जागृत महाराष्ट्र न्यूज ई-पेपर
प्रशासन

भाजी मार्केटच्या नूतन इमारतीचे लोकार्पण संपन्न

दादा सारंग • 17 October 2026, 10:32 AM

रत्नागिरी लोकप्रतिनिधी✍️ नगरपरिषदेच्या माध्यमातून वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत उभारण्यात आलेल्या नगरपरिषद हद्दीतील जुन्या भाजी मार्केटच्या ‘श्री नवलाई देवी भाजी मंडईच्या’ नूतन इमारतीचा लोकार्पण सोहळा मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते उत्साहात पार पडला.

या कामासाठी १ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. विरेंद्र कन्स्ट्रक्शन यांच्या माध्यमातून या इमारतीचे बांधकाम उत्तम प्रकारे पूर्ण करण्यात आले आहे. या इमारतीमध्ये स्टिल्ट फ्लोअर, तळमजला आणि पहिला मजला अशा स्वरूपाचे बांधकाम करण्यात आले असून, आधुनिक सोयी-सुविधांनी सुसज्ज असलेल्या या नवीन भाजी मार्केटचा लाभ संबंधित गाळेधारकांसह रत्नागिरीकरांनाही मिळणार आहे. यामुळे विक्रेत्यांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध होतील, तसेच नागरिकांनाही खरेदीसाठी स्वच्छ, नीटनेटकी आणि सुविधाजनक जागा मिळेल.

या उत्कृष्ट वास्तूची उभारणी केल्याबद्दल विरेंद्र कन्स्ट्रक्शन यांचे मनःपूर्वक कौतुक करतो. तसेच हा सुंदर आणि नीटनेटका कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल रत्नागिरी नगरपरिषदेतील सर्व सहकारी आणि कर्मचारी यांचेही सामंत यांनी मनःपूर्वक अभिनंदन केले.यावेळी विनय खेडेकर,सायली पाटील, विकास पाटील,शिल्पाताई सुर्वे, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अभिजीत दुडे, श्रीमती शमिका मयेकर, समीर तिवरेकर, सतीश मोरे,सुचिता वायकर,वैभव गारवे, सुवर्णा वायगणकर, पूर्वा चव्हाण, प्रिती सुर्वे, वैभवी खेडकर, मनुज जिंदल आदी मान्यवर उपस्थित होते.रत्नागिरीच्या विकासाला गती देताना नागरिकांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देणे, हाच आमचा संकल्प आहे. शहराच्या प्रगतीसाठी आणि नागरिकांच्या सोयीसाठी असेच विकासाभिमुख उपक्रम सातत्याने राबवले जातील.

मूळ वेबसाईटवर सविस्तर वाचा (View Full Web Version)