जागृत महाराष्ट्र न्यूज ई-पेपर
प्रशासन

डोंबिवली पूर्व विभागाचा पाणीपुरवठा ३ नोव्हेंबरला १६ तास बंद

दादा सारंग • 31 October 2026, 06:41 AM

डोंबिवली प्रतिनिधी✍️ : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या डोंबिवली पूर्व विभागातील पाणीपुरवठा मंगळवार, ३ नोव्हेंबर रोजी १६ तासांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. नेतीवली येथील १५० दशलक्ष लिटर क्षमतेच्या जलशुद्धीकरण केंद्रातून डोंबिवली पूर्व विभागाला पाणीपुरवठा करणाऱ्या ११०० मिमी व्यासाच्या मुख्य जलवाहिनीला गळती लागली आहे. ही गळती थांबविण्यासाठी दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार आहे.




परिवहन डेपोच्या बाजूला सुरू असलेल्या या गळती दुरुस्तीच्या कामासाठी मंगळवारी सकाळी ८ ते रात्री १२ वाजेपर्यंत डोंबिवली जलशुद्धीकरण केंद्रातून होणारा पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे. त्यामुळे या कालावधीत डोंबिवली पूर्व विभागातील नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.




या पार्श्वभूमीवर संबंधित परिसरातील नागरिकांनी पाणीपुरवठा बंद राहण्याच्या कालावधीचा विचार करून आवश्यक तेवढाच पाणीसाठा करून ठेवावा आणि दुरुस्तीच्या कामासाठी महानगरपालिका प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे कार्यकारी अभियंता शैलेश मळेकर यांनी केले आहे.

मूळ वेबसाईटवर सविस्तर वाचा (View Full Web Version)