिनिधी✍️: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षांशी संबंधित प्रकरणांबाबत माहिती असलेल्या परीक्षार्थी, विद्यार्थी, अन्य व्यक्ती तसेच संबंधित नोंदणीकृत संस्थांनी आपली निवेदने आणि उपलब्ध कागदपत्रे १६ नोव्हेंबरपर्यंत चौकशी आयोगाकडे सादर करावीत, असे आवाहन चौकशी आयोगाचे सदस्य सचिव तुकाराम मुंढे यांनी केले आहे.
या प्रकरणांशी संबंधित माहिती किंवा पुरावे असलेल्या व्यक्तींनी आपल्या निवेदनासोबत संबंधित कागदपत्रांची एक प्रत चौकशी आयोगाच्या complaints.inquirycomm.mpsc@maharashtra.gov.in या ई-मेल पत्त्यावरही पाठवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान, एमपीएससी परीक्षांशी संबंधित तक्रारी अथवा निवेदन दाखल करण्याबाबत आवश्यक माहिती तसेच मार्गदर्शनासाठी चौकशी आयोगाच्या कार्यालयाचा ०२२-२०८६७६७७ हा दूरध्वनी क्रमांक उपलब्ध करून देण्यात आला आहे.
संबंधित परीक्षार्थी, विद्यार्थी, व्यक्ती आणि नोंदणीकृत संस्थांनी आपल्याकडील माहिती व कागदपत्रे निर्धारित मुदतीत आयोगाकडे सादर करावीत, असे आवाहन करण्यात आले आहे.