जागृत महाराष्ट्र न्यूज ई-पेपर
सांस्कृतिक

आई सोनुर्ली माऊलीच्या चरणी २५ नोव्हेंबरला भक्तीचा महासोहळा

दादा सारंग • 25 October 2026, 10:33 AM

सिंधुदुर्ग प्रतिनिधी✍️ कोकणातील प्रति पंढरपूर म्हणून श्रद्धेने ओळखल्या जाणाऱ्या सोनुली येथील श्री देवी माऊलीचा अलौकिक लोटांगणाचा जत्रोत्सव यंदा बुधवार, २५ नोव्हेंबर रोजी भक्तिमय वातावरणात साजरा होत आहे.

नवसाला पावणारी जागृत देवता म्हणून श्री देवी माऊलीवर हजारो भाविकांची अढळ श्रद्धा आहे. मनोकामना पूर्ण झाल्यानंतर देवीच्या चरणी लोटांगण घालून नवस फेडण्याची ही अनोखी परंपरा आजही मोठ्या भक्तिभावाने जपली जाते.

देवीच्या जयघोषाने दुमदुमणारे वातावरण, भक्तीने भारावलेले भाविक आणि परंपरेचा जागर... असा हा सोनुलीचा लोटांगण जत्रोत्सव! या जत्रोत्सवास सिंधुदुर्गासह गोवा, मुंबई, पुणे, कोल्हापूर अशा विविध भागांतून भक्त भाविक मोठया संख्येने येत असतात.तसेच प्रशासनाकडून एसटी बस,व अनुचित प्रकार घडू नये यासाठी काही अंतरावर व मंदीर परिसरात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला असतो.तसेच विविध प्रकारचे दुकाने या जत्रोत्सवास आवर्जुन येत असल्याने आणि लाईट रोषणाईने उजळून निघालेला परीसर खूप प्रसन्न होऊन भक्तीमय वातावरणात आई माऊलीच्या दर्शनाने जीवनात सुख, समाधान आणि समृद्धी नांदो, हीच चरणी प्रार्थना! करुन भक्त भाविक गण आनंदात सहभागी झालेले दिसून येतात.

मूळ वेबसाईटवर सविस्तर वाचा (View Full Web Version)