जागृत महाराष्ट्र न्यूज ई-पेपर
प्रशासन

आडेलीत २३ जणांनी केले रक्तदान

दादा सारंग • 15 October 2026, 07:35 PM

वेंगुर्ला तालुक्यात सेवा संकल्प अभियान अंतर्गत आयुष्यमान आरोग्य मंदिर आडेली आणि शिवस्वराज्य मित्रमंडळ आडेली यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान आयोजित करण्यात आले होते शिबीरात 23 रक्तदात्यानी अत्यंत मोलाचे आणि निस्वार्थी रक्तदान करून योगदान दिले. रक्तदान हाच खरा धर्म हा आदर्श ठेवला.

सदर शिबिराचे उदघाटन पंचायत समिती सदस्य नितीन मांजरेकर यांच्या हस्ते करण्यात आले.

आडेली सरपंच सौ यशस्वी कोंडसकर उपस्थित होते.सदरच्या शिबिरात विष्णू कोंडसकर आडेली आरोग्य मंदिर वैद्यकीय अधिकारी डॉ अश्विनी माईणकर आरोग्य सहायक औषध निर्माण अधिकारी आरोग्य सेवक समुदाय आरोग्य अधिकारी कनिष्ठ सहायक मंदार धर्णे या सर्वांनी रक्तदान करून समाजाफुढे एक रक्तदान सर्वश्रेष्ठ दान हा आदर्श ठेवलेला आहे.

मूळ वेबसाईटवर सविस्तर वाचा (View Full Web Version)