जागृत महाराष्ट्र न्यूज ई-पेपर
प्रशासन

आमदार निलेश राणे यांनी मतदारसंघात प्रत्यक्ष शेताच्या बांधावर जाऊन केली पाहणी

दादा सारंग • 30 September 2026, 12:38 PM

पावसाच्या प्रदीर्घ खंडामुळे शेतीपिकांवर झालेल्या परिणामाची गंभीर दखल घेत आमदार निलेश राणे यांनी मतदारसंघातील विविध भागांत प्रत्यक्ष शेताच्या बांधावर जाऊन पाहणी केली. केवळ कागदोपत्री नुकसानीचा आढावा न घेता त्यांनी शेतकऱ्यांशी थेट संवाद साधत त्यांच्या अडचणी, पिकांची स्थिती आणि झालेल्या नुकसानीची माहिती जाणून घेतली.

पिकांची प्रत्यक्ष पाहणी करून नुकसानीची परिस्थिती समजून घेताना आमदार राणे यांनी शेतकऱ्यांच्या समस्या प्रशासनाच्या निदर्शनास आणून देण्याबाबत पुढाकार घेतला. संकटाच्या काळात शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचून त्यांची व्यथा जाणून घेण्याच्या या भूमिकेमुळे शेतकरी वर्गात सकारात्मक भावना व्यक्त होत आहे.


यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, जिल्हा परिषद बांधकाम सभापती संतोष साठविलकर, पंचायत समिती सभापती प्रज्ञा चव्हाण, जिल्हा परिषद सदस्या सुमेधा पाताडे, मालवण तहसीलदार गणेश लव्हे, गटविकास अधिकारी परागिनी पाटील, राजा गावडे, मंदार लुडबे यांच्यासह संबंधित अधिकारी आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मूळ वेबसाईटवर सविस्तर वाचा (View Full Web Version)