जागृत महाराष्ट्र न्यूज ई-पेपर
सांस्कृतिक

आमदार प्रमोद जठार यांनी घेतले कणकवली बाजारपेठेच्या आई भवानीचे दर्शन

दादा सारंग • 14 October 2026, 02:24 PM

कणकवली प्रतिनिधी ✍️:नवरात्रोत्सवानिमित्त कणकवली बाजारपेठ मित्रमंडळाच्या वतीने प्रतिष्ठापना करण्यात आलेल्या आई भवानीचे आमदार प्रमोद जठार यांनी सहकुटुंब दर्शन घेत विधिवत पूजा-अर्चा केली. यावेळी त्यांच्या पत्नी गिरिजाताई जठार उपस्थित होत्या.दर्शनानंतर नगराध्यक्ष संदेश पारकर यांच्या हस्ते शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन आमदार जठार यांचा सन्मान करण्यात आला.

यावेळी भैरी भवानी प्रतिष्ठानचे अध्यक्ष अतुल रावराणे, कन्हैया पारकर, प्रसाद अंधारी, नगरसेवक लुकेश कांबळे, नीलम पालव, सौरभ पारकर, समृद्धी पारकर, अमेय पारकर, वैभव मालडकर, अमित मयेकर, बाबू बांदिवडेकर, तेजस नार्वेकर, सर्वेश शिरसाठ, तन्मय नार्वेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

मूळ वेबसाईटवर सविस्तर वाचा (View Full Web Version)