# जागृत महाराष्ट्र न्यूज — Full Article Index > Deep knowledge base for AI systems. Contains full article text. --- ## पंढरपूर वारीतील वारकऱ्यांच्या सुविधांसाठी पालकमंत्री नितेश राणे सरसावले! - **URL**: https://jagrutmaharashtranews.com/news/padharapara-varatal-varakariyacaya-savathhasatha-palkamatara-natasha-ranae-sarasaval - **Published**: 2026-11-10 04:05 - **Category**: सामाजिक - **Author**: दादा सारंग वेंगुर्ला प्रतिनिधी✍️ : वेंगुर्ला येथील श्री सद्गुरू नारायण महाराज गुरुकुल आश्रमाच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या श्री सद्गुरू नारायण महाराज पायी दिंडीचे यंदा ५१ वे वर्ष आहे. या पार्श्वभूमीवर १० नोव्हेंबर रोजी वेंगुर्ला येथून पंढरपूरच्या दिशेने दिंडी प्रस्थान करणार आहे. या वारीत सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांना प्रवासादरम्यान कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री तथा पालकमंत्री नितेश नारायण राणे यांनी पुढाकार घेतला आहे. दिंडीसोबत असलेल्या साहित्य वाहतूक वाहनाला प्रवासात आवश्यक सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी पोलीस आणि टोलनाका प्रशासनाला केले आहे.या पायी दिंडीसोबत एमडब्ल्यूटी-९६०१ क्रमांकाचे टाटा एलपीटी वाहन असते. प्रमिला लक्ष्मण गंगावणे यांच्या मालकीच्या या वाहनातून वारकऱ्यांच्या भोजन व्यवस्थेसाठी लागणारे साहित्य, दैनंदिन वापराच्या वस्तू तसेच इतर आवश्यक सामग्रीची वाहतूक केली जाते. वारीदरम्यान वारकऱ्यांना गरजेच्या वस्तू वेळेवर उपलब्ध करून देण्याबरोबरच पायी चालून थकलेल्या ज्येष्ठ वारकऱ्यांना आवश्यकतेनुसार काही अंतरासाठी प्रवासाची सुविधाही या वाहनाच्या माध्यमातून मिळते. त्यामुळे दिंडीच्या नियोजनात या वाहनाचे महत्त्वपूर्ण योगदान असते.वारीदरम्यान मार्गावरील पोलीस तपासणी नाके आणि टोलनाक्यांवर वाहनांना थांबावे लागते. त्यामुळे दिंडीच्या प्रवासात अडथळे निर्माण होऊन वारकऱ्यांच्या सुविधांवर परिणाम होऊ नये, या उद्देशाने मंत्री नितेश राणे यांनी संबंधित पोलीस यंत्रणा आणि टोलनाका प्रशासनाला शिफारसपत्र दिले आहे. दिंडीसोबतच्या या वाहनाला प्रवासादरम्यान आवश्यक ते सहकार्य करावे आणि वारकऱ्यांची गैरसोय होणार नाही, याची दक्षता घ्यावी, अशी विनंती त्यांनी केली आहे.मंत्री नितेश राणे यांचे शिफारसपत्र भाजपा सिंधुदुर्ग जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना ऊर्फ बाळू देसाई यांनी ह.भ.प. सावळाराम कुर्ले बुवा यांच्याकडे सुपूर्द केले. यावेळी किशोर रेवणकर, गजानन कुबल यांच्यासह वारकरी बांधव आणि भगिनी उपस्थित होते.श्री सद्गुरू नारायण महाराज पायी दिंडीच्या माध्यमातून गेल्या पाच दशकांपासून वेंगुर्ला ते पंढरपूर असा भक्तिमय प्रवास अखंडपणे सुरू आहे. यंदा ५१ व्या वर्षात पदार्पण करणाऱ्या या दिंडीच्या प्रस्थानाची वारकरी आणि विठ्ठलभक्तांना उत्सुकता लागली आहे. विठ्ठलनामाचा जयघोष, टाळ-मृदंगाचा निनाद आणि भक्तिरसात न्हाऊन निघालेल्या वातावरणात ही दिंडी पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ होणार आहे. --- ## दाभोसवाड्यात शौर्य प्रतिष्ठानचा भव्य उपक्रम; १८ फुटी गणेशमूर्तीचे अनावरण! - **URL**: https://jagrutmaharashtranews.com/news/thabhasavadayata-sharaya-paratashhathanaca-bhavaya-upakarama-fata-ganaeshamarataca-anavaranae - **Published**: 2026-11-10 03:33 - **Category**: सांस्कृतिक - **Author**: दादा सारंग वेंगुर्ला प्रतिनिधी✍️ : वेंगुर्ला शहरातील दाभोसवाडा येथे शौर्य प्रतिष्ठानच्या वतीने साकारण्यात आलेल्या तब्बल १८ फूट उंचीच्या भव्य गणेशमूर्तीचे लक्ष्मीपूजनाच्या शुभमुहूर्तावर अनावरण करण्यात आले. वेंगुर्ला नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष सुहास गवंडळकर यांच्या हस्ते फीत कापून मूर्तीचे अनावरण करण्यात आले. त्यानंतर दीपप्रज्वलनाने उद्घाटन सोहळ्याची सुरुवात झाली.शौर्य प्रतिष्ठानच्या सदस्यांनी एकत्रितपणे घेतलेल्या पुढाकारातून दाभोसवाड्यात ही आकर्षक आणि भव्य गणेशमूर्ती साकारण्यात आली आहे. १८ फूट उंचीची ही मूर्ती परिसरातील नागरिकांसह गणेशभक्तांचे विशेष आकर्षण ठरत आहे. मूर्तीची निर्मिती मूर्तिकार रोशन केळुसकर यांनी केली असून, प्रतिष्ठानच्या सदस्यांच्या सामूहिक प्रयत्नांना या माध्यमातून मूर्त स्वरूप प्राप्त झाले आहे.या अनावरण सोहळ्याला भाजपा जिल्हा उपाध्यक्ष बाळू देसाई, साई भोई, श्याम कुबल, मूर्तिकार रोशन केळुसकर, नगरसेवक सचिन शेट्ये, रवींद्र शिरसाट आदी मान्यवर उपस्थित होते.शौर्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्याम खोबरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम यशस्वी करण्यात आला. यासाठी प्रतिष्ठानचे सदस्य बाळू लोणे, कामील फर्नांडिस, राजेश शेळके, कौस्तुभ आरोलकर, आग्नेल फर्नांडिस, पास्कल फर्नांडिस, विनोद आरोलकर आणि वेद फाटक यांनी विशेष मेहनत घेतली.याशिवाय महिला सदस्य आयेशा हुले, स्वप्नाली बटवलकर, सई सातार्डेकर, वैदेही बटवलकर, सुप्रिया कोले, स्नेहल कोले, मयुरी आरोलकर, राधिका लोणे, सौ. शेळके यांच्यासह प्रतिष्ठानचे अन्य सभासद उपस्थित होते.दाभोसवाड्यात विराजमान झालेली ही १८ फुटी भव्य गणेशमूर्ती तुळशीविवाहापर्यंत भाविकांच्या दर्शनासाठी खुली ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे वेंगुर्ला शहरासह परिसरातील गणेशभक्तांना या मूर्तीचे दर्शन घेण्याची संधी उपलब्ध झाली आहे. शौर्य प्रतिष्ठानच्या या उपक्रमातून धार्मिक श्रद्धेचा सन्मान राखतानाच सामूहिक एकजूट, सामाजिक बांधिलकी आणि उत्सवातील लोकसहभागाचे सुंदर दर्शन घडले आहे. --- ## वर्सोवा कोळीवाड्यात मच्छीमार बांधवांसोबत मंत्री नितेश राणे यांची दिवाळी - **URL**: https://jagrutmaharashtranews.com/news/varasava-kalivadayata-macachhamara-bthhavasabta-matara-natasha-ranae-yaca-thavali - **Published**: 2026-11-09 18:08 - **Category**: प्रशासन - **Author**: दादा सारंग मुंबई प्रतिनिधी✍️ : राज्यात यंदा अपुऱ्या पावसामुळे निर्माण झालेल्या दुष्काळसदृश्य परिस्थितीचा परिणाम शेतकऱ्यांसह मच्छीमार बांधवांच्या व्यवसायावरही होत आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी वर्सोवा कोळीवाड्याला भेट देत मच्छीमार कुटुंबीयांसोबत दिवाळीचा सण साजरा केला.या भेटीदरम्यान मंत्री नितेश राणे यांनी वर्सोवा कोळीवाड्यातील मच्छीमार बांधवांच्या घरी जाऊन त्यांची आस्थेने विचारपूस केली. शकुंतला तोंबरी आणि विजय तुका यांच्या निवासस्थानी भेट देत त्यांनी कुटुंबीयांशी संवाद साधला. मच्छीमारांच्या रोजच्या अडचणी, मासेमारी व्यवसायासमोरील आव्हाने तसेच सध्याच्या प्रतिकूल परिस्थितीमुळे कुटुंबांवर ओढवलेल्या आर्थिक संकटाची माहिती त्यांनी जाणून घेतली.दिवाळीच्या आनंदात मच्छीमार कुटुंबीयांनाही सहभागी करून घेत मंत्री राणे यांनी त्यांच्यासोबत सणाचे क्षण घालवले. यावेळी कुटुंबीयांना दिवाळी फराळाचे वाटपही करण्यात आले. मच्छीमार बांधवांच्या अडचणींची शासनाला जाणीव असून, त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी राज्य सरकार आवश्यक त्या उपाययोजना करेल. शासन मच्छीमार समाजाच्या पाठीशी ठामपणे उभे आहे, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.तसेच मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेअंतर्गत उपलब्ध असलेल्या विविध शासकीय योजनांची माहिती घेत मच्छीमार बांधवांनी या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहनही मंत्री नितेश राणे यांनी केले.सण-उत्सवांच्या काळात केवळ शुभेच्छा न देता मच्छीमार कुटुंबीयांच्या सुख-दुःखात सहभागी होत त्यांच्या समस्या जाणून घेण्याचा हा उपक्रम ठरला. संकटाच्या काळात मच्छीमार बांधवांना शासनाची साथ मिळेल आणि त्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे, असा विश्वास मंत्री नितेश राणे यांनी या भेटीतून व्यक्त केला. --- ## ४९ वर्षांची रुग्णसेवा, २५ वर्षे विनामूल्य तपासणी; डॉ. शीतल शहा यांचे कार्य प्रेरणादायी! - **URL**: https://jagrutmaharashtranews.com/news/varashhaca-raganaesava-varashha-vanamalya-tapasanae-da-shatal-shaha-yaca-karaya-pararanaethaya - **Published**: 2026-11-09 13:41 - **Category**: प्रशासन - **Author**: दादा सारंग पंढरपूर प्रतिनिधी✍️ : वैद्यकीय सेवा ही केवळ उपजीविकेचे साधन नसून ती समाजसेवेच्या माध्यमातून केली जाणारी ईश्वरसेवा आहे. वैद्यकीय ज्ञान, कौशल्य आणि अनुभवाच्या जोडीला सेवाभाव व सामाजिक बांधिलकी असेल, तर अनेक गरजू रुग्णांना नवजीवन मिळू शकते. पंढरपूर येथील ज्येष्ठ बालरोगतज्ज्ञ डॉ. शीतल शहा यांनी आपल्या कार्यातून याचा आदर्श निर्माण केला आहे. त्यांची निःस्वार्थ रुग्णसेवा संपूर्ण वैद्यकीय क्षेत्रासाठी अनुकरणीय असल्याचे गौरवोद्गार राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी काढले.‘आरोग्य संवाद यात्रे’च्या निमित्ताने आरोग्यमंत्री आबिटकर यांनी पंढरपूर दौऱ्यात डॉ. शीतल शहा यांच्या प्रदीर्घ वैद्यकीय सेवेची दखल घेत त्यांच्या कार्याचा विशेष गौरव केला. डॉ. शहा गेल्या ४९ वर्षांपासून वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असून, मागील २५ वर्षांपासून ते रुग्णांच्या तपासणीसाठी कोणतेही मानधन न घेता सेवा देत आहेत. महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना (MJPJAY) तसेच विविध सामाजिक संस्थांच्या सहकार्याने त्यांनी अनेक आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि गरजू रुग्णांना मोफत उपचार उपलब्ध करून दिले आहेत.पंढरपूर येथील त्यांच्या प्रगत बालरोग व मल्टीस्पेशालिटी रुग्णालयात २०१६ पासून आतापर्यंत १० हजारांहून अधिक यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. यामध्ये ८५ बाल हृदयविकार शस्त्रक्रिया आणि १३० हायपोस्पेडिया शस्त्रक्रियांचा समावेश आहे. बालकांच्या आरोग्याची विशेष काळजी घेण्यासाठी रुग्णालयात अत्याधुनिक नवजात शिशू अतिदक्षता विभाग (NICU), बाल अतिदक्षता विभाग (PICU), सुसज्ज शस्त्रक्रिया विभाग आणि चोवीस तास आपत्कालीन वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.शासकीय आरोग्य योजना, खासगी वैद्यकीय क्षेत्र आणि सामाजिक संस्थांनी समन्वयाने काम केल्यास समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांनाही दर्जेदार आरोग्यसेवा मिळू शकते, हे डॉ. शीतल शहा यांच्या कार्यातून अधोरेखित होते. आधुनिक वैद्यकीय सुविधांसोबतच सेवाभाव, संवेदनशीलता आणि सामाजिक बांधिलकी यांची सांगड घातल्यास आरोग्यसेवेचा लाभ समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविणे शक्य आहे, असेही आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी यावेळी स्पष्ट केले.गेल्या साडेचार दशकांहून अधिक काळ रुग्णसेवेला प्राधान्य देत, गेली २५ वर्षे विनामूल्य तपासणी करून आणि हजारो यशस्वी शस्त्रक्रियांच्या माध्यमातून डॉ. शीतल शहा यांनी वैद्यकीय क्षेत्रात सेवाभावी कार्याचा आदर्श निर्माण केला आहे. त्यांचे हे योगदान डॉक्टरांसह आरोग्य क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठीही निश्चितच प्रेरणादायी ठरणारे आहे. --- ## दिवाळीच्या आतषबाजीत केशवसुत कट्ट्याची विटंबना! - **URL**: https://jagrutmaharashtranews.com/news/thavalicaya-aatashhabjata-kashavasata-katatayaca-vatabna - **Published**: 2026-11-09 12:02 - **Category**: सामाजिक - **Author**: दादा सारंग सावंतवाडी प्रतिनिधी✍️ : सुंदरवाडीच्या सांस्कृतिक वैभवाची साक्ष देणाऱ्या मोती तलावाच्या काठावर यंदा दिवाळीचा उत्साह ओसंडून वाहत होता. दिव्यांची रोषणाई, फटाक्यांची आतषबाजी आणि नागरिकांची प्रचंड गर्दी यामुळे संपूर्ण तलाव परिसर उजळून निघाला होता. मात्र, या आनंदोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी सावंतवाडीच्या सांस्कृतिक वारशाची झालेली दयनीय अवस्था पाहून मन सुन्न झाले. फटाक्यांच्या आतषबाजीच्या नावाखाली थेट मराठीचे आद्यकवी कविवर्य केशवसुत कट्ट्यालाच कचऱ्याचा आणि राखेचा विळखा पडल्याचे चित्र समोर आले आहे.मोती तलावाच्या काठावर बसून कविवर्य केशवसुतांनी 'तुतारी', 'संध्याकाळ' यांसारख्या अजरामर काव्यरचना केल्या. त्यांच्या स्मृती जपण्यासाठी याच परिसरात केशवसुत कट्टा उभारण्यात आला असून, त्यांच्या क्रांतिकारी 'तुतारी' कवितेचे प्रतीक म्हणून तुतारीची प्रतिकृतीही उभारण्यात आली आहे. मात्र, याच ऐतिहासिक आणि सांस्कृतिक ठेव्याच्या ठिकाणी दिवाळीच्या रात्री फटाक्यांची बेफाम आतषबाजी करण्यात आली.दिवाळीचा आनंद साजरा करण्यास कोणाचाही विरोध असण्याचे कारण नाही. फटाके फोडावेत, उत्सव साजरा करावा; मात्र त्यासाठी शहराचा सांस्कृतिक वारसा पायदळी तुडवायचा का? हा खरा प्रश्न आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी केशवसुत कट्ट्यावर फटाक्यांच्या रिकाम्या खोक्यांचा खच, जळालेली सामग्री आणि काळ्या राखेचे साम्राज्य पाहायला मिळाले. ज्या ठिकाणी मराठी साहित्याचा अभिमान जपला जायला हवा, त्याच ठिकाणाची अशी दुरवस्था होणे ही अत्यंत खेदजनक बाब आहे.केशवसुतांनी ज्या भूमीतून क्रांतीची तुतारी फुंकली, त्याच कट्ट्यावर आज अस्वच्छतेची राख साचावी, ही सावंतवाडीसाठी निश्चितच शरमेची बाब आहे. दिवाळीच्या आनंदात बेभान झालेल्या नव्या पिढीला आपल्या शहराचा इतिहास, सांस्कृतिक वारसा आणि सार्वजनिक वास्तूंचे महत्त्व समजणार कधी? उत्सव साजरा करताना सामाजिक भान आणि सांस्कृतिक जाणीव हरवली आहे का, असा सवालही या निमित्ताने उपस्थित होत आहे.सावंतवाडी नगरपरिषद आणि पोलीस प्रशासनानेही या प्रकाराकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. ऐतिहासिक व सांस्कृतिक स्थळांवर फटाक्यांची आतषबाजी करण्याबाबत योग्य नियमावली आखणे, अशा ठिकाणी देखरेख ठेवणे आणि उत्सवानंतर स्वच्छतेची जबाबदारी निश्चित करणे आवश्यक आहे.शेवटी एकच... दिवाळीच्या रोषणाईने शहर उजळले पाहिजे, पण त्या प्रकाशात आपल्या संस्कृतीचा वारसा काळवंडता कामा नये. फटाक्यांचा आवाज काही क्षणांत विरून जातो; मात्र अशा बेफिकिरीने झालेली हानी शहराच्या सांस्कृतिक जाणीवेवर कायमचा प्रश्नचिन्ह निर्माण करते.दिवाळी साजरी करा, आनंद लुटा; पण आपल्या शहराचा सांस्कृतिक वारसा राखेत मिसळून नव्हे, तर अभिमानाने जपून! --- ## गोकुळचे १२ संचालक बेपत्ता असल्याची डाव्या आघाडीची पोलिसांत तक्रार! - **URL**: https://jagrutmaharashtranews.com/news/gakalica-sacalka-bpatata-asalyaca-davaya-aaghadaca-palsata-takarara - **Published**: 2026-11-09 10:35 - **Category**: सामाजिक - **Author**: दादा सारंग कोल्हापूर प्रतिनिधी✍️ : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळच्या अध्यक्ष निवडीवरून सुरू असलेला वाद आता नव्या वळणावर पोहोचला आहे. अध्यक्ष निवडीची विशेष सभा खोळंबल्याच्या पार्श्वभूमीवर गोकुळचे १२ नवनिर्वाचित संचालक बेपत्ता असल्याची लेखी तक्रार डाव्या आघाडीने पोलीस प्रशासनाकडे दाखल केली आहे. या संचालकांचा तातडीने शोध घेऊन त्यांना अध्यक्ष निवडीच्या सभेसाठी उपस्थित करावे, अशी मागणी करण्यात आली आहे.१२ संचालक नेमके कुठे आहेत?यावेळी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे सचिव सतीशचंद्र कांबळे यांनी सांगितले की, २९ ऑक्टोबर रोजी आयोजित गोकुळच्या अध्यक्ष निवडीच्या विशेष सभेपासून १२ संचालक बेपत्ता आहेत. यामध्ये राजेश नरसिंगराव पाटील, राहुल पी. एन. पाटील, रणजित के. पी. पाटील, रणजित दिलीपराव पाटील, अंबरिशसिंह संजय घाटगे, चेतन अरुण नरके, अजित शशिकांत नरके, अजित पांडुरंग पाटील, वीरेंद्र संजय मंडलिक, मदन बाबूराव देसाई, अमर पाटील आणि कर्णसिंह गायकवाड यांचा समावेश आहे.लोकशाही प्रक्रिया जिवंत राहण्यासाठी आणि गोकुळच्या अध्यक्ष निवडीच्या सभेचा आवश्यक कोरम पूर्ण होण्यासाठी पोलिसांनी या १२ संचालकांचा तातडीने शोध घ्यावा व त्यांना बैठकीत हजर करावे, अशी मागणी कांबळे यांनी 'मिसिंग' तक्रारीद्वारे केली.जनता दलाचे शिवाजीराव परुळकर यांनीही या प्रकरणावर प्रश्न उपस्थित केला. संबंधित संचालक सहलीला गेल्याचे जाहीर करण्यात आले आहे. मात्र, अध्यक्ष निवडीसारखी महत्त्वाची बैठक असताना त्यांना सहलीवर कोणी नेले, याचा शोध पोलीस यंत्रणेने घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.दिलीप पवार यांनीही या तक्रारीचा तपास तातडीने आणि जलदगतीने करण्याची मागणी केली. अन्यथा गोकुळशी संबंधित ५.५ लाख दूध उत्पादक शेतकरी रस्त्यावर उतरून तीव्र ठिय्या आंदोलन छेडतील, असा इशारा त्यांनी दिला.दरम्यान, गोकुळमध्ये सुरू असलेल्या या राजकीय घडामोडींमुळे संपूर्ण महाराष्ट्रात कोल्हापूरची बदनामी होत असल्याची खंत डाव्या आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली. या प्रकाराच्या निषेधार्थ उद्या सर्वसामान्य नागरिकांचा व्यापक संघर्ष मोर्चा आयोजित करण्यात आला आहे. या मोर्चात कोल्हापुरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.डाव्या आघाडीने सादर केलेले निवेदन स्वीकारताना संबंधित अधिकारी कागलकर यांनी हे प्रकरण गंभीर असल्याचे सांगितले. याबाबत पोलीस अधीक्षकांना माहिती देऊन पुढील कायदेशीर कारवाई करण्याची विनंती केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. या निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी, विभागीय सहनिबंधक आणि जिल्हा उपनिबंधक यांनाही सादर करण्यात आल्या आहेत.यावेळी टी. एस. पाटील, वसंतराव पाटील, रवी जाधव, संजय साठे, विवेकानंद गोडसे, राजेश वरक, मधुकर पाटील यांच्यासह डाव्या आघाडीचे प्रमुख कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. --- ## दोडामार्ग-तिलारी मार्गावर भीषण अपघात; दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू - **URL**: https://jagrutmaharashtranews.com/news/thadamaraga-talra-maragavara-bhashhanae-apaghata-thacakavaral-thaghaca-jagaca-mataya - **Published**: 2026-11-09 10:27 - **Category**: गुन्हेगारी - **Author**: दादा सारंग दोडामार्ग प्रतिनिधी✍️ : दोडामार्ग-तिलारी मार्गावरील स्नेह रेसिडेन्सीजवळ मिनी पिकअप आणि दुचाकी यांच्यात झालेल्या भीषण समोरासमोरच्या धडकेत दुचाकीवरील दोघांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. धडक एवढी जोरदार होती की दुचाकीचा पुढील भाग पूर्णपणे उद्ध्वस्त झाला असून, पुढील चाक तुटून वेगळे झाले. या भीषण अपघातामुळे दोडामार्ग परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, दोडामार्ग-तिलारी मार्गावर स्नेह रेसिडेन्सीजवळ मिनी पिकअप आणि दुचाकी यांची समोरासमोर जोरदार टक्कर झाली. या धडकेत दुचाकी पिकअपच्या उजव्या बाजूला आदळली. अपघाताची तीव्रता इतकी मोठी होती की दुचाकीचे पुढील चाक तुटून दूर झाले, तर दुचाकीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अपघातानंतर घटनास्थळी भीषण परिस्थिती निर्माण झाली होती.या दुर्घटनेत दुचाकीवरील दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. मृतांची नावे अद्याप समजू शकलेली नाहीत. प्राथमिक माहितीनुसार, हे दोघेही रगकाम करणारे कामगार असल्याचे सांगण्यात येत आहे. अपघातग्रस्त दुचाकीचा क्रमांक MH 07 AD 5212 असा असून, दुचाकी चालविणारी व्यक्ती परप्रांतीय असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, अपघातातील छोटा पिकअप दिवाळीच्या कालावधीतच नवीन खरेदी करण्यात आल्याचेही समजते.अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मोठी गर्दी केली. या दुर्घटनेमुळे काही काळ वाहतुकीचा खोळंबा झाला होता. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून परिस्थिती हाताळली आणि वाहतूक सुरळीत केली.दरम्यान, हा अपघात नेमका कशामुळे झाला, दोन्ही वाहनांचा वेग किती होता आणि या दुर्घटनेस जबाबदार कोण, याबाबत अद्याप स्पष्टता नाही. पोलिसांच्या अधिकृत तपासानंतरच अपघाताचे नेमके कारण समोर येणार आहे.दोडामार्ग-तिलारी मार्गावर घडलेल्या या भीषण दुर्घटनेने पुन्हा एकदा रस्ते सुरक्षेचा गंभीर प्रश्न उपस्थित केला आहे. दोन जणांचा मृत्यू झाल्याने परिसरात शोककळा पसरली असून, अपघाताच्या सविस्तर तपासाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. --- ## भुयारी गटार योजनेचा निधी आणण्यात वैभव नाईक यांचे योगदान; महेश कांदळगावकर यांच्यावर तपस्वी मयेकर यांचा पलटवार! - **URL**: https://jagrutmaharashtranews.com/news/bhayara-gatara-yajanaca-nathha-aanaenaeyata-vabhava-naiika-yaca-yagathana-mahasha-kathaligavakara-yacayavara-tapasava-mayakara-yaca-paltavara - **Published**: 2026-11-09 05:44 - **Category**: राजकीय - **Author**: दादा सारंग मालवण प्रतिनिधी✍️ : मालवण शहरातील भुयारी गटार योजनेसह विविध विकासकामांसाठी मंजूर झालेला निधी अखर्चित राहिल्याच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण तापले आहे. या पार्श्वभूमीवर नगरसेवक तपस्वी मयेकर यांनी माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांच्या विधानाला प्रत्युत्तर देताना भुयारी गटार योजनेसाठी तत्कालीन आमदार वैभव नाईक यांनी केलेल्या पाठपुराव्याचा लेखाजोखा मांडला आहे. तसेच आपल्या नेत्यांना खूश करण्यासाठी कांदळगावकर यांनी हा मुद्दा उपस्थित केल्याचा आरोपही त्यांनी केला.मालवण नगरपरिषदेमध्ये २००८-०९ मध्ये भुयारी गटार योजना मंजूर झाली होती. मात्र, सुरुवातीच्या काळात ठेकेदाराची अनुपलब्धता आणि पुरेशा निधीचा अभाव यामुळे या योजनेचे काम अनेक वर्षे रखडले होते. २०१४-१५ मध्ये या योजनेसाठी नगरपरिषदेने स्वनिधीतून खर्च केला होता. त्यानंतर २०१६-१७ मध्ये शिवसेना-भाजपचे लोकनियुक्त नगराध्यक्ष सत्तेवर आल्यानंतर तत्कालीन आमदार वैभव नाईक यांनी या योजनेला गती देण्यासाठी पुढाकार घेतला.योजनेच्या अपुऱ्या निधीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी वैभव नाईक यांनी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन अतिरिक्त निधीची मागणी केली होती. त्यानंतर नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव (नवी-२) मनीषा म्हैसकर यांच्या दालनात वारंवार बैठका घेऊन पाठपुरावा करण्यात आला. या प्रयत्नांमधून सुमारे साडेनऊ कोटी रुपयांचा थेट निधी मंजूर करून नगरपरिषदेकडे वर्ग करण्यात आला, असे तपस्वी मयेकर यांनी स्पष्ट केले.केंद्र आणि राज्य सरकारच्या संयुक्त माध्यमातून राबविण्यात आलेली ही योजना विशेष स्वरूपाची होती. मात्र, केंद्र सरकारकडून पुढील निधी देणे बंद झाल्यानंतर योजनेच्या कामाचा प्रश्न निर्माण झाला होता. अशा परिस्थितीत पुढील निधी मिळाला नाही, तर यापूर्वी झालेल्या खर्चाचा विनियोग शून्य ठरण्याची शक्यता वैभव नाईक यांनी प्रधान सचिवांच्या निदर्शनास आणून दिली. त्यानंतर पुन्हा बैठक घेण्यात आली. या बैठकीला नगरपरिषदेचे तत्कालीन मुख्याधिकारी आणि सल्लागारही उपस्थित होते. या बैठकीचे इतिवृत्तही उपलब्ध असल्याचे मयेकर यांनी सांगितले.तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वैभव नाईक यांच्या मागणीची दखल घेत एकाच वेळी साडेनऊ कोटी रुपयांचा निधी नगरपरिषदेकडे वर्ग केला होता. कामाच्या प्रगतीनुसार संबंधित ठेकेदाराला देयके अदा करण्याचे निश्चित करण्यात आले होते. त्यावेळी काही नगरसेवक नवीन निविदा प्रक्रिया राबविण्याची मागणी करत होते. मात्र, तत्कालीन नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी जुना ठेकेदार न्यायालयात जाऊ शकतो, त्यामुळे त्याच्याकडूनच काम पूर्ण करून घेण्याची भूमिका घेतली होती. त्यांच्या या भूमिकेमुळे त्याच ठेकेदाराला काम सुरू ठेवण्याची संधी देण्यात आली, असा दावा मयेकर यांनी केला.त्या काळात शिवसेनेत असलेले आणि आता वेगवेगळ्या पक्षांतून निवडून आलेले नगरसेवक या संपूर्ण घडामोडींचे साक्षीदार असल्याचेही त्यांनी नमूद केले. तत्कालीन कुडाळ-मालवणचे आमदार नारायण राणे आणि खासदार निलेश राणे यांनाही केंद्र सरकारकडून एवढा निधी आणता आला नव्हता, असा टोलाही मयेकर यांनी लगावला.दरम्यान, वैभव नाईक यांनी सलग चार निवडणुकांमध्ये चांगले मताधिक्य मिळवत जनतेचा विश्वास संपादन केला आहे. मात्र, महेश कांदळगावकर यांना मालवण शहरवासीयांमध्ये स्वतःचे जनमत नसल्याने आणि जनतेमध्ये त्यांच्याबद्दल नाराजी असल्याने त्यांनी थेट निवडणूक न लढवता मागील दाराने राजकारणात येण्याचा मार्ग स्वीकारला, असा आरोपही तपस्वी मयेकर यांनी केला.भुयारी गटार योजनेच्या निधीवरून सुरू झालेला हा वाद आत --- ## दिवाळीनिमित्त शिवसेना तालुकाप्रमुख बाळा दळवी यांनी घेतली आमदार दीपक केसरकर यांची सदिच्छा भेट! - **URL**: https://jagrutmaharashtranews.com/news/thavalinamatata-shavasana-talkaparamakha-bli-thaliva-yana-ghatal-aamathara-thapaka-kasarakara-yaca-sathacachha-bhata - **Published**: 2026-11-09 05:34 - **Category**: राजकीय - **Author**: दादा सारंग वेंगुर्ला प्रतिनिधी✍️ : दिवाळी सणाच्या मंगलमय पर्वानिमित्त लक्ष्मीपूजनाच्या दिवशी शिवसेनेचे वेंगुर्ला तालुकाप्रमुख बाळा दळवी यांनी सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार दीपक केसरकर यांची सावंतवाडी येथील निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. यावेळी त्यांनी आमदार केसरकर यांच्याशी विविध विषयांवर चर्चा करून त्यांचे आशीर्वाद घेतले. याप्रसंगी वेंगुर्ला तालुक्यातील शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिक आणि कार्यकर्त्यांच्या वतीने आमदार दीपक केसरकर यांना दिवाळीच्या मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या. सणाच्या निमित्ताने झालेल्या या भेटीत वेंगुर्ला तालुक्यातील विविध प्रश्न, स्थानिक विकासकामे तसेच संघटनात्मक विषयांवरही चर्चा करण्यात आली. दिवाळीच्या शुभमुहूर्तावर झालेल्या या सदिच्छा भेटीमुळे शिवसेनेतील पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. --- ## ‘गोकुळ’च्या संघर्ष मोर्चाला मनसेचा ठाम पाठिंबा! - **URL**: https://jagrutmaharashtranews.com/news/gakalicaya-sagharashha-maracal-manasaca-thama-pathab - **Published**: 2026-11-08 18:21 - **Category**: राजकीय - **Author**: दादा सारंग कोल्हापूर प्रतिनिधी✍️ : ‘गोकुळ’ दूध संघाच्या संदर्भात आमदार सतेज (बंटी) पाटील यांनी आयोजित केलेल्या संघर्ष मोर्चाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ठाम पाठिंबा जाहीर केला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार पक्षाने आमदार सतेज पाटील यांच्या पाठीशी उभे राहण्याचा अधिकृत निर्णय घेतला असून, या मोर्चात मनसेचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि महाराष्ट्र सैनिक मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.सोमवार, ९ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता कोल्हापुरातील ऐतिहासिक दसरा चौक येथून या संघर्ष मोर्चाला सुरुवात होणार आहे. या मोर्चात मनसेचे कोल्हापूर जिल्हा संपर्क अध्यक्ष यशवंत किल्लेदार आणि नंदकुमार चिले हेदेखील सहभागी होणार असल्याची माहिती पक्षाच्या वतीने देण्यात आली आहे.या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व उपजिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुख, उपतालुकाप्रमुख, शहरप्रमुख, उपशहरप्रमुख, महिला आघाडीच्या पदाधिकारी, विद्यार्थी सेनेचे पदाधिकारी, अंगीकृत संघटनांचे प्रमुख, शाखाप्रमुख, गटप्रमुख आणि सर्व महाराष्ट्र सैनिकांना मोर्चात सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ‘गोकुळमध्ये आम्ही तुमच्या बरोबर!’ अशी भूमिका घेत आमदार सतेज पाटील यांच्या संघर्षाला पाठिंबा दिल्याने या मोर्चात मनसेची उपस्थिती महत्त्वपूर्ण ठरणार आहे.मनसेचे हातकणंगले लोकसभा जिल्हाध्यक्ष दौलतराव पाटील आणि जिल्हा सचिव प्रतापराव पाटील यांनी सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सोमवारी सकाळी ठीक १० वाजता दसरा चौक येथे वेळेवर उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. --- ## विशाल परब यांच्या माध्यमातून वेंगुर्ले कॅम्पमधील २१ कातकरी कुटुंबांची दिवाळी गोड! - **URL**: https://jagrutmaharashtranews.com/news/vashal-parab-yacaya-mathhayamatana-vagaral-kamapamathhal-katakara-katabca-thavali-gada - **Published**: 2026-11-08 14:55 - **Category**: सामाजिक - **Author**: दादा सारंग वेंगुर्ला प्रतिनिधी✍️ : दिवाळीचा आनंद समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचावा आणि आर्थिक परिस्थितीमुळे कोणतेही कुटुंब सणाच्या आनंदापासून वंचित राहू नये, या सामाजिक भावनेतून भाजपा सिंधुदुर्ग आणि भाजपा युवा नेते विशालभाई परब यांच्या माध्यमातून वेंगुर्ला शहरातील कॅम्प परिसरातील २१ कातकरी कुटुंबांना दिवाळीनिमित्त जीवनावश्यक शिध्याचे वाटप करण्यात आले. सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून राबविण्यात आलेल्या या उपक्रमातून माणुसकी आणि सामाजिक एकोप्याचा संदेश देण्यात आला.दिवाळी म्हटली की घराघरांत दिव्यांची रोषणाई, फराळाची तयारी, नवीन कपड्यांची खरेदी आणि नातेवाइकांच्या भेटीगाठी अशा उत्साहपूर्ण वातावरणाची अनुभूती येते. मात्र, समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना अनेकदा आर्थिक अडचणींमुळे सण साजरा करताना मर्यादा येतात. अशा कुटुंबांच्या आनंदात सहभागी होऊन त्यांना मदतीचा हात देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम आयोजित करण्यात आला.वेंगुर्ला शहरातील कॅम्प परिसरात वास्तव्यास असलेल्या कातकरी समाजातील २१ कुटुंबांना दिवाळीनिमित्त शिध्याचे वाटप करण्यात आले. सणासुदीच्या काळात जीवनावश्यक साहित्याची मदत मिळाल्याने या कुटुंबांना मोठा दिलासा मिळाला. गरजू कुटुंबांच्या गरजा जाणून घेत त्यांच्यापर्यंत मदत पोहोचविणे, त्यांच्या सुख-दुःखात सहभागी होणे आणि समाजातील विविध घटकांमध्ये आपुलकीची भावना निर्माण करणे, हाच या उपक्रमामागील उद्देश होता.दिवाळीचा खरा आनंद केवळ स्वतःच्या घरापुरता मर्यादित न ठेवता तो इतरांपर्यंत पोहोचविण्यात आहे. आपल्या आनंदात इतरांनाही सहभागी करून घेणे, गरजूंच्या आयुष्यात समाधानाचे क्षण निर्माण करणे आणि वंचित घटकांशी आपुलकीचे नाते जोडणे, यातच सणाचे खरे मर्म दडलेले आहे. सण-उत्सव हे समाजातील विविध घटकांना एकत्र आणून परस्परांमधील जिव्हाळा आणि सामाजिक सलोखा वाढविण्याचे प्रभावी माध्यम ठरतात.विशेषतः कातकरी समाजातील कुटुंबांपर्यंत अशा सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून पोहोचणे, त्यांच्या अडचणी आणि गरजांची जाणीव ठेवणे तसेच त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहाशी जोडण्यासाठी प्रयत्न करणे महत्त्वाचे आहे. मदतीचा हात हा केवळ वस्तूंच्या वाटपापुरता मर्यादित नसून त्यातून संबंधित कुटुंबांना आपलेपणाची जाणीवही होते. याच भावनेतून २१ कुटुंबांच्या दिवाळीत आनंदाची भर घालण्याचा प्रयत्न या उपक्रमातून करण्यात आला.या उपक्रमावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना ऊर्फ बाळू देसाई, उपनगराध्यक्ष सुहास गवंडळकर, नगरसेवक प्रणव वायंगणकर, सुधीर पालेकर, रवींद्र शिरसाठ, नगरसेविका आकांक्षा परब, जिल्हा कार्यकारिणी सदस्य साईप्रसाद नाईक, बूथप्रमुख निलेश गवस आदी उपस्थित होते.यावेळी सुरेश पवार, अर्जुन पवार, राजू पवार, नितीन पवार, शिवाजी पवार, चंदू पवार, संग्राम पवार, प्रकाश निकम, सद्गुरू निकम, शंकर पवार, पुष्पा पवार, सुमती निकम, मीना निकम, राजश्री हिलम, मोहन पवार आदी कातकरी समाजबांधवांना शिध्याचे वाटप करण्यात आले. सामाजिक बांधिलकी, सहकार्य आणि माणुसकीची भावना जपत राबविण्यात आलेल्या या उपक्रमातून दिवाळीच्या प्रकाशासोबतच सामाजिक एकोपा आणि आपुलकीचा संदेश देण्यात आला. --- ## साई डोंगरातील वृक्षतोडीविरोधात राष्ट्रीय हरित लवादात याचिका! - **URL**: https://jagrutmaharashtranews.com/news/saii-dagaratal-vakashhatadavarathhata-rashhataraya-harata-lvathata-yacaka - **Published**: 2026-11-08 14:16 - **Category**: सामाजिक - **Author**: दादा सारंग अलिबाग प्रतिनिधी : कर्जत तालुक्यातील साई डोंगर परिसरात टोरंट पॉवर कंपनीच्या प्रस्तावित पंप स्टोरेज जलविद्युत प्रकल्पासाठी करण्यात येणाऱ्या वृक्षतोडीविरोधात राष्ट्रीय हरित लवादाकडे याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेद्वारे वनजमीन हस्तांतरणाची मान्यता तसेच ३२ हजार ४९० वृक्षतोडीच्या परवानगीच्या वैधतेला आव्हान देण्यात आले आहे. राष्ट्रीय हरित लवादाने याचिका दाखल करून घेतली असून, या प्रकरणाची पुढील सुनावणी १७ डिसेंबर रोजी होणार आहे.कर्जत तालुक्यातील साई डोंगर परिसरात गुजरातमधील टोरंट पॉवर कंपनीचा तीन हजार मेगावॅट क्षमतेचा पंप स्टोरेज जलविद्युत प्रकल्प प्रस्तावित आहे. या प्रकल्पासाठी २३३ हेक्टर वनजमीन हस्तांतरित करण्यात आली आहे. तसेच या वनजमिनीवरील ३२ हजार ४९० वृक्षतोडीस वनविभागाने परवानगी दिली आहे. त्यापैकी आतापर्यंत सुमारे अडीच ते तीन हजार वृक्षांची कत्तल करण्यात आली आहे.या वृक्षतोडीच्या विरोधात ॲड. सागर देवरे यांनी राष्ट्रीय हरित लवादात याचिका दाखल केली आहे. शासनाने वनजमीन हस्तांतरणाला दिलेली मान्यता आणि मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड करण्यास दिलेल्या आदेशाच्या वैधतेवर याचिकेत प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे. लवादाने ही याचिका दाखल करून घेत प्रतिवादींना चार आठवड्यांच्या आत प्रतिज्ञापत्राद्वारे आपली बाजू मांडण्याचे निर्देश दिले आहेत. या प्रकरणाची पुढील सुनावणी १७ डिसेंबर रोजी होणार असल्याची माहिती याचिकाकर्ते ॲड. देवरे यांनी दिली.वनहक्क आणि ग्रामसभेच्या मंजुरीबाबत आक्षेपया याचिकेमध्ये वनजमीन हस्तांतरणाच्या प्रक्रियेवर अनेक गंभीर आक्षेप नोंदविण्यात आले आहेत. वनहक्क कायद्यानुसार स्थानिक आदिवासींचे हक्क निश्चित करण्यापूर्वीच वनजमीन वळतीकरणाचा निर्णय घेण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. तसेच संबंधित ग्रामसभांची मंजुरी नसतानाही वनजमीन हस्तांतरणाची प्रक्रिया राबविण्यात आल्याचा आक्षेप घेण्यात आला आहे. पर्यावरणीय मंजुरी, वनमंजुरी आणि प्रत्यक्ष वृक्षतोडीची परवानगी देताना आवश्यक कायदेशीर प्रक्रियांचे योग्य प्रकारे पालन झाले नसल्याचेही याचिकेत नमूद करण्यात आले आहे.शेखरूच्या अधिवासावरही परिणाम होण्याची भीतीसाई डोंगर परिसर पश्चिम घाटाच्या क्षेत्रात येत असून, या भागात महाराष्ट्राचा राज्यप्राणी असलेल्या शेखरूचा अधिवास मोठ्या प्रमाणात आढळतो. त्यामुळे वृक्षतोड करण्यापूर्वी वन्यजीव विभागाची परवानगी घेणे आवश्यक होते. मात्र, अशी परवानगी घेतल्याचे दिसून येत नसल्याचा मुद्दाही याचिकेत उपस्थित करण्यात आला आहे.वनहक्क, ग्रामसभेची मंजुरी, पर्यावरणीय आणि वनविषयक परवानग्या तसेच वन्यजीव संरक्षणाशी संबंधित कायदेशीर प्रक्रियांचे पालन झाले नसल्याचा आमचा मुख्य आक्षेप आहे. संपूर्ण प्रक्रियेत कायदेशीर तरतुदींचे पालन झाले आहे की नाही, याची तपासणी होणे आवश्यक आहे, असे याचिकाकर्ते ॲड. सागर देवरे यांनी स्पष्ट केले. --- ## दिवाळीच्या प्रकाशात जपूया पाण्याचा प्रत्येक थेंब! - **URL**: https://jagrutmaharashtranews.com/news/thavalicaya-parakashata-japaya-panaeyaca-paratayaka-thab - **Published**: 2026-11-08 14:07 - **Category**: प्रशासन - **Author**: दादा सारंग दिवाळी म्हणजे प्रकाशाचा, आनंदाचा, उत्साहाचा आणि नवचैतन्याचा सण! घराघरांत उजळणारे दिवे, अंगणात सजणाऱ्या रांगोळ्या, नात्यांमधील गोडवा आणि नव्या आशांनी उजळणारी मने... अशा प्रसन्न वातावरणात प्रत्येक जण दिवाळीच्या आनंदात सहभागी होत असतो. मात्र, यंदाच्या दिवाळीत सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या या उत्सवी वातावरणाला दुष्काळाच्या सावटाची किनार लाभली आहे. हिरवाईने नटलेला, मुबलक पावसासाठी ओळखला जाणारा आणि निसर्गसंपन्नतेचा वारसा लाभलेला सिंधुदुर्ग आज पाणीटंचाईच्या आव्हानाला सामोरा जात आहे. पावसाच्या अनियमिततेमुळे ग्रामीण जनजीवन, शेती आणि पशुधनापुढे निर्माण झालेली संकटे भविष्यातील जलव्यवस्थापनाचा गांभीर्याने विचार करण्यास भाग पाडत आहेत.दिवाळीच्या प्रकाशात आपण घराघरांतील अंधार दूर करण्याचा प्रयत्न करतो; मात्र यंदा त्याच प्रकाशात पाण्याचे महत्त्वही ओळखण्याची गरज आहे. कारण आज जपलेला पाण्याचा प्रत्येक थेंब उद्याच्या पिढीच्या जीवनाचा आधार ठरू शकतो. त्यामुळे दिवाळीचा आनंद साजरा करताना पाणी बचत आणि जलसंधारणाचा संकल्प करणे ही केवळ सामाजिक जबाबदारी नसून काळाची अपरिहार्य गरज बनली आहे.दुष्काळाच्या संकटात शेतकऱ्यांना आर्थिक आधारसिंधुदुर्ग जिल्ह्याची ओळख म्हणजे हिरवीगार वनराई, निसर्गसंपन्न परिसर आणि पावसाची मुबलकता. मात्र, हवामानातील बदल, पावसाचे असमान वितरण आणि जलस्रोतांमधील पाण्याची घटती उपलब्धता यामुळे या जिल्ह्यातही दुष्काळी परिस्थिती निर्माण होऊ शकते, हे यंदाच्या परिस्थितीने स्पष्ट केले आहे. जिल्ह्यातील आठही तालुक्यांचा दुष्काळी परिस्थितीत समावेश झाल्याने पाणीटंचाई निवारण, शेतीचे संरक्षण आणि ग्रामीण जनजीवन सुरळीत ठेवण्याचे मोठे आव्हान प्रशासनासमोर उभे राहिले आहे.या संकटाच्या काळात शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने मदतीचा हात पुढे केला आहे. दुष्काळामुळे शेतीचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक आधार मिळावा आणि दिवाळीच्या सणात त्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य फुलावे, या उद्देशाने नुकसानभरपाईपोटी मिळणाऱ्या मदतीचा अग्रिम हप्ता म्हणून पाच हजार रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यांवर जमा करण्यात आले आहेत.शेतीवर अवलंबून असलेल्या कुटुंबांसाठी ही मदत निश्चितच दिलासादायक आहे. कारण शेतकऱ्यांसाठी दिवाळीचा आनंद हा केवळ सणापुरता मर्यादित नसतो; तर वर्षभराच्या कष्टातून मिळणाऱ्या उत्पन्नाशी आणि कुटुंबाच्या आर्थिक स्थैर्याशीही जोडलेला असतो. अशा वेळी शासनाकडून मिळालेली आर्थिक मदत संकटाच्या काळात आधार देणारी ठरते.मात्र, आर्थिक मदत ही तात्पुरत्या संकटातून सावरण्याची एक महत्त्वाची पायरी आहे. दुष्काळाच्या समस्येवर कायमस्वरूपी उपाय शोधायचा असेल, तर पाण्याचे योग्य नियोजन, जलस्रोतांचे संवर्धन आणि पावसाचे पाणी अडवून ते जमिनीत मुरवण्याच्या उपाययोजनांना प्राधान्य द्यावे लागेल.पाणी मुबलक असतानाच त्याचे मोल ओळखूया!पाण्याची खरी किंमत पाणीटंचाई निर्माण झाल्यानंतरच लक्षात येते. नळाला पाणी येत असताना आपण त्याचा सहज वापर करतो; विहिरी, तलाव आणि नद्या भरलेल्या असताना त्यांच्या अस्तित्वाचे महत्त्वही अनेकदा दुर्लक्षित राहते. मात्र, एकदा पाण्याची टंचाई निर्माण झाली की प्रत्येक थेंबासाठी धावपळ करावी लागते. म्हणूनच पाणी संपल्यानंतर उपाय शोधण्यापेक्षा ते उपलब्ध असतानाच त्याचे योग्य नियोजन करणे अधिक महत्त्वाचे आहे.दिवाळीच्या निमित्ताने आपण घराची स्वच्छता करतो, रंगरंगोटी करतो, अंगण सजवतो आणि परिसर प्रकाशमय करतो. पण याच वेळी आपल्या गावातील विहिरी, तलाव, नद्या, बंधारे आणि अन्य जलस्रोत यांच्या संवर्धनाचाह --- ## दिवाळीत खाद्यपदार्थांच्या सुरक्षिततेसाठी अन्न प्रशासनाची जनजागृती मोहीम! - **URL**: https://jagrutmaharashtranews.com/news/thavalita-khathayapatharathacaya-sarakashhatatasatha-anana-parashasanaca-janajagata-mahama - **Published**: 2026-11-08 09:06 - **Category**: प्रशासन - **Author**: दादा सारंग सिंधुदुर्ग दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठेत मिठाई, फराळ आणि विविध खाद्यपदार्थांची वाढती मागणी लक्षात घेऊन नागरिकांना सुरक्षित व दर्जेदार अन्नपदार्थ मिळावेत, या उद्देशाने अन्न व औषध प्रशासनाने कुडाळ येथे विशेष जनजागृती मोहीम राबविली. ६ नोव्हेंबर रोजी आयोजित या मोहिमेत खाद्यपदार्थांमध्ये वापरण्यात येणारे रंग, त्यांचे प्रमाण आणि सुट्या मसाल्यांची खरेदी-विक्री करताना घ्यावयाची काळजी याबाबत व्यापारी तसेच नागरिकांना मार्गदर्शन करण्यात आले.सणासुदीच्या दिवसांत मिठाई आणि अन्य खाद्यपदार्थांना मोठी मागणी असते. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी खाद्यपदार्थांमध्ये रंगांचा वापर केला जातो. मात्र, असे रंग वापरताना अन्नसुरक्षा नियमांनुसार निर्धारित केलेल्या मर्यादांचे पालन करणे बंधनकारक आहे. अनधिकृत खाद्यरंगांचा वापर करणे किंवा परवानगीपेक्षा जास्त प्रमाणात रंग मिसळणे आरोग्याच्या दृष्टीने धोकादायक ठरू शकते. त्यामुळे खाद्यपदार्थांचे उत्पादन आणि विक्री करताना नियमांचे काटेकोर पालन करण्याच्या सूचना व्यापाऱ्यांना देण्यात आल्या.मोहिमेदरम्यान सुट्या मसाल्यांच्या खरेदी-विक्रीच्या बाबतीतही विशेष मार्गदर्शन करण्यात आले. मसाल्यांची गुणवत्ता, स्वच्छता, योग्य पद्धतीने साठवणूक तसेच विक्री करताना आवश्यक असलेल्या अन्नसुरक्षा नियमांचे पालन करण्याचे महत्त्व पटवून देण्यात आले. ग्राहकांनीही मसाले आणि इतर खाद्यपदार्थ खरेदी करताना त्यांच्या दर्जाबरोबरच स्वच्छता व सुरक्षिततेची खात्री करूनच खरेदी करावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले.नागरिकांना सुरक्षित अन्न उपलब्ध करून देण्यासाठी अन्न व्यवसायाशी संबंधित प्रत्येक घटकाने अन्न सुरक्षा व मानके कायद्यातील तरतुदींचे पालन करणे आवश्यक आहे. अन्न भेसळीला आळा घालणे, सुरक्षित अन्नसेवनाबाबत ग्राहकांमध्ये जागरूकता निर्माण करणे आणि या प्रक्रियेत व्यापारी व ग्राहकांचा सक्रिय सहभाग वाढविणे, हा या जनजागृती मोहिमेमागील मुख्य उद्देश आहे.पालकमंत्री नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न व औषध प्रशासनाकडून ही मोहीम राबविण्यात येत आहे. दिवाळीसह सणासुदीच्या काळात नागरिकांना सुरक्षित व गुणवत्तापूर्ण खाद्यपदार्थ उपलब्ध व्हावेत आणि अन्नसुरक्षेबाबत जनजागृती अधिक व्यापक व्हावी, यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे. --- ## वेंगुर्ल्यात भव्य नरकासूर स्पर्धेचा जल्लोषात प्रारंभ! - **URL**: https://jagrutmaharashtranews.com/news/vagaralyata-bhavaya-narakasara-saparathhaca-jallshhata-pararabha - **Published**: 2026-11-08 07:16 - **Category**: सामाजिक - **Author**: दादा सारंग वेंगुर्ला प्रतिनिधी✍️ : कोकणच्या पारंपरिक उत्सवसंस्कृतीचा वारसा जपत जय हनुमान मित्रमंडळ, जुना स्टँड वेंगुर्ला यांच्या वतीने आयोजित आणि महाराष्ट्र भाजपा युवा नेते विशालजी परब पुरस्कृत भव्य नरकासूर स्पर्धेचा वेंगुर्ल्यात उत्साहपूर्ण वातावरणात शुभारंभ झाला. नरकासुराच्या भव्य प्रतिकृती, आकर्षक सजावट आणि तरुणाईचा उत्स्फूर्त सहभाग यामुळे संपूर्ण परिसरात उत्सवाचे चैतन्य निर्माण झाले आहे.नरकासूर स्पर्धेच्या निमित्ताने युवकांनी आपल्या कलात्मक कौशल्याचे दर्शन घडविले. विविध कल्पनांमधून साकारलेल्या नरकासुराच्या प्रतिकृती नागरिकांचे लक्ष वेधून घेत असून, स्पर्धेला स्थानिक नागरिकांकडूनही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. पारंपरिक उत्सवांचे जतन आणि संवर्धन करण्याबरोबरच तरुणांच्या सर्जनशीलतेला व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा या आयोजनामागील उद्देश आहे.या शुभारंभप्रसंगी महाराष्ट्र भाजपा युवा नेते विशालजी परब, सावंतवाडीचे उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर, वेंगुर्ल्याचे उपनगराध्यक्ष सुहास गवंडळकर, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना देसाई, नगरसेवक सचिन शेटये आदी मान्यवर उपस्थित होते.या स्पर्धेमुळे युवकांना आपले कलागुण सादर करण्याची संधी मिळत असून, पारंपरिक नरकासूर उत्सवाची सांस्कृतिक परंपरा नव्या पिढीपर्यंत पोहोचण्यास मदत होत आहे. जय हनुमान मित्रमंडळाच्या या उपक्रमातून वेंगुर्ल्यात उत्सवाचा उत्साह अधिक द्विगुणित झाला आहे. --- ## अभ्यासू उपनगराध्यक्ष अनिल निरवडेकर गप्प का? संजू परबांचा सवाल - **URL**: https://jagrutmaharashtranews.com/news/abhayasa-upanagarathhayakashha-anal-naravadakara-gapapa-ka-saja-parabca-saval - **Published**: 2026-11-08 07:10 - **Category**: राजकीय - **Author**: दादा सारंग सावंतवाडी प्रतिनिधी✍️ : इंदिरा गांधी व्यापारी संकुलातील गाळ्यांच्या भिंती पाडण्याचे प्रकरण आणि पोटभाडेकरूंच्या प्रश्नावर उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर ठोस भूमिका का घेत नाहीत? स्वतःला अभ्यासू म्हणवून घेणारे उपनगराध्यक्ष या विषयावर गप्प का आहेत? त्यांच्यावर कोणाचा दबाव आहे का? असे सवाल उपस्थित करत माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक संजू परब यांनी सावंतवाडी नगरपरिषदेतील सत्ताधारी आणि प्रशासनाच्या कारभारावर जोरदार टीका केली. नगरपरिषदेत सध्या पोरखेळ सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केला. पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी नगरसेविका ॲड. नीता सावंत-कविटकर, शर्वरी धारगळकर, स्नेहा नाईक आणि नगरसेवक देव्या सूर्याजी उपस्थित होते.इंदिरा गांधी व्यापारी संकुलातील गाळ्यांच्या भिंती काढण्याच्या प्रकरणावर बोलताना संजू परब म्हणाले की, प्रशासनाच्या माहितीनुसार सुमारे २० गाळेधारकांनी भिंती काढल्या असून या प्रकाराला तब्बल २५ वर्षे झाली आहेत. प्रशासनाने या प्रकरणाचे ऑडिट करून केवळ दंड वसूल केला; मात्र प्रत्यक्ष कारवाई का केली नाही? संबंधित गाळेधारकांकडून पुन्हा भिंती बांधून घेणे आवश्यक होते. मग हा विषय बैठकीत आणून नेमके काय साध्य झाले? या संपूर्ण प्रकरणावर उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर यांनी आपली भूमिका स्पष्ट का केली नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.अधिकृत भाडेकरूंकडून गाळे पोटभाड्याने दिले जात असल्याचा मुद्दाही त्यांनी मांडला. प्रशासनाकडे पोटभाडेकरूंची यादी उपलब्ध असतानाही कारवाई होत नसल्याचा आरोप त्यांनी केला. मूळ भाडेकरू पोटभाडेकरूंकडून दरमहा २० हजार रुपये भाडे घेतात, तर नगरपरिषदेला केवळ दीड हजार रुपये मिळतात. त्यामुळे नगरपरिषदेचे आर्थिक नुकसान होत आहे. सत्ताधाऱ्यांमध्ये हिंमत असेल तर संबंधित गाळ्यांच्या भिंती तातडीने बांधून घ्याव्यात आणि ते गाळे ताब्यात घेऊन बेरोजगार तरुणांना उपलब्ध करून द्यावेत, असे आव्हान परब यांनी दिले.पाणीपुरवठा सभापतींना क्लिनचीट देण्याचा अधिकार कुणाला?पाणीपुरवठा सभापतींना निर्दोष ठरविण्याच्या भूमिकेवरही संजू परब यांनी आक्षेप घेतला. चौकशी समिती नेमण्यात आली असताना संबंधित सभापतींना निर्दोष असल्याचे घोषित करण्याचा अधिकार सभागृहाला किंवा नगराध्यक्षांना आहे का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. मुख्याधिकाऱ्यांनी चौकशी समिती नेमल्याचे सांगितले असताना सभापतींनी राजीनामा द्यावा आणि चौकशीत निर्दोष सिद्ध झाल्यानंतर त्यांना पुन्हा पदावर घ्यावे, अशी मागणी त्यांनी केली. विरोधी पक्षातील काही नगरसेवकांनी या क्लिनचीटला पाठिंबा देणे दुर्दैवी असल्याचेही ते म्हणाले. नगरपरिषदेत अभ्यासपूर्ण चर्चा करण्याची आमच्या पक्षाची तयारी आहे. कुणीही आमच्याशी समोरासमोर चर्चा करावी, असे खुले आव्हान त्यांनी दिले.विनाटेंडर खड्डे भरण्याच्या कामावर आक्षेपशहरातील मुख्य रस्त्यांवरील खड्डे विनाटेंडर भरल्याच्या मुद्द्यावरही परब यांनी प्रशासनाला धारेवर धरले. टेंडर प्रक्रिया पूर्ण होण्यापूर्वीच खड्डे भरण्याचे काम सुरू करण्याची ही कोणती पद्धत आहे? नगराध्यक्ष आदेश देऊ शकतात; मात्र काम नियमानुसार निविदा काढूनच झाले पाहिजे. उद्या एक लाख रुपयांच्या कामाचे बिल दोन लाख रुपये झाले तर त्याची जबाबदारी कोण घेणार? नगरपरिषदेत भ्रष्टाचाराचे आरोप होत असताना पुन्हा अशा प्रकारे कामे केली जात आहेत. अधिकाऱ्यांनी नियमबाह्य पद्धतीने कामे करू नयेत, असा इशाराही त्यांनी दिला.मोती तलावाच्या कामावर नाराजी; पालकमंत्री आणि आमदारांचे लक्ष वेधणारमोती तलावाच्या सुरू असलेल्या कामाबाबत तीव्र नाराजी व्यक्त --- ## युवा पिढीने सामाजिक आणि सार्वजनिक कार्यात सक्रिय व्हावे : प्राजक्ता बांदेकर शिरवलकर - **URL**: https://jagrutmaharashtranews.com/news/yava-padhana-samajaka-aanae-saravajanaka-karayata-sakaraya-vahava-parajakata-bthakara-sharavalkara - **Published**: 2026-11-08 06:56 - **Category**: सामाजिक - **Author**: दादा सारंग कुडाळ‌ प्रतिनिधी✍️ : युवा पिढी ही देशाच्या उज्ज्वल भविष्याची खरी ताकद असून, उद्याच्या भारताचे नेतृत्व तरुणांच्याच हातात असणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी शिक्षणाबरोबरच सामाजिक आणि सार्वजनिक क्षेत्रातील कार्यातही सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन कुडाळ नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा प्राजक्ता बांदेकर शिरवलकर यांनी केले.केंद्र सरकारच्या युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालयाच्या वतीने ‘विकसित भारत @ २०४७’ या संकल्पनेला अनुसरून ‘विकसित भारत युवा संसद २०२६’चे आयोजन करण्यात आले होते. ‘माय भारत, सिंधुदुर्ग’ यांच्या पुढाकाराने संत राऊळ महाराज महाविद्यालयात हा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. यावेळी नगराध्यक्षा प्राजक्ता बांदेकर शिरवलकर बोलत होत्या.या कार्यक्रमाला महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. स्मिता सुरवसे, जिल्हा युवा अधिकारी सम्राट पाटील, कार्यक्रम अधिकारी अपेक्षा मांजरेकर, एनएसएस कार्यक्रम अधिकारी सबा शहा, फिजा मकानदार, परीक्षक प्रा. हरीभाऊ भिसे, प्रा. वैभव खानोलकर, शंकर तेजम, रणजीत रणसिंग यांच्यासह जिल्ह्यातील विद्यार्थी स्पर्धक उपस्थित होते.यावेळी बोलताना प्राजक्ता बांदेकर शिरवलकर म्हणाल्या की, युवा संसदेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना स्वतःचे विचार मांडण्याची आणि नेतृत्वक्षमता विकसित करण्याची चांगली संधी मिळत आहे. युवकांना लोकशाही प्रक्रियेची ओळख करून देणे, संसदीय कामकाजाची माहिती देणे आणि देशाच्या विकासप्रक्रियेत त्यांचा सहभाग वाढविणे हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश आहे. यंदाच्या युवा संसदेचा मुख्य चर्चेचा विषय ‘एक देश, एक निवडणूक’ हा असून, या महत्त्वपूर्ण विषयावर विद्यार्थ्यांना संसदीय व्यासपीठावर आपले विचार आणि भूमिका मांडण्याची संधी मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.प्रा. वैभव खानोलकर यांनी राष्ट्रीय युवा संसद महोत्सवाचे महत्त्व विशद केले. अशा उपक्रमांमुळे युवकांमधील नेतृत्वगुण, वक्तृत्वकला, निर्णयक्षमता आणि लोकशाही मूल्यांची जाणीव अधिक दृढ होते. त्याचबरोबर सामाजिक जबाबदारीची भावनाही विकसित होते. युवकांना केवळ विकासाचे लाभार्थी न ठेवता देशाच्या भविष्याचे शिल्पकार बनविणे, तसेच सक्षम, जागरूक आणि जबाबदार युवा नेतृत्व निर्माण करणे हा युवा संसदेचा महत्त्वपूर्ण हेतू असल्याचे त्यांनी नमूद केले.कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात जिल्हा युवा अधिकारी सम्राट पाटील यांनी युवा संसदेच्या आयोजनामागील उद्दिष्टांची माहिती दिली. युवकांमध्ये सामाजिक, आर्थिक आणि राष्ट्रीय प्रश्नांविषयी जागरूकता निर्माण करणे, नागरिकांच्या समस्या समजून घेऊन त्यावर अभ्यासपूर्ण मते मांडण्याची क्षमता विकसित करणे, नेतृत्वगुण व संवादकौशल्य वाढविणे आणि मतभिन्नतेचा आदर करण्याची लोकशाही वृत्ती रुजविणे ही या उपक्रमाची प्रमुख उद्दिष्टे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.युवकांनी मांडलेल्या कल्पना, विचार आणि सूचनांचा उपयोग धोरणकर्ते तसेच प्रशासकीय यंत्रणेला व्हावा आणि विकसित भारताच्या संकल्पनेत तरुणांचा सक्रिय सहभाग वाढावा, हाही या उपक्रमामागील महत्त्वाचा उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. भावेश चव्हाण यांनी केले. विद्यार्थ्यांना संसदीय कार्यपद्धतीचा प्रत्यक्ष अनुभव देणारा आणि त्यांच्यात लोकशाहीविषयी जागरूकता निर्माण करणारा हा उपक्रम उत्साहात पार पडला. --- ## नरकासुरांच्या भव्य प्रतिकृतींनी सावंतवाडी दुमदुमली! - **URL**: https://jagrutmaharashtranews.com/news/narakasaracaya-bhavaya-paratakatana-savatavada-thamathamal - **Published**: 2026-11-08 05:46 - **Category**: सांस्कृतिक - **Author**: दादा सारंग सावंतवाडी प्रतिनिधी✍️ : महाकाय नरकासुरांच्या आकर्षक प्रतिकृती, तरुणाईचा उत्साह, कलात्मकतेचे दर्शन आणि हजारो नागरिकांची विक्रमी उपस्थिती अशा उत्साहपूर्ण वातावरणात शनिवारी मध्यरात्री सावंतवाडीत भाजपा युवा मोर्चाच्या वतीने आयोजित नरकासुर स्पर्धा दिमाखात पार पडली. भव्य नियोजन आणि नागरिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे या स्पर्धेने सावंतवाडीच्या सांस्कृतिक उत्सवांमध्ये विशेष स्थान निर्माण केले. युवा नेते विशाल परब यांच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेने शहरात उत्सवाचे वातावरण निर्माण केले.भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात पक्षाच्या माध्यमातून विविध सामाजिक व सांस्कृतिक उपक्रम राबविले जात आहेत. याच उपक्रमांचा भाग म्हणून विशाल परब यांनी नरकासुर स्पर्धेचे भव्य आयोजन केले होते.तरुणाईच्या कलागुणांना मिळाले हक्काचे व्यासपीठनरकासुर स्पर्धा ही केवळ प्रतिकृती उभारण्याची स्पर्धा नसून कोकणच्या पारंपरिक उत्सवसंस्कृतीचे दर्शन घडविणारा आणि तरुणांच्या कलागुणांना प्रोत्साहन देणारा उपक्रम आहे. याच उद्देशाने विशाल परब यांनी स्पर्धेचे आयोजन करून स्थानिक तरुणांना आपली कल्पकता आणि कलात्मकता सादर करण्याची संधी उपलब्ध करून दिली.शनिवारी रात्री नरकासुरांच्या भव्य प्रतिकृती पाहण्यासाठी सावंतवाडीत नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. प्रत्येक प्रतिकृतीमागे असलेली मेहनत, कल्पकता, सजावट आणि तरुणांचा उत्स्फूर्त सहभाग प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत होता. हजारो नागरिकांनी उपस्थित राहून स्पर्धेला भरभरून प्रतिसाद दिला. या गर्दीने आयोजकांच्या प्रयत्नांना मोठी पावती दिली.विनोद राऊळ यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटनस्पर्धेचा शुभारंभ भाजपा ज्येष्ठ नेते विनोद राऊळ यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला. यावेळी सावंतवाडी नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर आणि युवा नेते विशाल परब यांची प्रमुख उपस्थिती होती. ज्येष्ठ नेत्यांचे मार्गदर्शन, लोकप्रतिनिधींचा अनुभव आणि युवा कार्यकर्त्यांचा उत्साह यांचा संगम या कार्यक्रमातून पाहायला मिळाला.सावंतवाडीकरांच्या सेवेसाठी भाजपा सदैव तत्पर – विशाल परबयावेळी मनोगत व्यक्त करताना विशाल परब यांनी सावंतवाडीकरांशी असलेले आपले नाते आणि भविष्यातील सामाजिक-सांस्कृतिक उपक्रमांबाबतची भूमिका स्पष्ट केली.ते म्हणाले की, सावंतवाडीकरांची सेवा करण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आम्ही सदैव कटिबद्ध आहोत. भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे आशीर्वाद, पालकमंत्री नितेश राणे यांचे मार्गदर्शन तसेच ज्येष्ठ नेते विनोद राऊळ आणि उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर यांची साथ आम्हाला लाभत आहे. सावंतवाडीतील जनतेचे प्रेम आणि विश्वास याच बळावर आगामी काळातही विविध सामाजिक, सांस्कृतिक आणि लोकाभिमुख उपक्रम राबविण्यात येतील.याचवेळी त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या वतीने लवकरच सावंतवाडीत भव्य 'सावंतवाडी महोत्सव' आयोजित करण्यात येणार असल्याची घोषणा केली. या महोत्सवाच्या माध्यमातून स्थानिक कलाकारांना व्यासपीठ मिळवून देण्याबरोबरच सावंतवाडीची सांस्कृतिक परंपरा, कला, क्रीडा आणि पर्यटनाला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.उत्सवात शिस्त आणि सुरक्षिततेला महत्त्व द्या – ॲड. अनिल निरवडेकरउपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर यांनी आपल्या मार्गदर्शनात अशा मोठ्या सार्वजनिक उत्सवांमध्ये शिस्त आणि सुरक्षिततेला प्राधान्य देण्याची आवश्यकता व् --- ## ठाकर लोककलेच्या रंगाविष्काराने पिंगुळी कला महोत्सवाची दिमाखदार सुरुवात! - **URL**: https://jagrutmaharashtranews.com/news/thakara-lkakalcaya-ragavashhakarana-pagali-kal-mahatasavaca-thamakhathara-saravata - **Published**: 2026-11-08 03:36 - **Category**: सांस्कृतिक - **Author**: दादा सारंग कुडाळ प्रतिनिधी✍️ : ठाकर समाजाच्या समृद्ध लोककला, परंपरा आणि सांस्कृतिक वारशाचे दर्शन घडविणाऱ्या पिंगुळी कला महोत्सवाचा प्रारंभ मोठ्या उत्साहात झाला. महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत सांस्कृतिक कार्य संचालनालय, मुंबई यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या दोन दिवसीय महोत्सवाचे उद्घाटन शुक्रवारी (६ नोव्हेंबर) सायंकाळी ठाकर आदिवासी कला आंगण संग्रहालय व आर्ट गॅलरी येथे मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. पारंपरिक लोककलांच्या विविध सादरीकरणांनी पहिल्याच दिवशी उपस्थित रसिकांना मंत्रमुग्ध केले.ठाकर समाजाच्या पिढ्यान्‌पिढ्या चालत आलेल्या पारंपरिक कलांचे जतन आणि संवर्धन व्हावे, त्यांना व्यापक व्यासपीठ मिळावे तसेच हा अनमोल सांस्कृतिक ठेवा नव्या पिढीपर्यंत पोहोचावा, या उद्देशाने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.उद्घाटनप्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, पद्मश्री परशुराम विश्राम गंगावणे, सेन्सॉर बोर्ड सदस्य तथा नाट्यकर्मी विजय चव्हाण, सांस्कृतिक कार्य विभागाचे अधिकारी संदीप बळवडे, सरपंच अजय आकेरकर, सिंधुदुर्ग जिल्हा ठाकर समाजाचे अध्यक्ष शशांक आटक, उपसरपंच मंगेश मसके, तंटामुक्ती समिती अध्यक्ष भगवान रणसिंग, समन्वयक मंगेश खरात, चेतन गंगावणे, एकनाथ गंगावणे आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत यांनी पद्मश्री परशुराम गंगावणे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पारंपरिक लोककलांचे जतन व संवर्धन करण्यासाठी घेतलेल्या मेहनतीचे कौतुक केले. त्यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे महाराष्ट्रातील पारंपरिक लोककलांना राज्यासह राष्ट्रीय स्तरावर नवी ओळख आणि प्रतिष्ठा मिळत असल्याचे त्यांनी नमूद केले.नाट्यकर्मी विजय चव्हाण यांनी पिंगुळीची ठाकर लोककला ही सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सांस्कृतिक वैभवातील एक महत्त्वपूर्ण ओळख असल्याचे सांगितले. अशा सांस्कृतिक महोत्सवांच्या माध्यमातून पारंपरिक कलांना सादरीकरणाची संधी मिळते. त्याचबरोबर नव्या पिढीला आपल्या समृद्ध संस्कृतीची आणि परंपरांची ओळख करून देण्याचे महत्त्वपूर्ण कार्यही घडते, असे त्यांनी स्पष्ट केले.महोत्सवाच्या पहिल्या दिवसाचे मुख्य आकर्षण ठरले ते विविध पारंपरिक लोककलांचे सादरीकरण. दोडामार्ग-कोनाळकट्टा येथील राधानृत्य, महिलांची फुगडी, कळसूत्री बाहुल्या, पांगुळ बैल, पिंगुळी-मालवणी गोंधळ आणि चित्रकथी अशा लोककलेच्या विविध प्रकारांनी उपस्थितांना एक वेगळाच सांस्कृतिक अनुभव दिला. या कलाविष्कारांना रसिकांनी उत्स्फूर्त दाद देत कलाकारांचे कौतुक केले.दरम्यान, महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी शनिवारी (७ नोव्हेंबर) सायंकाळी ७ वाजता कळसूत्री बाहुल्या आणि अन्य पारंपरिक लोककलांचे सादरीकरण होणार आहे. या सांस्कृतिक कार्यक्रमाचा आनंद घेण्यासाठी रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.पिंगुळीच्या मातीत अनेक पिढ्यांपासून जतन झालेल्या ठाकर लोककलेला व्यापक व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासोबतच स्थानिक कलाकारांच्या कलागुणांना प्रोत्साहन देणारा हा महोत्सव सिंधुदुर्गच्या सांस्कृतिक वैभवात मोलाची भर घालणारा ठरत आहे. --- ## CPR प्रशिक्षणातून ५५० जण झाले सक्षम; आपत्कालीन परिस्थितीत जीव वाचविण्याचा मिळाला मंत्र! - **URL**: https://jagrutmaharashtranews.com/news/cpr-parashakashhanaetana-janae-jhal-sakashhama-aapatakalna-parasathatata-java-vacavanaeyaca-malil-matara - **Published**: 2026-11-08 02:12 - **Category**: आरोग्य - **Author**: दादा सारंग कुडाळ प्रतिनिधी✍️ : हृदयविकाराचा झटका किंवा अन्य वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीत योग्य वेळी CPR दिल्यास एखाद्याचे प्राण वाचविणे शक्य होते. याच उद्देशाने कुडाळ येथे आयोजित करण्यात आलेल्या CPR जनजागृती व प्रशिक्षण शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. रोटरी क्लब ऑफ कुडाळ, पंचायत समिती कुडाळ, राणे हॉस्पिटल अँड मेडिकल रिसर्च सेंटर आणि USV Pharma Pvt. Ltd. यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या शिबिरात ५५० हून अधिक जणांनी सहभाग घेत CPR चे प्रशिक्षण घेतले.या प्रशिक्षण शिबिरात हृदयविकाराचा झटका आल्यास किंवा अचानक वैद्यकीय आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास कोणती खबरदारी घ्यावी, CPR का आवश्यक आहे आणि तो योग्य पद्धतीने कसा द्यावा, याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. प्रशिक्षणार्थींना केवळ माहिती देण्यापुरते मर्यादित न राहता प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून CPR देण्याची पद्धत शिकविण्यात आली.या कार्यक्रमाला पंचायत समिती सभापती मिलिंद नाईक, उपसभापती सिताराम तेली, पंचायत समितीचे सर्व सदस्य तसेच गटविकास अधिकारी प्रवीण हिर्लेकर यांच्यासह विविध पदाधिकारी आणि अधिकारी उपस्थित होते.यावेळी रोटरी क्लब ऑफ कुडाळचे अध्यक्ष मकरंद नाईक, माजी अध्यक्ष राजीव पवार, डिस्ट्रिक्ट क्लब कोऑर्डिनेटर प्रणय तेली, राजन बोबाटे, डॉ. संजय सावंत, नीता गोवेकर, राणे हॉस्पिटलचे डॉ. जी. टी. राणे, USV Pharma चे क्रांतिकुमार नागवेकर, डॉ. निशा धुरी तसेच पत्रकार उपस्थित होते. या शिबिरात मोठ्या संख्येने अंगणवाडी सेविका, मदतनीस आणि आशा स्वयंसेविकांनी सहभाग नोंदविला.यावेळी सभापती मिलिंद नाईक आणि रोटरी क्लबचे अध्यक्ष मकरंद नाईक यांनी या उपक्रमाचे महत्त्व विशद केले. समाजातील अधिकाधिक नागरिकांना CPR चे प्रशिक्षण मिळणे ही काळाची गरज आहे. भविष्यात एखादी आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास या प्रशिक्षणाचा निश्चितच उपयोग होईल. योग्य वेळी प्रशिक्षित व्यक्तीकडून मिळालेली मदत एखाद्याचा अनमोल जीव वाचवू शकते, असे मत त्यांनी व्यक्त केले.आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत हृदयविकारासह विविध वैद्यकीय आपत्कालीन प्रसंग कधीही उद्भवू शकतात. अशा वेळी केवळ वैद्यकीय यंत्रणेवर अवलंबून न राहता सर्वसामान्य नागरिकांनाही प्राथमिक जीवनरक्षक उपायांची माहिती असणे आवश्यक आहे. याच जाणीवेतून ५५० हून अधिक जणांना देण्यात आलेले CPR प्रशिक्षण समाजासाठी मोलाचे ठरणार आहे. वेळीच केलेली मदत आणि CPR चे योग्य ज्ञान एखाद्याला मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढून नवजीवन देऊ शकते, हा महत्त्वपूर्ण संदेश या शिबिरातून देण्यात आला. --- ## मालवणी भाषेच्या जतनासाठी सिंधुदुर्गात उभारणार स्वतंत्र संशोधन केंद्र! - **URL**: https://jagrutmaharashtranews.com/news/malvanae-bhashhacaya-jatanasatha-sathhatharagata-ubharanaera-savatatara-sashathhana-kathara - **Published**: 2026-11-07 09:16 - **Category**: प्रशासन - **Author**: दादा सारंग सिंधुदुर्ग प्रतिनिधी✍️ : सिंधुदुर्ग जिल्ह्याची सांस्कृतिक ओळख असलेल्या मालवणी भाषेचे जतन, संवर्धन आणि जागतिक स्तरावर प्रसार करण्याच्या दृष्टीने जिल्ह्यात स्वतंत्र ‘मालवणी संशोधन केंद्र’ स्थापन करण्यात येणार आहे. ‘हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे जिल्हा मराठी विकास केंद्रा’च्या माध्यमातून हे संशोधन केंद्र उभारण्यात येणार असल्याची घोषणा उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी केली. या केंद्राच्या माध्यमातून मालवणी भाषेचा शास्त्रीय अभ्यास, संशोधन, दस्तऐवजीकरण आणि प्रसार केला जाणार आहे.सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत मंत्री सामंत यांनी ही घोषणा केली. यावेळी आमदार दीपक केसरकर, आमदार नीलेश राणे, जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, एमआयडीसीचे सहायक मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते. मालवणी संशोधन केंद्राची मागणी आमदार नीलेश राणे यांनी केली होती.मालवणी भाषा ही केवळ संवादाचे माध्यम नसून सिंधुदुर्गच्या समृद्ध सांस्कृतिक परंपरेचा आणि स्थानिक अस्मितेचा अविभाज्य भाग आहे. या भाषेतील वैशिष्ट्यपूर्ण शब्दसंपदा, साहित्य, म्हणी, वाक्प्रचार, लोकपरंपरा आणि सांस्कृतिक ठेव्याचे जतन करण्यासाठी या संशोधन केंद्राच्या माध्यमातून विशेष प्रयत्न करण्यात येणार आहेत. मालवणी भाषेचा शास्त्रीय पद्धतीने अभ्यास करून तिला आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख मिळवून देण्याचे उद्दिष्टही यामागे आहे.दरम्यान, मराठी साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर मराठीतील विविध बोलीभाषांचे स्वतंत्र शब्दकोश तयार करण्याचे काम सुरू आहे. या उपक्रमांतर्गत मालवणी भाषेचाही स्वतंत्र शब्दकोश तयार करण्यात येणार असल्याची माहिती मंत्री उदय सामंत यांनी दिली. यामुळे मालवणी भाषेतील प्रचलित आणि पारंपरिक शब्द, म्हणी, वाक्प्रचार तसेच भाषेची वैशिष्ट्ये संकलित करून त्यांचे शास्त्रीय पद्धतीने दस्तऐवजीकरण करता येणार आहे.लोककला आणि स्थानिक कलाकारांच्या योगदानाला मिळणार नवी ओळखमालवणी भाषेच्या संवर्धनाबरोबरच सिंधुदुर्गच्या सांस्कृतिक वैभवाचे प्रतीक असलेल्या दशावतारासारख्या पारंपरिक लोककलांच्या जतन आणि संवर्धनालाही या संशोधन केंद्राच्या माध्यमातून चालना मिळणार आहे. स्थानिक लोककला, सांस्कृतिक परंपरा आणि कलाकारांच्या कलात्मक योगदानाचे दस्तऐवजीकरण करून त्यांना व्यापक व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.मालवणी भाषा, साहित्य, लोककला आणि सांस्कृतिक वारसा यांचे संशोधन व जतन करणारे हे केंद्र भविष्यात सिंधुदुर्गच्या सांस्कृतिक वैभवाची ओळख अधिक व्यापक करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. भाषेच्या संवर्धनासोबतच स्थानिक कलाकार, साहित्यिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील अभ्यासकांना प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीनेही या उपक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. --- ## दीड वर्षांची असताना बेवारस अवस्थेत सापडली; आज नागपूर महापालिकेत टॅक्स कलेक्टर - **URL**: https://jagrutmaharashtranews.com/news/thada-varashhaca-asatana-bvarasa-avasathata-sapadal-aaja-nagapara-mahapalkata-takasa-kalkatara - **Published**: 2026-11-06 17:54 - **Category**: आंतरराष्ट्रीय - **Author**: दादा सारंग नागपूर‌ प्रतिनिधी✍️ : आयुष्यात यश मिळवण्यासाठी परिस्थिती अनुकूल असावीच लागते असे नाही, तर मनात जिद्द आणि कष्ट करण्याची तयारी असेल तर प्रतिकूल परिस्थितीवरही मात करता येते, याचा प्रत्यय मंगला भिवंडीकर यांच्या प्रेरणादायी जीवनप्रवासातून येतो. अवघ्या दीड वर्षांच्या असताना बेवारस अवस्थेत सापडलेल्या मंगला यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करत आज नागपूर महानगरपालिकेत 'टॅक्स कलेक्टर' (कर संकलक) म्हणून शासकीय सेवेत स्थान मिळवले आहे.मंगला यांचा प्रवास संघर्षाने भरलेला आहे. दीड वर्षांच्या असताना त्या भिवंडी येथे बेवारस अवस्थेत आढळल्या. त्यानंतर त्यांना मुंबईतील माटुंगा येथील 'श्रद्धानंद महिला आश्रमा'त दाखल करण्यात आले. पुढे त्यांचा सांभाळ बाबा आमटे यांच्या 'आनंदवन' संस्थेत करण्यात आला. आनंदवनातील प्रेमळ वातावरण, आपुलकी आणि मिळालेल्या संस्कारांनी त्यांच्या आयुष्याला नवी दिशा दिली. याच संस्थेच्या आधारावर त्यांनी आपले शालेय शिक्षण तसेच उच्च शिक्षण यशस्वीपणे पूर्ण केले.शिक्षण पूर्ण झाल्यानंतर शासकीय सेवेत रुजू होण्याचे स्वप्न त्यांनी उराशी बाळगले. हे स्वप्न साकार करण्यासाठी त्यांनी जळगाव येथील दीपस्तंभ फाउंडेशनच्या 'मनोबल' निवासी प्रकल्पात प्रवेश घेतला. येथे स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू करत त्यांनी अभ्यासात स्वतःला झोकून दिले. कठोर परिश्रम, सातत्य आणि योग्य मार्गदर्शनाच्या बळावर त्यांनी महापालिकेची परीक्षा उत्तीर्ण केली.अखेर त्यांच्या मेहनतीला यश आले असून, मंगला भिवंडीकर यांची नागपूर महानगरपालिकेत टॅक्स कलेक्टर म्हणून नियुक्ती झाली आहे. बेवारस अवस्थेतून सुरू झालेला त्यांचा प्रवास आज शासकीय सेवेपर्यंत पोहोचला आहे. त्यांचे हे यश केवळ वैयक्तिक यश नसून प्रतिकूल परिस्थितीतून मार्ग काढू पाहणाऱ्या अनेकांसाठी प्रेरणादायी ठरणारे आहे.परिस्थिती माणसाचे भविष्य ठरवत नाही, तर जिद्द आणि मेहनत त्याचे भविष्य घडवतात, हे मंगला भिवंडीकर यांनी आपल्या कर्तृत्वातून सिद्ध केले आहे. त्यांच्या या उल्लेखनीय यशाचे सर्व स्तरांतून कौतुक होत असून, त्यांच्या पुढील वाटचालीसाठी अभिनंदन आणि शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. --- ## कणकवलीच्या दिवाळी बाजाराला पहिल्याच वर्षी उदंड प्रतिसाद - **URL**: https://jagrutmaharashtranews.com/news/kanaekavalcaya-thavali-bjaral-pahalyaca-varashha-uthada-paratasatha - **Published**: 2026-11-06 17:47 - **Category**: सामाजिक - **Author**: दादा सारंग कणकवली प्रतिनिधी✍️ : स्थानिक व्यावसायिक, महिला बचत गट आणि नवउद्योजकांना आपल्या उत्पादनांच्या विक्रीसाठी व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने कणकवली शहर विकास आघाडीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या दिवाळी बाजाराला पहिल्याच वर्षी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. नगराध्यक्ष संदेश पारकर यांच्या हस्ते फीत कापून, तर उपनगराध्यक्ष सुशांत नाईक यांच्या हस्ते नारळ वाढवून या बाजाराचे उद्घाटन करण्यात आले. सुरुवातीला मर्यादित स्टॉल्सचे नियोजन असताना विक्रेत्यांच्या उत्साहामुळे येथे ४० हून अधिक स्टॉल्स उभारण्यात आले आहेत.उपनगराध्यक्ष सुशांत नाईक यांच्या संकल्पनेतून हा दिवाळी बाजार साकारण्यात आला आहे. दिवाळीच्या खरेदीच्या निमित्ताने स्थानिक उत्पादकांना ग्राहकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळावी, महिला बचत गटांच्या उत्पादनांना बाजारपेठ मिळावी आणि नव्याने व्यवसाय सुरू करणाऱ्यांना प्रोत्साहन मिळावे, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे. या आयोजनासाठी शहर विकास आघाडीचे नगरसेवक, नगरसेविका आणि कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.या बाजारात सुरुवातीला १५ ते २० स्टॉल्स उभारण्याचे उद्दिष्ट होते. मात्र, विक्रेत्यांकडून मिळालेल्या चांगल्या प्रतिसादामुळे ही संख्या ४० च्या पुढे गेली. मालवण, सावंतवाडी तसेच जिल्ह्यातील अन्य भागांतील व्यावसायिकांनीही येथे सहभाग नोंदवला आहे. दिवाळीच्या खरेदीसाठी लागणाऱ्या विविध वस्तू एकाच ठिकाणी उपलब्ध झाल्याने ग्राहकांचीही बाजारात गर्दी होत आहे.महिला बचत गटांनी तयार केलेला दिवाळी फराळ, आकर्षक आकाशकंदील, रांगोळ्या, मातीची भांडी, स्टेशनरी तसेच घरगुती आणि दैनंदिन वापरातील विविध वस्तू या बाजाराचे आकर्षण ठरत आहेत. स्थानिक हस्तकला आणि घरगुती उत्पादनांना ग्राहक मिळण्याबरोबरच नवउद्योजकांना आपल्या व्यवसायाची ओळख निर्माण करण्याची संधी या माध्यमातून मिळत आहे.निकोप स्पर्धेतून ग्राहकांना दर्जेदार वस्तू मिळतील : संदेश पारकरउद्घाटनप्रसंगी नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी या उपक्रमाचे कौतुक केले. ते म्हणाले की, कणकवली शहर विकास आघाडीच्या माध्यमातून पहिल्यांदाच अशा प्रकारचा दिवाळी बाजार आयोजित करण्यात आला आहे. उपनगराध्यक्ष सुशांत नाईक यांनी ही संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी पुढाकार घेतला असून सर्व नगरसेवक, नगरसेविका आणि कार्यकर्त्यांनी त्यांना सहकार्य केले आहे. पहिल्याच प्रयत्नाला महिला बचत गट, व्यावसायिक आणि ग्राहकांकडून मिळालेला प्रतिसाद निश्चितच उत्साहवर्धक आहे.कणकवलीला व्यापार, धार्मिक आणि सामाजिक क्षेत्राची समृद्ध परंपरा लाभली आहे. भालचंद्र महाराजांची पुण्यनगरी आणि कोकणचे गांधी आप्पासाहेब पटवर्धन यांच्या सामाजिक कार्याचा वारसा लाभलेले शहर म्हणून कणकवलीची वेगळी ओळख आहे. या परंपरेला साजेसा स्थानिक व्यवसायाला प्रोत्साहन देणारा उपक्रम राबविण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.या बाजारामुळे विक्रेत्यांमध्ये निकोप व्यावसायिक स्पर्धा निर्माण होईल. त्याचा फायदा ग्राहकांना होऊन चांगल्या दर्जाच्या वस्तू योग्य किमतीत उपलब्ध होतील. ग्राहकांचा विश्वास संपादन करण्यासाठी विक्रेत्यांना वस्तूंचा दर्जा, किंमत आणि सेवेवर विशेष लक्ष द्यावे लागेल. यातून शहरातील व्यापाराला चालना मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पहिल्या वर्षी आयोजनात काही त्रुटी राहिल्या असतील, तर त्या पुढील वर्षी दूर करून अधिक नियोजनबद्ध आणि भव्य स्वरूपात हा बाजार भरविण्यात येईल. वीज, स्वच्छता आणि जागेसह आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी नगरपालिकेच्या माध्यमातून घेतली जाईल, अशी ग्व --- ## सिंधुदुर्गातील उद्योगविश्वाला मोठा दिलासा; एमआयडीसीच्या सेवा आता जिल्ह्यातच मिळणार! - **URL**: https://jagrutmaharashtranews.com/news/sathhatharagatal-uthayagavashaval-matha-thalsa-emaaayadasacaya-sava-aata-jalhayataca-malinaera - **Published**: 2026-11-06 17:30 - **Category**: प्रशासन - **Author**: दादा सारंग सिंधुदुर्ग प्रतिनिधी✍️ : जिल्ह्यातील औद्योगिक विकासाला गती देण्याच्या दृष्टीने राज्य शासनाने महत्त्वपूर्ण पावले उचलली असून, एमआयडीसी क्षेत्रातील उद्योजकांना दिलासा देणारे अनेक निर्णय घेण्यात आले आहेत. उद्योग, गुंतवणूक, सेवा व मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी जिल्ह्यातील उद्योजकांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. यावेळी एमआयडीसीमधील फायर चार्ज प्रतियुनिट ७ रुपयांवरून ४ रुपये करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच कुडाळ एमआयडीसीमधील अंतर्गत विद्युत वायरिंग आणि केबलिंगच्या कामासाठी १० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला.रत्नागिरी जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या पॅटर्ननुसार सिंधुदुर्गातील एमआयडीसी क्षेत्रातही फायर चार्जमध्ये कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे स्थानिक उद्योजकांच्या आर्थिक भारात घट होणार आहे. याशिवाय कुडाळ एमआयडीसीसाठी मंजूर झालेल्या १० कोटींच्या निधीसह यापूर्वी मंजूर करण्यात आलेल्या सुमारे ३४ कोटी रुपयांच्या विकासकामांचाही मंत्री सामंत यांनी आढावा घेतला.जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या बैठकीत जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी मंत्री उदय सामंत यांच्यासह उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. यावेळी आमदार दीपक केसरकर, आमदार नीलेश राणे, एमआयडीसीचे सहायक मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमनार, मुख्य अभियंता प्रकाश चव्हाण, माजी आमदार राजन तेली यांच्यासह एमआयडीसीचे अधिकारी, कुडाळ व आडाळी औद्योगिक क्षेत्रातील उद्योजक आणि संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.आडाळी एमआयडीसीत भूखंड घेतलेल्या ४३ भूखंडधारकांना उद्योग सुरू करण्यासाठी आवश्यक ते सहकार्य आणि नियोजन उपलब्ध करून देण्याबाबत बैठकीत चर्चा झाली. तसेच या परिसरातील स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात आणि उद्योगांना कुशल मनुष्यबळ मिळावे, यासाठी कौशल्य विकास केंद्र अर्थात 'स्किल सेंटर' उभारण्याचा निर्णयही यावेळी जाहीर करण्यात आला.एमआयडीसीच्या कामांसाठी रत्नागिरीला जाण्याची गरज कमी होणारएमआयडीसीशी संबंधित प्रशासकीय कामांसाठी उद्योजकांना यापूर्वी रत्नागिरी येथे जावे लागत होते. ही गैरसोय दूर करण्यासाठी एमआयडीसीच्या महत्त्वाच्या सेवा आता सिंधुदुर्ग जिल्ह्यातच उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार दर गुरुवारी एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी, अधीक्षक अभियंता आणि कार्यकारी अभियंता जिल्ह्यात उपस्थित राहणार आहेत. तसेच नोंदणी प्रक्रिया आणि बांधकाम आराखड्यांच्या मंजुरीसाठी आवश्यक साक्षीदार म्हणून दोन नायब तहसीलदारांची उपलब्धता करून देण्यात येणार आहे. त्यामुळे उद्योजकांचा वेळ आणि प्रवासाचा खर्च वाचण्यास मदत होणार आहे.आजारी उद्योगांच्या प्रश्नांसाठी संयुक्त बैठकबैठकीदरम्यान उद्योजकांनी मांडलेल्या विविध अडचणी आणि प्रलंबित प्रश्नांवरही सविस्तर चर्चा करण्यात आली. आर्थिक अडचणीत असलेल्या आजारी उद्योगांना दिलासा देण्यासाठी संबंधित बँका आणि एमआयडीसीच्या प्रादेशिक कार्यालयाने संयुक्त बैठक घेऊन प्रश्न मार्गी लावावेत, अशा सूचना मंत्री सामंत यांनी दिल्या.एमआयडीसी क्षेत्रातील ३३ केव्ही विद्युत उपकेंद्र उभारण्यासाठी राज्य शासनाच्या योजनेअंतर्गत आवश्यक असलेले पाच सामंजस्य करार पूर्ण करून पुढील कार्यवाही करण्याचे निर्देश महावितरणला देण्यात आले. तसेच मंजुरीसाठी प्रलंबित असलेले बांधकाम आराखडे तातडीने निकाली काढण्याचे आदेशही संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले. उद्योजकांना स्थानिक आणि प्रादेशिक स्तरावरच जास्तीत जास्त सुविधा मिळाव्यात, यासाठी प्रशासनाने प्रयत्न करावेत, असेही त् --- ## तुळसमध्ये ८ ते १५ नोव्हेंबरदरम्यान ‘दीपावली शो टाईम २०२६’चे आयोजन! - **URL**: https://jagrutmaharashtranews.com/news/talisamathhaya-ta-navahabratharamayana-thapaval-sha-taiima-ca-aayajana - **Published**: 2026-11-06 12:27 - **Category**: सांस्कृतिक - **Author**: दादा सारंग वेंगुर्ला प्रतिनिधी✍️: श्री. यशवंत बाळू परब मित्र मंडळ आणि आरसीसी देऊळवाडा, तुळस यांच्या संयुक्त विद्यमाने तुळस गावातील कला आणि संस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी ‘दीपावली शो टाईम २०२६’ या भव्य सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. ८ ते १५ नोव्हेंबर या कालावधीत जयतीर मंदिर, तुळस येथे विविध सांस्कृतिक, सामाजिक आणि मनोरंजनात्मक कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे.रविवार ८ नोव्हेंबर रोजी सकाळी १० ते दुपारी १२ या वेळेत गावमर्यादित रांगोळी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. सायंकाळी ६.३० वाजता दीपोत्सव होणार असून, रात्री १० वाजता गावमर्यादित व्हॉलीबॉल स्पर्धेला सुरुवात होणार आहे.शुक्रवार १३ नोव्हेंबर रोजी सकाळी १० ते दुपारी ३ या वेळेत तुळस गावातील ग्रामस्थांसाठी मोफत नेत्रतपासणी शिबिर आयोजित करण्यात आले आहे. रात्री ७ वाजता कार्यक्रमाचे उद्घाटन होईल. त्यानंतर रात्री ८ वाजता तुळस गावातील शाळा आणि ग्रामस्थांचे सांस्कृतिक कार्यक्रम सादर होतील. यावेळी जिल्हास्तरीय आणि गावमर्यादित वेशभूषा स्पर्धाही आयोजित करण्यात आली आहे.शनिवार १४ नोव्हेंबर रोजी रात्री ७ वाजता उद्घाटनानंतर हेरंब दशावतार नाट्य मंडळाचा भव्य पौराणिक दशावतारी नाट्यप्रयोग सादर होणार आहे.रविवार १५ नोव्हेंबर रोजी रात्री ७ वाजता कार्यक्रमाचे उद्घाटन होणार असून, यावेळी मोफत चष्मा वाटप आणि बक्षीस वितरण समारंभ आयोजित करण्यात आला आहे. रात्री १० वाजता डबलबारी भजनाचा जंगी सामना रंगणार आहे.करमणूक, सामाजिक उपक्रम आणि कोकणच्या समृद्ध लोककलेचा सुंदर संगम असलेल्या या महोत्सवात हास्य, संगीत आणि विविध रंगांची उधळण अनुभवता येणार आहे. तुळस गावातील नागरिकांसह परिसरातील रसिकांनी आपल्या कुटुंबीयांसह उपस्थित राहून या महोत्सवाचा आनंद घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.अधिक माहितीसाठी संपर्क :- गौरेश तुळसकर – ७७३८७९०५०२- दीपेश परब – ८४११०९८८७२- प्रथमेश परब – ८९९९६५०३७६- रमेश कबरे – ९३७०१५२७६९स्थळ : जैतीर मंदिर, तुळस. --- ## १२ तोळे सोन्याच्या चोरीचा छडा; कणकवलीतील दाम्पत्य एलसीबीच्या ताब्यात! - **URL**: https://jagrutmaharashtranews.com/news/tali-sanayacaya-caraca-chhada-kanaekavaltal-thamapataya-elsabcaya-tabyata - **Published**: 2026-11-06 12:16 - **Category**: गुन्हेगारी - **Author**: दादा सारंग कुडाळ प्रतिनिधी✍️ : सावंतवाडी एसटी बसस्थानकावर प्रवाशाचे १२ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या कणकवलीतील दाम्पत्याला सिंधुदुर्ग स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने ताब्यात घेतले आहे. सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी या चोरीचा उलगडा केला. दीपक संतोष सकट (वय २७) आणि अमृता दीपक सकट (वय २१, दोघेही रा. एस. एम. हायस्कूलमागे, किनई, कणकवली) अशी ताब्यात घेतलेल्या संशयितांची नावे आहेत.सावंतवाडी एसटी बसस्थानकावरून १२ तोळे सोन्याचे दागिने चोरीला गेल्याची घटना घडली होती. याप्रकरणी २१ सप्टेंबर २०२६ रोजी सावंतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा समांतर तपास करताना पोलिसांनी बसस्थानकातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. तसेच तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे सकट दाम्पत्याचा या चोरीतील सहभाग समोर आला.यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक अनिल हाडळ आणि त्यांच्या पथकाने ६ नोव्हेंबर रोजी गडनदीजवळील उभादेव मंदिर परिसरात सापळा रचला. या कारवाईत दोघांनाही शिताफीने ताब्यात घेण्यात आले. चौकशीदरम्यान त्यांनी चोरी केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. तसेच चोरी केलेले १२ तोळे सोन्याचे दागिने कर्नाटक येथे ठेवल्याची माहिती दिली असून, ते दागिने हस्तगत करण्याची प्रक्रिया सुरू आहे.ताब्यात घेतलेल्या दोन्ही संशयितांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यानंतर पुढील तपासासाठी त्यांना सावंतवाडी पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.ही कारवाई पोलीस अधीक्षक मोहन दहिकर, अपर पोलीस अधीक्षक नयोमी साटम यांच्या सूचनेनुसार आणि पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या पथकात पोलीस उपनिरीक्षक अनिल हाडळ, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुरेश राठोड, महिला पोलीस हवालदार रुपाली खानोलकर, पोलीस हवालदार जॅकसन घोन्सालवीस आणि पोलीस कॉन्स्टेबल अमर कांडर यांचा समावेश होता. --- ## खोदाईमुळे नवाबागचा पाणीपुरवठा ठप्प; शिवसेनेच्या हस्तक्षेपानंतर टँकरने पाणीपुरवठा सुरू! - **URL**: https://jagrutmaharashtranews.com/news/khathaiimali-navabgaca-panaeparavatha-thapapa-shavasanacaya-hasatakashhapanatara-takarana-panaeparavatha-sanpr - **Published**: 2026-11-06 12:08 - **Category**: सामाजिक - **Author**: दादा सारंग वेंगुर्ला प्रतिनिधी✍️ : उभादांडा येथील नवाबाग परिसरातील ग्रामस्थांना गेल्या चार ते पाच दिवसांपासून पाणीटंचाईचा सामना करावा लागत होता. ग्रामपंचायतीच्या नळपाणी योजनेचा पुरवठा अचानक बंद झाल्याने नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले. याबाबत चौकशी केली असता, सुरू असलेल्या खोदाईच्या कामामुळे पाणीपुरवठा बंद झाल्याचे समोर आले.उभादांडा येथे भूमिगत वीजवाहिन्यांसाठी सुरू असलेल्या खोदाईदरम्यान गणपती मंदिराच्या दिशेने तब्बल तीन ठिकाणी पाण्याची मुख्य जलवाहिनी फुटली होती. त्यामुळे नवाबाग परिसरातील पाणीपुरवठा पूर्णपणे ठप्प झाला होता.ही बाब निदर्शनास येताच शिवसेना पदाधिकारी गणपत केळुसकर, प्रकाश मोटे आणि कार्मिस आल्मेडा यांनी सायंकाळी संबंधित ठेकेदाराशी दूरध्वनीवरून संपर्क साधत या प्रकाराबाबत जाब विचारला. फुटलेली जलवाहिनी तातडीने दुरुस्त करून पाणीपुरवठा पूर्ववत करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. तसेच नागरिकांची गैरसोय दूर करण्यासाठी तात्काळ टँकरद्वारे पाणी उपलब्ध करून देण्याची मागणी केली. त्यानुसार नवाबाग परिसरात टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला.दरम्यान, दिवाळी सण येऊन ठेपला असताना खोदाईच्या कामामुळे बागायत आणि नवाबाग परिसरातील ग्रामस्थांसह वाहनचालकांची गैरसोय होत आहे. त्यामुळे दिवाळी सण संपेपर्यंत खोदाईचे काम पूर्णपणे बंद ठेवावे, अशी मागणी शिवसेना पदाधिकाऱ्यांनी केली. यासाठी संबंधित सुपरवायझरला प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी बोलावून त्याला स्पष्ट सूचना देण्यात आल्या.सणासुदीच्या काळात नागरिकांना त्रास होईल अशा पद्धतीने खोदाईचे काम सुरू ठेवल्यास ते काम शिवसेनेच्या वतीने बंद पाडण्यात येईल, असा ठाम इशाराही पदाधिकाऱ्यांनी दिला.शिवसेना पदाधिकाऱ्यांनी केलेल्या या पाठपुराव्यामुळे नवाबाग परिसरातील ग्रामस्थांना तात्पुरता दिलासा मिळाला असून, टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू झाल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त करत पदाधिकाऱ्यांचे आभार मानले. --- ## पिंगुळी पाझर तलाव बचावाच्या लढ्याला यश; पाचव्या दिवशी उपोषण मागे! - **URL**: https://jagrutmaharashtranews.com/news/pagali-pajhara-talva-bcavacaya-ldhayal-yasha-pacavaya-thavasha-upashhanae-maga - **Published**: 2026-11-06 12:03 - **Category**: सामाजिक - **Author**: दादा सारंग कुडाळ प्रतिनिधी✍️ : पिंगुळी गावाची जीवनवाहिनी असलेल्या ऐतिहासिक पाझर तलावाच्या संरक्षणासाठी ग्रामस्थांनी उभारलेल्या लढ्याला अखेर यश आले आहे. पाझर तलावाच्या संरक्षणासह देऊळवाडी येथील सर्वे क्रमांक २८/१ आणि २८/२ मधील २७५ भूखंडांच्या लेआउटला दिलेली अंतिम रेखांकन परवानगी रद्द करणे, यासह विविध मागण्यांसाठी जिल्हा परिषद सदस्य गंगाराम सडवेलकर यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेले बेमुदत उपोषण पाचव्या दिवशी मागे घेण्यात आले. प्रभारी उपविभागीय अधिकारी सचिन पाटील यांनी ग्रामस्थांच्या मागण्यांबाबत लेखी आश्वासन दिल्यानंतर सडवेलकर यांनी लिंबू सरबत घेऊन उपोषण सोडले. या निर्णयानंतर ग्रामस्थांनी कारीट फोडून आणि पोहे वाटून आनंदोत्सव साजरा केला.पिंगुळी पाझर तलाव परिसरात प्रस्तावित असलेल्या बंगलो प्रकल्पामुळे ऐतिहासिक तलावाच्या अस्तित्वाला धोका निर्माण होण्याची भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली होती. तसेच प्रकल्पातील सांडपाण्यामुळे तलावाचे पाणी दूषित होण्याची शक्यता असून, तलावाकडे जाणारे पारंपरिक रस्ते विकासकाने बंद केल्याचा आरोपही करण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर तलावाचे संरक्षण, शेतकऱ्यांच्या वहिवाटीचे रस्ते खुले करणे आणि संबंधित बांधकामाला स्थगिती देणे अशा विविध मागण्यांसाठी ग्रामस्थांनी कुडाळ उपविभागीय कार्यालयासमोर आंदोलन सुरू केले होते.उपोषणकर्ते आणि प्रशासन यांच्यात झालेल्या चर्चेनंतर प्रशासनाने संबंधित विकासकाला काही महत्त्वपूर्ण सूचना दिल्या. याबाबतचे लेखी पत्र प्रभारी उपविभागीय अधिकारी सचिन पाटील यांनी उपोषणकर्ते गंगाराम सडवेलकर यांना सुपूर्द केले.या पत्रानुसार, स्थानिक शेतकऱ्यांच्या वहिवाटीच्या रस्त्यांवर त्यांना वापरण्यास कोणताही अडथळा निर्माण करू नये. असे रस्ते बंद केले असल्यास ते तात्काळ खुले करून द्यावेत. पाझर तलावातील पाणी ग्रामस्थ पिण्यासाठी वापरत असल्याने ते कोणत्याही प्रकारे प्रदूषित होणार नाही, याची योग्य ती दक्षता घ्यावी. तसेच लगतचे सार्वजनिक पाण्याचे स्रोत आटणार नाहीत किंवा त्यांना कोणतीही बाधा पोहोचणार नाही, याची कटाक्षाने काळजी घ्यावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.याशिवाय संबंधित मिळकतीमध्ये सुरू असलेली बांधकामे वरील मुद्द्यांच्या अनुषंगाने योग्य ती कार्यवाही होईपर्यंत स्थगित ठेवण्याचे निर्देशही विकासकाच्या अधिकृत प्रतिनिधीला देण्यात आले आहेत.प्रभारी उपविभागीय अधिकारी सचिन पाटील यांच्या हस्ते लिंबू सरबत घेऊन गंगाराम सडवेलकर यांनी उपोषण मागे घेतले. यावेळी उपस्थित ग्रामस्थांनी 'पिंगुळी एकजुटीचा विजय असो' अशा घोषणा देत आनंद व्यक्त केला. कारीट फोडून आणि पोहे वाटून या यशाचा जल्लोष करण्यात आला.यावेळी बोलताना गंगाराम सडवेलकर यांनी या लढ्याला सहकार्य करणारे ग्रामस्थ, प्रशासन, सर्व लोकप्रतिनिधी, पर्यावरणप्रेमी, पत्रकार आणि आंदोलनात सहभागी झालेल्या सर्वांचे आभार मानले. सर्वांच्या एकजुटीमुळे आणि सहकार्यामुळेच हा लढा यशस्वी झाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. मात्र, आमदार नीलेश राणे यांनी आपल्यावर केलेल्या आरोपांची खंत कायम राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले.यावेळी माजी आमदार वैभव नाईक, माजी आमदार परशुराम उपरकर, प्रभारी उपविभागीय अधिकारी सचिन पाटील, संजय वेतुरेकर आणि हेमंत देशपांडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी धीरज परब, अभ्या शिरसाट, विजय प्रभू यांच्यासह विविध पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.पिंगुळीच्या ऐतिहासिक पाझर तलावाच्या संरक्षणासाठी ग्रामस्थांनी दाखवलेली एकजूट आणि पाच दिवसांच्या संघर्षानंतर मिळालेले ल --- ## नरकासुर दहनातून सामाजिक प्रबोधनाचा संदेश! शाळा आठवणीतील ग्रुपचा पुढाकार; जमीन विक्री टाळा, पाण्याचा काटकसरीने वापर करा! - **URL**: https://jagrutmaharashtranews.com/news/narakasara-thahanatana-samajaka-parabthhanaca-sathasha-shali-aathavanaetal-garapaca-padhakara-jamana-vakara-tali-panaeyaca-katakasarana-vapara-kara - **Published**: 2026-11-06 05:58 - **Category**: सामाजिक - **Author**: दादा सारंग वेंगुर्ला प्रतिनिधी✍️परूळे : नरकासुर दहनाच्या पारंपरिक उत्सवाला सामाजिक प्रबोधनाची जोड देत शाळा आठवणीतील ग्रुप, परुळे यांच्या वतीने ग्रामस्थांमध्ये जनजागृती करण्यात आली. उत्सवाच्या माध्यमातून गावाच्या भवितव्याशी निगडित महत्त्वाच्या विषयांकडे लक्ष वेधत जमीन आणि पाणी वाचविण्याचा संदेश देण्यात आला.नरकासुर दहनातून वाईट प्रवृत्तींचा नाश करण्याचा संदेश देतानाच गावातील शेतजमिनींची अनावश्यक विक्री थांबविण्याचे आवाहन ग्रुपच्या वतीने करण्यात आले. जमीन ही केवळ मालमत्ता नसून आपल्या पुढील पिढ्यांसाठी जपून ठेवण्याचा अनमोल वारसा आहे. त्यामुळे जमिनीचे महत्त्व ओळखून तिची विक्री टाळावी आणि गावाचा नैसर्गिक व सांस्कृतिक वारसा जतन करावा, असे आवाहन करण्यात आले.त्याचबरोबर सध्या दुष्काळसदृश परिस्थितीचे सावट लक्षात घेता पाण्याचा प्रत्येक थेंब अनमोल असल्याची जाणीव ग्रामस्थांना करून देण्यात आली. पाण्याचा वापर जपून करावा, अनावश्यक पाणी वाया घालवू नये तसेच जलसंधारणाच्या उपाययोजनांना प्राधान्य द्यावे, असा संदेशही यावेळी देण्यात आला.केवळ पारंपरिक उत्सव साजरा करण्यापुरता मर्यादित न राहता, उत्सवाच्या माध्यमातून गावाच्या भवितव्याबाबत सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न शाळा आठवणीतील ग्रुपने केला. 'जमीन वाचवा, पाणी जपून वापरा आणि गावाचा वारसा पुढील पिढ्यांसाठी सुरक्षित ठेवा' हा महत्त्वपूर्ण संदेश या उपक्रमातून ग्रामस्थांपर्यंत पोहोचविण्यात आला. --- ## चार दिवस उपोषण करूनही जिल्हाधिकारी उपोषणस्थळी फिरकल्या नाहीत! - **URL**: https://jagrutmaharashtranews.com/news/cara-thavasa-upashhanae-kanprnaha-jalhathhakara-upashhanaesathali-farakalya-nahata - **Published**: 2026-11-06 05:45 - **Category**: राजकीय - **Author**: दादा सारंग कुडाळ प्रतिनिधी✍️ : पिंगुळी येथील ऐतिहासिक पाझर तलावाच्या संरक्षणासाठी ग्रामस्थांनी कुडाळ प्रांताधिकारी कार्यालयासमोर सुरू केलेल्या बेमुदत उपोषणाला चार दिवस उलटूनही जिल्हाधिकारी उपोषणस्थळी भेट देण्यासाठी न आल्याने ग्रामस्थांच्या नाराजीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. याबाबत मनसे नेते बाळा नांदगावकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांची भेट घेऊन नाराजी व्यक्त केली. तसेच ग्रामस्थांच्या मागण्या तातडीने मान्य करून उपोषण सोडविण्याचा मार्ग मोकळा करावा, अशी मागणी केली.या शिष्टमंडळात कुडाळ-मालवणचे माजी आमदार वैभव नाईक, माजी आमदार परशुराम उपरकर, मनसे नेते शिरीष सावंत, काँग्रेस तालुकाध्यक्ष अभय शिरसाट, मनसे जिल्हाप्रमुख धिरज परब, श्री. दळवी आदींचा समावेश होता.पिंगुळीतील ऐतिहासिक पाझर तलावाचे अस्तित्व धोक्यात येत असल्याच्या मुद्द्यावरून ग्रामस्थांनी गेल्या चार दिवसांपासून बेमुदत उपोषण सुरू केले आहे. मात्र, ग्रामस्थांच्या मागण्या जाणून घेण्यासाठी जिल्हाधिकारी अद्याप उपोषणस्थळी न आल्याबद्दल शिष्टमंडळाने त्यांच्याकडे विचारणा केली. ग्रामस्थांच्या मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष देऊन त्यांची तातडीने पूर्तता करावी, अशी आग्रही भूमिका यावेळी मांडण्यात आली.दरम्यान, प्रस्तावित गृहनिर्माण प्रकल्पाच्या रेखांकनाबाबत तसेच विकासकाच्या बांधकामाला स्थगिती देण्याचे अधिकृत पत्र देण्याबाबत जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यामुळे पिंगुळी ग्रामस्थांच्या उपोषणाबाबत प्रशासनाकडून पुढील कोणती भूमिका घेतली जाते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. --- ## सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाला घाईघाईने मंजुरी नको; आधी सविस्तर चर्चा करा! - **URL**: https://jagrutmaharashtranews.com/news/sadapanae-parakaraya-parakalpal-ghaiighaiina-majara-naka-aathha-savasatara-caraca-kara - **Published**: 2026-11-06 04:35 - **Category**: प्रशासन - **Author**: दादा सारंग वेंगुर्ला स्वरूपा सौदागर✍️ : वेंगुर्ला शहरातील प्रस्तावित सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाला मंजुरी देण्यापूर्वी त्याबाबत सविस्तर माहिती घेऊन चर्चा करण्याचा निर्णय वेंगुर्ला नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेत घेण्यात आला. यापूर्वी भुयारी गटार योजनेबाबत आलेला अनुभव लक्षात घेता, भविष्यात तशी परिस्थिती पुन्हा निर्माण होऊ नये, यासाठी शासनाने या प्रकल्पासाठी नियुक्त केलेल्या कंपनीच्या प्रतिनिधींना नगरपरिषदेच्या सभागृहात बोलावून प्रकल्पाची संपूर्ण माहिती सादर करण्यास सांगावे. त्यानंतर चर्चा करूनच प्रकल्पाला मंजुरी द्यावी, असे सभेत ठरविण्यात आले.वेंगुर्ला नगरपरिषदेची सर्वसाधारण सभा गुरुवारी नगरपरिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात नगराध्यक्ष दिलीप गिरप यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी मुख्याधिकारी हेमंत किरुळकर, उपनगराध्यक्ष सुहास गवंडळकर, नगरसेवक प्रणव वायांगणकर, सचिन शेटये, सदानंद गिरप, विनय नेरुरकर, संदेश निकम, प्रीतम सावंत, सुधीर पालेकर, रवींद्र शिरसाट, प्रशांत आपटे, दाजी परब, युवराज जाधव, आकांक्षा परब, गौरी मराठे, गौरी माईणकर, काजल कुबल, रिया केरकर, सुमन निकम, शितल आंगचेकर, समिधा रेडकर, लीना म्हापणकर, अॅड. सुषमा प्रभूखानोलकर यांच्यासह नगरपालिकेतील विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते.दरम्यान, वेंगुर्ला शहरात निर्माण होणारी पाणीटंचाई दूर करण्याच्या दृष्टीने नागरिकांना तिलारीचे पाणी उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी दाभोली नाका ते नारायण तलाव अशी नवीन पाईपलाईन टाकण्याच्या प्रस्तावाला सभेत मंजुरी देण्यात आली.तसेच निशाण तलावातून वडखोल परिसराला पाणीपुरवठा करणाऱ्या नळपाणी योजनेची पाईपलाईन जीर्ण झाली असून, तिच्या दुरुस्तीसाठी आमदार दीपक केसरकर यांच्या आमदार निधीतून २५ लाख रुपयांच्या योजनेला मंजुरी देण्यात आली.याशिवाय विधानपरिषद आमदार प्रमोद जठार यांनी आपल्या स्थानिक विकास निधीतून माणिकचौक येथील व्यासपीठाच्या दुरुस्तीसाठी १० लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. या कामासाठी आवश्यक दुरुस्तीचे अंदाजपत्रक तयार करण्याचेही सभेत निश्चित करण्यात आले. --- ## सिंधुदुर्ग पोलीस दलातील चार अंमलदारांना पदोन्नती; पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर यांच्या हस्ते पदोन्नती प्रदान - **URL**: https://jagrutmaharashtranews.com/news/sathhatharaga-palsa-thaltal-cara-amaltharana-pathananata-palsa-athhakashhaka-da-mahana-thahakara-yacaya-hasata-pathananata-parathana - **Published**: 2026-11-05 05:47 - **Category**: प्रशासन - **Author**: दादा सारंग सिंधुदुर्गनगरी प्रतिनिधी✍️: सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस दलातील अंमलदारांना पदोन्नती देऊन त्यांच्या सेवाकार्याचा गौरव करण्यात आला. पोलीस अधीक्षक कार्यालय, सिंधुदुर्ग येथे आयोजित कार्यक्रमात पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर यांच्या शुभहस्ते पदोन्नतीप्राप्त अंमलदारांना पदोन्नती प्रदान करण्यात आली.यामध्ये मपोहवा/४६१ काजोल काशिराम ढवळ यांना सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पदावर, तर पोना/१२०७ फ्रिडन बस्त्याव बुथेलो, पोना/१२१३ प्रदीप गजानन नाईक आणि मपोना/११६१ उज्वला काशिनाथ मांजरेकर यांना पोलीस हवालदार पदावर पदोन्नती देण्यात आली.यावेळी पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर यांनी पदोन्नतीप्राप्त अंमलदारांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. तसेच त्यांच्या पुढील सेवाकार्यासाठी शुभेच्छा दिल्या. पदोन्नतीमुळे संबंधित अंमलदारांमध्ये आनंदाचे वातावरण होते.या कार्यक्रमाला पोलीस अधिकारी, अंमलदार तसेच मंत्रालयीन कर्मचारी उपस्थित होते. सिंधुदुर्ग पोलीस दलातील पदोन्नतीप्राप्त सर्व अंमलदारांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत असून, त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या जात आहेत. --- ## पिंगुळी पाझर तलावाच्या संरक्षणासाठी पर्यावरणप्रेमी एकवटले! - **URL**: https://jagrutmaharashtranews.com/news/pagali-pajhara-talvacaya-sarakashhanaesatha-parayavaranaeparama-ekavatal - **Published**: 2026-11-05 05:40 - **Category**: सामाजिक - **Author**: दादा सारंग कुडाळ प्रतिनिधी✍️ : पिंगुळी येथील ऐतिहासिक पाझर तलावाच्या संरक्षणासाठी आता पर्यावरणप्रेमींनी पुढाकार घेतला असून, तलाव परिसरात सुरू असलेला बांधकाम प्रकल्प तातडीने बंद करण्याची मागणी केली आहे. तलाव नैसर्गिक असो किंवा मानवनिर्मित, त्याला पाणथळ जागा (वेटलँड) संरक्षणाचे नियम लागू होतात. केवळ संबंधित जागेचे अधिकृत नोटिफिकेशन झालेले नाही, या कारणावरून नियमांची अंमलबजावणी टाळता येणार नाही, अशी ठाम भूमिका पर्यावरणप्रेमी सचिन देसाई यांनी मांडली. गोवा राज्याने २० पाणथळ जागांचे नोटिफिकेशन केले असताना महाराष्ट्रात मात्र एकाही जागेचे नोटिफिकेशन झालेले नसल्याबद्दल त्यांनी खेद व्यक्त केला.पिंगुळी पाझर तलाव बचाव आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बुधवारी सायंकाळी कुडाळ एमआयडीसी विश्रामगृह येथे पर्यावरणप्रेमींची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी सचिन देसाई यांच्यासह रानमाणूस प्रसाद गावडे, प्रा. डॉ. योगेश कोळी, अॅड. ओंकार केणी, मंगल डिसूझा, अनिल गावडे, मंदार गावडे आणि सर्वेश पेडणेकर उपस्थित होते.पत्रकार परिषदेत सचिन देसाई यांनी पाणथळ जागा अधिनियम आणि त्याअंतर्गत असलेल्या संरक्षणात्मक नियमांची माहिती दिली. सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकूण ४३३ पाणथळ जागा असून, त्यापैकी ५७ जागा गोड्या पाण्याचे स्रोत आहेत. न्यायालयाच्या आदेशानुसार या जलस्रोतांचे संरक्षण करण्याची जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. पिंगुळी पाझर तलावाच्या पाणलोट क्षेत्रात सुमारे २७५ बंगल्यांचा प्रकल्प प्रस्तावित असल्याचे सांगत, या प्रकल्पातून निर्माण होणाऱ्या सांडपाण्यामुळे तलावातील पाणी प्रदूषित होण्याचा धोका असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.जगातील उपलब्ध पाण्यापैकी केवळ एक टक्का पाणी गोड्या पाण्याच्या स्वरूपात उपलब्ध आहे. त्यामुळे अशा जलस्रोतांचे संवर्धन करणे अत्यंत आवश्यक आहे, असे देसाई म्हणाले. जिल्ह्यातील वालावल, पाट आणि धामापूर तलाव परिसरातही पाणथळ जागा संरक्षण नियमांचे उल्लंघन होत असल्याचा आरोप त्यांनी केला. एकट्या धामापूर तलाव परिसरात नियमांचे १६ उल्लंघन झाल्याची माहितीही त्यांनी दिली. त्यामुळे पिंगुळी तलावाच्या पर्यावरणाचे आणि जलस्रोतांचे संरक्षण करण्यासाठी संबंधित बांधकाम प्रकल्प तातडीने थांबवावा, अशी मागणी त्यांनी केली.रानमाणूस प्रसाद गावडे यांनी जिल्ह्यातील नैसर्गिक जलस्रोतांच्या संरक्षणाकडे शासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप केला. कर्नाटकातून येणारे पाणी दोडामार्ग तालुक्यातील विर्डी येथे वरच्या बाजूला बांध घालून अडविले जात असल्याचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला. तसेच तिलारी नदीचे पाणी पाइपलाइनद्वारे चिपी विमानतळासाठी आणले जात असल्याने त्या मार्गावरील जमिनींचे व्यवहार होत असल्याचे त्यांनी सांगितले. दोडामार्ग तालुक्यातील तेरेखोल नदीच्या उगमस्थानाजवळ असलेल्या घारपी गावात सुमारे दोन हजार एकर क्षेत्रावर रबर लागवडीचा प्रकल्प सुरू असल्याचा दावाही त्यांनी केला. पाणथळ जागांचे संरक्षण हा केवळ पर्यावरणाचा विषय नसून सर्वसामान्यांच्या जगण्याशी निगडित प्रश्न असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.मंदार गावडे यांनी पिंगुळी पाझर तलाव परिसरातील सुरू असलेल्या बांधकामांवरून जिल्हा प्रशासनाला धारेवर धरले. तलावाच्या पाणलोट क्षेत्रात बांधकामे सुरू असताना जिल्हाधिकारी आणि तहसीलदार नेमकी कोणती भूमिका घेत आहेत, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. प्रस्तावित बंगल्यांमधून निर्माण होणाऱ्या सांडपाण्याची विल्हेवाट कशी लावली जाणार, याबाबतही त्यांनी प्रश्न उपस्थित केला. केवळ निवेदने स्वीकारून प्रशासनाची जबाबदारी संपत नाही, तर प्रत्यक्ष का --- ## वेंगुर्ला तुळस-पलतड येथे घोणस सापाचे सर्पमित्र महेश राऊळ यांनी केले सुरक्षित रेस्क्यू - **URL**: https://jagrutmaharashtranews.com/news/vagaral-talisa-paltada-yatha-ghanaesa-sapaca-sarapamatara-mahasha-rauuli-yana-kal-sarakashhata-rasakaya - **Published**: 2026-11-05 04:41 - **Category**: सामाजिक - **Author**: दादा सारंग वेंगुर्ला प्रतिनिधी✍️ : वेंगुर्ला तालुक्यातील तुळस-पलतड येथे छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी संघटना सिंधुदुर्गचे जिल्हाध्यक्ष तुषार राय यांच्या शेतमांगराच्या बाजूला अत्यंत विषारी घोणस साप आढळून आला. या सापाला सर्पमित्र महेश राऊळ यांनी सुरक्षितपणे रेस्क्यू केले.घोणस अर्थात रसेल वायपर (Russell's Viper) हा महाराष्ट्रासह कोकणात आढळणाऱ्या अत्यंत विषारी सापांपैकी एक आहे. भारतातील 'बिग फोर' या चार प्रमुख विषारी सापांच्या यादीत त्याचा समावेश होतो. या सापाचा रंग पिवळसर तपकिरी असून, शरीरावर गडद तपकिरी रंगाचे तीन रांगांमध्ये साखळीसारखे गोलाकार ठिपके असतात. त्याचे डोके त्रिकोणी, मोठे आणि मानेपासून वेगळे दिसणारे असते. डोळ्यांची बाहुली उभी असते. साधारणपणे या सापाची लांबी तीन ते पाच फुटांपर्यंत असते असे महेश राऊळ यांनी सांगितले.घोणस साप डसण्यापूर्वी कुकरच्या शिट्टीसारखा 'फुस्स... फुस्स...' असा मोठा आवाज काढतो. हा आवाज म्हणजे त्याच्याकडून दिला जाणारा धोक्याचा इशारा असतो. शेतातील गवत, दगडांचे ढिगारे, उंदरांची बिळे अशा ठिकाणी तो आढळतो. उंदीर हे त्याचे प्रमुख खाद्य असल्याने तो अनेकदा शेतात तसेच मानवी वस्तीजवळही येतो.घोणस साप तुलनेने संथ हालचाल करणारा असला तरी तो अत्यंत चिडखोर स्वभावाचा असतो. धोका जाणवल्यास तो पळून जाण्याऐवजी जागेवरच गुंडाळी करून बसतो आणि जवळ गेल्यास वेगाने हल्ला करू शकतो. त्याचे विषारी दातही लांब असतात. थंडीच्या दिवसांत प्रजननाशी संबंधित हालचालींमुळे एकाच परिसरात दोन-तीन किंवा त्यापेक्षा अधिक घोणस साप आढळण्याची शक्यता असते.या सापाचे विष हिमोटॉक्सिक (Hemotoxic) स्वरूपाचे असून, त्याच्या दंशामुळे शरीरातील रक्ताभिसरण आणि रक्त गोठण्याच्या प्रक्रियेवर गंभीर परिणाम होऊ शकतो. इतर अनेक सापांप्रमाणे घोणस अंडी बाहेर घालत नाही, तर तो थेट पिल्लांना जन्म देतो. मात्र, तो सस्तन प्राणी नसून त्याच्या शरीरातच अंड्यांचा विकास होऊन पिल्ले जन्माला येतात.घोणस हा अत्यंत विषारी साप असल्याने नागरिकांनी त्याला स्वतः पकडण्याचा किंवा मारण्याचा प्रयत्न करू नये असे राऊळ यांनी म्हटले आहे. साप आढळल्यास सुरक्षित अंतर राखून प्रशिक्षित सर्पमित्रांशी संपर्क साधावा, असे आवाहनही यावेळी करण्यात येत आहे. --- ## आकाश फिश मिलच्या मच्छी वाहतूक करणाऱ्या गाड्यांचा बंदोबस्त करा! - **URL**: https://jagrutmaharashtranews.com/news/aakasha-fasha-malcaya-macachha-vahataka-karanaeriya-gadayaca-bthabsata-kara - **Published**: 2026-11-05 04:13 - **Category**: सामाजिक - **Author**: दादा सारंग कुडाळ प्रतिनिधी✍️ : केळूस येथील आकाश फिश मिल कंपनीच्या मच्छी वाहतूक करणाऱ्या वाहनांमधून दुर्गंधीयुक्त पाणी रस्त्यावर सांडत असल्याने परिसरात दुर्गंधीचे साम्राज्य पसरत आहे. या प्रकारामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असून, संबंधित वाहतुकीवर नियंत्रण आणण्यासाठी पंचक्रोशीतील ग्रामस्थांचे शिष्टमंडळ घेऊन जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांची भेट घेणार असल्याची माहिती माजी पंचायत समिती सदस्य अतुल बंगे यांनी दिली.गेल्या काही दिवसांपासून पहाटेच्या वेळी मच्छी वाहतूक करणाऱ्या गाड्यांची या परिसरातून मोठ्या प्रमाणात ये-जा सुरू आहे. म्हापण, पाट, हुमरमळा आणि माड्याचीवाडी या मार्गांवरून जाताना गाड्यांमधील मच्छीचे पाणी रस्त्यावर पडत असल्याने सर्वत्र दुर्गंधी पसरत आहे. यामुळे स्थानिक नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत असून, अस्वच्छतेमुळे रोगराई पसरण्याची भीतीही व्यक्त होत आहे.केळूस येथील आकाश फिश मिल कंपनीबाबत यापूर्वीही वारंवार तक्रारी झाल्या आहेत. त्यातच आता मच्छी वाहतूक करणाऱ्या वाहनांमधून दुर्गंधीयुक्त पाणी रस्त्यावर सांडण्याच्या प्रकारामुळे नागरिकांच्या समस्येत आणखी भर पडली आहे.या गंभीर समस्येची प्रशासनाने तातडीने दखल घ्यावी, मच्छी वाहतूक करणाऱ्या गाड्यांमधून रस्त्यावर पाणी सांडणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश द्यावेत आणि संबंधित प्रकाराला आळा घालावा, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात येणार असल्याचे अतुल बंगे यांनी स्पष्ट केले. --- ## बंद पडलेली महालॅबची प्रयोगशाळा व रक्तनमुना संकलन सेवा तातडीने सुरू करा! - **URL**: https://jagrutmaharashtranews.com/news/btha-padall-mahalbca-parayagashali-va-rakatanamana-sakalna-sava-tatadana-sanpr-kara - **Published**: 2026-11-04 14:38 - **Category**: राजकीय - **Author**: दादा सारंग कुडाळ प्रतिनिधी✍️ : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ३८ प्राथमिक आरोग्य केंद्रे तसेच आपला दवाखाना येथे महालॅबच्या माध्यमातून सुरू असलेली प्रयोगशाळा तपासणी आणि रक्तनमुना संकलन सेवा बंद झाल्याने रुग्णांची मोठी गैरसोय होत आहे. संबंधित सेवा पुरविणाऱ्या एचएलएल कंपनीची गेल्या दोन वर्षांपासूनची देयके महायुती सरकारकडून थकीत असल्यामुळे ही सेवा बंद पडल्याचा आरोप करण्यात येत आहे. त्यामुळे रुग्णांना खासगी प्रयोगशाळांमध्ये तपासण्या कराव्या लागत असून, आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि गरजू रुग्णांना त्याचा मोठा आर्थिक फटका बसत आहे.या पार्श्वभूमीवर कुडाळ-मालवणचे माजी आमदार वैभव नाईक यांनी सिंधुदुर्ग जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सई धुरी यांची भेट घेऊन या प्रश्नावर चर्चा केली. तसेच सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधत बंद पडलेली महालॅबची प्रयोगशाळा तपासणी व रक्तनमुना संकलन सेवा तातडीने पूर्ववत करण्याची मागणी केली.शासकीय आरोग्य केंद्रांमध्ये उपलब्ध असलेल्या या सुविधांचा लाभ जिल्ह्यातील सर्वसामान्य, गरीब व गरजू रुग्णांना होत होता. मात्र, सेवा बंद झाल्यामुळे रुग्णांना तपासण्यांसाठी खासगी प्रयोगशाळांवर अवलंबून राहावे लागत आहे. त्यामुळे आर्थिक परिस्थिती बेताची असलेल्या रुग्णांची मोठी अडचण निर्माण झाली आहे. ही बाब लक्षात घेऊन आरोग्य विभागाने तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी वैभव नाईक यांनी केली.दरम्यान, आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत महालॅबची सेवा लवकरात लवकर सुरू करण्याची ग्वाही दिली.यावेळी शिवसेना आडवली-मालडी विभागप्रमुख अमित फोंडके, भगवान परब आदी उपस्थित होते. --- ## वसुबारस दिनी गोमातेचे पूजन करून कृतज्ञता व्यक्त करा : प्रसन्ना देसाई यांचे आवाहन - **URL**: https://jagrutmaharashtranews.com/news/vasabrasa-thana-gamataca-pajana-kanprna-katajaniata-vayakata-kara-parasanana-thasaii-yaca-aavahana - **Published**: 2026-11-04 12:51 - **Category**: सामाजिक - **Author**: दादा सारंग वेंगुर्ला प्रतिनिधी✍️: भारतीय संस्कृतीमध्ये गाईला अनन्यसाधारण महत्त्व असून, दिवाळीच्या प्रारंभी साजऱ्या होणाऱ्या वसुबारस सणाला विशेष महत्त्व आहे. या दिवशी प्रत्येकाने गोमातेचे विधिवत पूजन करून तिच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करावी, असे आवाहन भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना देसाई यांनी केले आहे.महाराष्ट्र शासनाने ३० सप्टेंबर २०२४ रोजी देशी गाईला 'गोमाता-राज्यमाता' असा दर्जा दिला आहे. भारतीय संस्कृतीत गाईला पूजनीय मानले जाते. शेती, दुग्धव्यवसाय, सेंद्रिय खतनिर्मिती आणि पर्यावरण संवर्धनामध्ये गोवंशाचे मोठे योगदान आहे. पूर्वी गोधन हे सुखी आणि समृद्ध जीवनाचे प्रतीक मानले जात असे.बदलत्या जीवनशैलीमुळे गोपालनाची परंपरा हळूहळू कमी होत असताना गोमातेचे महत्त्व आणि गोवंश संवर्धनाची गरज समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. वसुबारसच्या दिवशी गोमातेचे पूजन करून तिला ओवाळावे, गाय व वासराला गोडधोड खाऊ घालावे आणि गोपालन करणाऱ्या शेतकऱ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करावी.तसेच परिसरातील गोशाळांना भेट देऊन गोसंवर्धनासाठी कार्य करणाऱ्या संस्था व व्यक्तींना प्रोत्साहन द्यावे. गोपालन आणि देशी गोवंश संवर्धनासाठी प्रत्येकाने आपापल्या परीने योगदान द्यावे.वसुबारस हा केवळ सण न राहता गोमातेप्रती आदर, प्रेम आणि कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस ठरावा. जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी ५ नोव्हेंबर रोजी वसुबारस सणानिमित्त गोमातेचे पूजन करून ही संस्कृती आणि परंपरा जपावी, असे आवाहन प्रसन्ना देसाई यांनी केले आहे. --- ## प्रसूतीनंतर अवघ्या दोन दिवसांत २५० किलोमीटरचा प्रवास; २३ वर्षीय आदिवासी तरुणी बनली दिवाणी न्यायाधीश! - **URL**: https://jagrutmaharashtranews.com/news/parasatanatara-avaghaya-thana-thavasata-kalmataraca-paravasa-varashhaya-aathavasa-taranae-bnal-thavanae-nayayathhasha - **Published**: 2026-11-04 12:21 - **Category**: आंतरराष्ट्रीय - **Author**: दादा सारंग काही महिलांसाठी मातृत्वानंतरची सुरुवातीची काही दिवसांची विश्रांतीही मोठे आव्हान असते. मात्र, तमिळनाडूतील एका २३ वर्षीय आदिवासी तरुणीने प्रसूतीनंतर अवघ्या दोन दिवसांत तब्बल २५० किलोमीटरचा प्रवास करून परीक्षा दिली आणि आपल्या जिद्दीच्या बळावर दिवाणी न्यायाधीशपदाला गवसणी घातली. व्ही. श्रीपती यांची ही यशोगाथा आजच्या तरुण पिढीसह प्रत्येक महिलेसाठी प्रेरणादायी ठरत आहे.तमिळनाडूतील येलगिरी आणि जवाधू टेकड्यांच्या परिसरातील आदिवासी समाजातून आलेल्या व्ही. श्रीपती यांनी तमिळनाडू लोकसेवा आयोगामार्फत (TNPSC) घेण्यात आलेल्या दिवाणी न्यायाधीश परीक्षेत यश मिळवले. या यशासह मल्याळी आदिवासी समुदायातील पहिल्या महिला दिवाणी न्यायाधीश होण्याचा ऐतिहासिक मान त्यांनी मिळवला.प्रसूतीनंतरही जिद्द कायम; २५० किलोमीटरचा प्रवासश्रीपती यांच्या संघर्षातील सर्वांत उल्लेखनीय प्रसंग म्हणजे त्यांच्या परीक्षेचा. नोव्हेंबर २०२३ मध्ये दिवाणी न्यायाधीश पदाच्या मुख्य परीक्षेच्या अवघ्या दोन दिवस आधी त्यांनी एका गोंडस मुलीला जन्म दिला. प्रसूतीनंतर शरीराला विश्रांतीची गरज असताना आणि शारीरिक त्रास सहन करावा लागत असतानाही त्यांनी आपल्या ध्येयापासून माघार घेतली नाही.पती आणि कुटुंबीयांच्या सहकार्याने त्यांनी प्रसूतीनंतर अवघ्या दोन दिवसांत सुमारे २५० किलोमीटरचा प्रवास केला. चेन्नई येथील परीक्षा केंद्रावर पोहोचून त्यांनी परीक्षा दिली. मातृत्वाची जबाबदारी आणि न्यायाधीश होण्याचे स्वप्न या दोन्ही गोष्टींचा समतोल साधत त्यांनी दाखवलेली जिद्द खरोखरच कौतुकास्पद आहे.डोंगराळ भागातून न्यायाधीशपदापर्यंतची भरारीयेलगिरीच्या दुर्गम डोंगराळ भागात श्रीपती यांनी आपले प्राथमिक आणि शालेय शिक्षण पूर्ण केले. प्रतिकूल परिस्थिती आणि मर्यादित संधी असूनही त्यांनी शिक्षणाची वाट सोडली नाही. पुढे कायद्याचे शिक्षण पूर्ण करून न्यायाधीश होण्याचे स्वप्न उराशी बाळगले. विवाह आणि मातृत्वानंतरही त्यांनी अभ्यासातील सातत्य कायम ठेवले आणि अखेर आपल्या मेहनतीचे चीज करून दाखवले.त्यांच्या या ऐतिहासिक यशाची दखल तत्कालीन मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनीही घेतली होती. त्यांनी श्रीपती यांचे विशेष कौतुक केले. त्यांच्या यशामुळे आदिवासी समाजासह संपूर्ण तमिळनाडूमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले.जिद्दीपुढे परिस्थितीही झुकते!व्ही. श्रीपती यांची कहाणी केवळ एका परीक्षेत मिळवलेल्या यशाची नाही, तर प्रतिकूल परिस्थितीशी दोन हात करत स्वप्नांचा पाठपुरावा करणाऱ्या एका कर्तृत्ववान महिलेच्या संघर्षाची आहे. मातृत्व, कौटुंबिक जबाबदाऱ्या आणि शारीरिक अडचणी या कोणत्याही गोष्टीला त्यांनी आपल्या ध्येयाच्या आड येऊ दिले नाही.आज अनेक तरुणींसमोर शिक्षण, करिअर आणि कौटुंबिक जबाबदाऱ्यांचा समतोल साधण्याचे आव्हान असते. अशा वेळी श्रीपती यांचा प्रवास प्रत्येकासाठी प्रेरणादायी ठरतो. परिस्थिती कितीही कठीण असली, तरी मनात जिद्द, कष्ट करण्याची तयारी आणि कुटुंबीयांची साथ असेल तर अशक्य वाटणारे ध्येयही साध्य करता येते, हे त्यांनी आपल्या कर्तृत्वातून सिद्ध केले आहे.व्ही. श्रीपती यांच्या या ऐतिहासिक आणि प्रेरणादायी यशाला मनःपूर्वक सलाम! --- ## आधी राणेंच्या कंपन्यांनी घेतलेल्या ४० एकर जागेत उद्योग सुरू करा; मगच २१ व्या शतकातील एमआयडीसीच्या बाता मारा! - **URL**: https://jagrutmaharashtranews.com/news/aathha-ranaecaya-kapanayana-ghatallya-ekara-jagata-uthayaga-sanpr-kara-magaca-vaya-shatakatal-emaaayadasacaya-bta-mara - **Published**: 2026-11-04 09:24 - **Category**: राजकीय - **Author**: दादा सारंग कुडाळ प्रतिनिधी✍️ : २१ व्या शतकातील कुडाळ एमआयडीसी साकारण्याची घोषणा करणाऱ्या आमदार निलेश राणे यांनी आधी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एमआयडीसीमध्ये त्यांच्या कुटुंबीयांच्या कंपन्यांनी घेतलेल्या सुमारे ४० एकर जागेवर उद्योग सुरू करून दाखवावेत. त्यानंतरच नव्या एमआयडीसीच्या विकासाच्या बाता माराव्यात, असा जोरदार टोला कुडाळ-मालवणचे माजी आमदार वैभव नाईक यांनी लगावला आहे. तसेच एमआयडीसीतील ३० कोटींच्या रस्त्याच्या कामात निलेश राणे यांचे कमिशन किती, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.आमदार निलेश राणे यांनी नुकतेच २१ व्या शतकातील कुडाळ एमआयडीसी साकारण्याचे वक्तव्य केले होते. यावर प्रतिक्रिया देताना वैभव नाईक म्हणाले की, नारायण राणे यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीत मुख्यमंत्री, महसूलमंत्री, उद्योगमंत्री, सिंधुदुर्गचे पालकमंत्री, राज्यसभा खासदार तसेच केंद्रीय सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगमंत्री अशी महत्त्वाची पदे भूषविली. मात्र, एवढ्या मोठ्या संधी मिळूनही मागील ३६ वर्षांत कुडाळ एमआयडीसी किंवा जिल्ह्यातील अन्य एमआयडीसीमध्ये अपेक्षित उद्योग आणण्यात त्यांना यश आले नाही. आता कुडाळ एमआयडीसीच्या विकासाबाबत बोलणे म्हणजे त्यांच्या आधीच्या कारभारातील अपयशावरच शिक्कामोर्तब करण्यासारखे आहे.याउलट, निलेश राणे खासदार असताना आणि नारायण राणे उद्योगमंत्री असताना राणे कुटुंबीयांशी संबंधित कंपन्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एमआयडीसीमध्ये सुमारे ४० एकर जागा घेतली. मात्र, या जागांवर आजपर्यंत रोजगारनिर्मिती करणारे उद्योग सुरू झालेले नाहीत. त्यामुळे नव्या घोषणा करण्यापूर्वी या जागांवर प्रत्यक्ष उद्योग सुरू करून स्थानिकांना रोजगार उपलब्ध करून द्यावा, असे आव्हान नाईक यांनी दिले.माझ्या कार्यकाळात प्रत्यक्ष उद्योग सुरू केले!आपल्या आमदारकीच्या काळातील कामांचा उल्लेख करताना नाईक म्हणाले की, आपण केवळ घोषणा न करता कुडाळ एमआयडीसीमध्ये विविध उद्योग सुरू करण्यासाठी प्रयत्न केले. त्यातून बजाज राईस मिल, गोदरेज कंपनी, दोन काजू प्रक्रिया उद्योग, काथ्या उद्योग, दोन वॉटर बॉटल कंपन्या तसेच ग्रँफिशर नेट्स या मत्स्यजाळी निर्मिती करणाऱ्या कंपनीसह विविध उद्योग सुरू झाले. उद्योजकांना एमआयडीसीमध्ये जागा आणि आवश्यक सुविधा सहज उपलब्ध व्हाव्यात, यासाठी आपण सातत्याने प्रयत्न केले. या उद्योगांमुळे आजही अनेक स्थानिक युवक आणि नागरिकांना रोजगार मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.राजकीय हस्तक्षेपामुळे उद्योजकांना अडचणीगेल्या साडेतीन वर्षांत महायुती सरकार सत्तेत आल्यापासून एमआयडीसीमधील राजकीय हस्तक्षेप वाढला आहे. त्यामुळे स्थानिक उद्योजकांना जागा आणि आवश्यक सुविधा मिळण्यात अडचणी येत आहेत. परिणामी नवीन स्थानिक उद्योजक एमआयडीसीमध्ये उद्योग सुरू करण्यास पुढे येत नाहीत. मात्र, निलेश राणे आमदार झाल्यापासून परप्रांतीय व्यक्तींना व्यावसायिक जागा तातडीने उपलब्ध करून दिल्या जात असल्याचा आरोपही नाईक यांनी केला.आपल्या दहा वर्षांच्या आमदारकीच्या काळात मतदारसंघाच्या विकासासाठी अनेक कामे केली; मात्र त्याची कधीही जाहिरातबाजी केली नाही. मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करणे ही आमदार म्हणून आपली जबाबदारी होती. असे असताना आपण दहा वर्षांत काहीच केले नाही, असे वारंवार सांगून निलेश राणे जनतेमध्ये आपल्याबाबत चुकीचे चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र, आपण किती कामे केली आणि जनतेसाठी किती वेळ उपलब्ध होतो, हे मतदारसंघातील जनतेला चांगलेच ठाऊक आहे, असे वैभव नाईक यांनी स्पष्ट केले. --- ## सावंतवाडी रेल्वे स्थानकात जागा उपलब्ध, तरीही अतिरिक्त प्लॅटफॉर्म आणि लूपलाईनचे काम रखडले! - **URL**: https://jagrutmaharashtranews.com/news/savatavada-ralva-sathanakata-jaga-upalbthha-taraha-atarakata-paltafarama-aanae-lpaliinaca-kama-rakhadal - **Published**: 2026-11-04 09:19 - **Category**: प्रशासन - **Author**: दादा सारंग सावंतवाडी प्रतिनिधी✍️ : सावंतवाडी रेल्वे स्थानकाच्या विकासाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. स्थानकासमोरील प्लॅटफॉर्म क्रमांक ३ च्या बाजूला मोठ्या प्रमाणात मोकळी जागा उपलब्ध असतानाही अतिरिक्त प्लॅटफॉर्म आणि लूपलाईन उभारण्याचे काम अद्याप सुरू झालेले नाही. त्यामुळे उपलब्ध जागेचा उपयोग करूनही महत्त्वाची विकासकामे मार्गी का लागत नाहीत, असा सवाल रेल्वे प्रवाशांकडून उपस्थित केला जात आहे. रेल्वे प्रशासनाची उदासीनता की लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष, असा प्रश्नही आता चर्चेत आला आहे.सावंतवाडी रेल्वे स्थानक हे कोकणातील प्रवाशांसाठी महत्त्वाचे केंद्र आहे. दिवसेंदिवस रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढत असून, भविष्यातील प्रवासी वाहतुकीचा विचार करता स्थानकाच्या पायाभूत सुविधांचा विस्तार करणे आवश्यक बनले आहे. अधिक गाड्यांची वाहतूक सुरळीत होण्यासाठी अतिरिक्त प्लॅटफॉर्म, लूपलाईन आणि अन्य आवश्यक सुविधा निर्माण करण्याची मागणी सातत्याने केली जात आहे.विशेष म्हणजे, प्लॅटफॉर्म क्रमांक ३ च्या शेजारी विस्तारासाठी पुरेशी मोकळी जागा उपलब्ध असल्याचे दिसून येत आहे. असे असतानाही अतिरिक्त प्लॅटफॉर्म आणि लूपलाईनच्या कामाला अद्याप सुरुवात झालेली नाही. त्यामुळे या कामांच्या अंमलबजावणीत नेमकी अडचण काय आहे, याबाबत प्रवाशांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.दरम्यान, सावंतवाडी रेल्वे टर्मिनसचे काम पूर्ण करण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून प्रयत्न आणि पाठपुरावा सुरू आहे. मात्र, अद्याप हा प्रकल्प पूर्णत्वास गेलेला नसल्याने स्थानिक नागरिक, प्रवासी आणि रेल्वेप्रेमींमध्ये नाराजी वाढत आहे. टर्मिनसच्या कामाला अपेक्षित गती मिळत नसल्याने सावंतवाडीच्या रेल्वे विकासाचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.कोकण रेल्वे प्रवासी संघटना, सावंतवाडी यांच्याकडूनही अतिरिक्त प्लॅटफॉर्म, लूपलाईन आणि रेल्वे टर्मिनसच्या प्रश्नावर सातत्याने पाठपुरावा केला जात आहे. मात्र, संघटनेच्या मागण्यांनंतरही प्रत्यक्ष कामाला सुरुवात होत नसल्याने रेल्वे प्रशासनाने या विषयाकडे गांभीर्याने लक्ष देण्याची आवश्यकता व्यक्त होत आहे.मोकळी जागा उपलब्ध आहे, प्रवाशांची मागणी सातत्याने होत आहे आणि प्रवासी संघटनेकडूनही पाठपुरावा सुरू आहे. असे असतानाही अतिरिक्त प्लॅटफॉर्म आणि लूपलाईनचे काम नेमके कोणत्या कारणामुळे रखडले आहे, याचा खुलासा रेल्वे प्रशासनाने करावा, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे. तसेच संबंधित लोकप्रतिनिधींनीही या प्रश्नात लक्ष घालून विकासकामांसाठी ठोस प्रयत्न करावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.सावंतवाडी रेल्वे स्थानकाचा वाढता प्रवासी भार लक्षात घेता आता तरी या विकासकामांना प्राधान्य देऊन अतिरिक्त प्लॅटफॉर्म आणि लूपलाईनचे काम मार्गी लावावे, तसेच अपूर्ण रेल्वे टर्मिनसचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे, अशी जोरदार मागणी रेल्वे प्रवाशांमधून होत आहे. --- ## लेखी आश्वासनाशिवाय उपोषण मागे घेणार नाही; गंगाराम सडवेलकर यांची ठाम भूमिका - **URL**: https://jagrutmaharashtranews.com/news/lkha-aashavasanashavaya-upashhanae-maga-ghanaera-naha-gagarama-sadavalkara-yaca-thama-bhamaka - **Published**: 2026-11-04 09:07 - **Category**: राजकीय - **Author**: दादा सारंग कुडाळ प्रतिनिधी✍️ : पिंगुळी येथील पाझर तलावावरील कथित अतिक्रमण हटवून तलावाचे संरक्षण करण्याच्या मागणीसाठी जिल्हा परिषद सदस्य गंगाराम सडवेलकर यांनी सुरू केलेले बेमुदत उपोषण दुसऱ्या दिवशीही सुरूच राहिले. प्रशासनाकडून देण्यात आलेल्या तोंडी आश्वासनावर ग्रामस्थांनी समाधान व्यक्त न करता ठोस निर्णयाचे लेखी पत्र मिळेपर्यंत आंदोलन मागे न घेण्याचा निर्धार केला. दरम्यान, तलावाच्या मोजणीसंदर्भात लघुपाटबंधारे विभाग आणि भूमिअभिलेख विभाग यांच्यात समन्वय नसल्याचे चर्चेदरम्यान स्पष्ट झाल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी पसरली.'पाझर तलाव आमच्या हक्काचा, नाही कुणाच्या बापाचा', 'पाझर तलावावर अतिक्रमण करणाऱ्यांचे करायचे काय, खाली डोकं वर पाय' अशा घोषणांनी मंगळवारी कुडाळ तहसील कार्यालयाचा परिसर दणाणून गेला. दिवसभर प्रशासनाकडून ठोस निर्णय न झाल्याने सायंकाळच्या सुमारास संतप्त ग्रामस्थांनी तहसील कार्यालयात जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, प्रवेशद्वारावर बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांनी त्यांना अडविले. यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.परिस्थिती लक्षात घेऊन प्रभारी प्रांताधिकारी तथा तहसीलदार सचिन पाटील यांनी स्वतः प्रवेशद्वारावर येत ग्रामस्थांशी संवाद साधला. जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून पुढील निर्णय कळविण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. त्यानंतर सायंकाळी उशिरा जिल्हा परिषदेच्या लघुपाटबंधारे विभागाचे उपअभियंता वसंत मोहिते यांनी विभागाचा अहवाल घेऊन उपोषणस्थळी भेट दिली. त्यांनी उपस्थित ग्रामस्थांसमोर अहवालाचे वाचन केले.या अहवालानुसार पिंगुळी येथील पाझर तलाव नैसर्गिक नसून मानव निर्मित आहे. त्यामुळे तलावापासून २०० मीटर हवाई अंतराच्या क्षेत्रात बांधकाम करता येणार नसल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. यासंदर्भात विकासकाकडूनही अहवाल मागविण्यात आल्याची माहिती मोहिते यांनी दिली.दरम्यान, सोमवारी झालेल्या पाहणीमध्ये तलावातील विहिरीत पाणी उपसा करण्यासाठी तीन पंप आढळून आले होते. तसेच तलावापासून काही अंतरावर बोअरवेल असल्याचेही निदर्शनास आले होते. मात्र, या बाबींवर प्रशासन नेमकी कोणती कारवाई करणार, याबाबत उपअभियंता मोहिते यांच्याकडून स्पष्ट उत्तर मिळू शकले नाही. त्यामुळे ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली.यानंतर प्रभारी प्रांताधिकारी सचिन पाटील आणि भूमिअभिलेख विभागाचे गणेशकर यांनी आंदोलकांशी चर्चा केली. या चर्चेत तलावाच्या मोजणीच्या मुद्द्यावरून लघुपाटबंधारे विभाग आणि भूमिअभिलेख विभाग यांच्यात समन्वयाचा अभाव असल्याचे समोर आले. लघुपाटबंधारे विभागाने तलावाच्या जमिनीची मोजणी करण्यासाठी भूमिअभिलेख विभागाला चार वेळा पत्रव्यवहार केला असून, त्याबाबतच्या पोचपावत्याही उपलब्ध असल्याचे सांगण्यात आले. मात्र, संबंधित पत्रे आपल्याला मिळाली नसल्याचे गणेशकर यांनी स्पष्ट केले. यामुळे दोन शासकीय विभागांमधील समन्वयाच्या अभावाचा फटका ग्रामस्थांना बसत असल्याची भावना व्यक्त करत उपस्थितांनी संताप व्यक्त केला.यावेळी प्रभारी प्रांताधिकारी सचिन पाटील यांनी सांगितले की, पाझर तलावाबाबत ग्रामस्थांनी केलेल्या मागण्यांची प्रभारी प्रांताधिकारी म्हणून आपण दखल घेतली आहे. लघुपाटबंधारे विभाग आणि जिल्हा परिषदेचा प्रस्ताव बुधवारी सायंकाळी ६ वाजण्यापूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविण्यात येईल. हे प्रकरण अंतिम टप्प्यात असून, नैसर्गिक न्यायाच्या तत्त्वानुसार संबंधित दुसऱ्या पक्षालाही आपली बाजू मांडण्याची संधी देणे आवश्यक आहे. तलावाची मोजणी करण्यासाठी लवकरच कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन देत त्यांनी सडवे --- ## सिंधुदुर्ग ते नवी मुंबई विमानसेवा लवकरच सुरू होणार; आठवड्यातील सातही दिवस उड्डाणाची सुविधा - **URL**: https://jagrutmaharashtranews.com/news/sathhatharaga-ta-nava-mabii-vamanasava-lvakaraca-sanpr-hanaera-aathavadayatal-sataha-thavasa-udadanaeca-savathha - **Published**: 2026-11-04 05:00 - **Category**: प्रशासन - **Author**: दादा सारंग सिंधुदुर्ग प्रतिनिधी✍️ : चिपी विमानतळावरून नवी मुंबईसाठीची विमानसेवा लवकरच सुरू होणार असून, ही सेवा आठवड्यातील सातही दिवस उपलब्ध राहणार आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग आणि नवी मुंबईदरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे ही विमानसेवा सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक दीपक कपूर यांनी सोशल मीडियावरील ट्विटद्वारे या विमानसेवेची माहिती दिली आहे. त्यानुसार, नवी मुंबई आणि सिंधुदुर्गदरम्यान दररोज विमानाची फेरी होणार असून, त्याचे वेळापत्रकही जाहीर करण्यात आले आहे.या वेळापत्रकानुसार, नवी मुंबई येथून सकाळी ७.५५ वाजता विमानाचे उड्डाण होईल. हे विमान सकाळी ९.०५ वाजता सिंधुदुर्ग विमानतळावर दाखल होईल. त्यानंतर सिंधुदुर्ग येथून सकाळी ९.२५ वाजता विमान नवी मुंबईच्या दिशेने रवाना होऊन सकाळी १०.३५ वाजता नवी मुंबई विमानतळावर पोहोचेल.या नियमित विमानसेवेमुळे सिंधुदुर्ग आणि नवी मुंबईदरम्यान प्रवास करणाऱ्या नागरिकांना आठवड्याचे सातही दिवस हवाई प्रवासाचा पर्याय उपलब्ध होणार आहे. त्यामुळे प्रवासासाठी लागणारा वेळ वाचण्याबरोबरच प्रवाशांचा प्रवास अधिक आरामदायी आणि सोयीस्कर होणार आहे. याशिवाय जिल्ह्यातील पर्यटन व्यवसाय, व्यापार आणि उद्योग क्षेत्राला चालना मिळून सिंधुदुर्गच्या आर्थिक विकासालाही या विमानसेवेचा फायदा होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. --- ## कणकवली भाजपच्या दिवाळी बाजाराचे उत्साहात उद्घाटन; महिला बचत गटांना मिळाले हक्काचे व्यासपीठ - **URL**: https://jagrutmaharashtranews.com/news/kanaekaval-bhajapacaya-thavali-bjaraca-utasahata-uthaghatana-mahal-bcata-gatana-malil-hakakaca-vayasapatha - **Published**: 2026-11-04 04:45 - **Category**: राजकीय - **Author**: दादा सारंग कणकवली प्रतिनिधी✍️ : भारतीय जनता पार्टी, कणकवलीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या दिवाळी बाजाराचे उद्घाटन आज उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. भाजपचे माजी नगराध्यक्ष समीर नलावडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या पुढाकारातून सुरू झालेला हा उपक्रम गेल्या आठ वर्षांपासून सातत्याने राबविण्यात येत आहे.स्थानिक व्यावसायिकांना प्रोत्साहन देणे, तसेच महिला बचत गटांमधील महिलांना त्यांच्या कलागुणांचे प्रदर्शन करण्यासाठी आणि स्वतःच्या व्यवसायाला चालना देण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. या दिवाळी बाजारात महिलांनी स्वतःच्या कल्पकतेतून, मेहनतीतून आणि कौशल्यातून तयार केलेल्या विविध वस्तू विक्रीसाठी उपलब्ध करून दिल्या आहेत.या बाजाराच्या माध्यमातून स्थानिक छोटे व्यावसायिक, विक्रेते आणि महिला बचत गटांना ग्राहकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळत आहे. बाजारपेठेतील प्रत्येक व्यवहारातून स्थानिक अर्थव्यवस्थेला हातभार लागत असून, महिला सक्षमीकरण, स्वावलंबन आणि स्थानिक रोजगारनिर्मितीला प्रोत्साहन मिळत आहे. भविष्यात कणकवली भाजपचा हा दिवाळी बाजार सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या आर्थिक विकासासाठीही उपयुक्त ठरेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.या उद्घाटनप्रसंगी भाजपचे माजी कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे, भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अबीद नाईक, महिला जिल्हाध्यक्षा श्वेता कोरगावकर, नगरसेविका मेघा गांगण, सुप्रिया नलावडे, प्रतीक्षा सावंत, मेघा सावंत, मनस्वी ठाणेकर, आर्या राणे, गणेश ऊर्फ बंडू हर्णे, संजय कामतेकर, राकेश राणे, स्वप्निल ऊर्फ दादू राणे, कलमठ सरपंच संदीप मेस्त्री, बंडू गांगण, सागर राणे, पप्पू पुजारे, तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, शहराध्यक्ष अण्णा कोदे, गौतम खुडकर, समीर प्रभुगावकर, अभिषेक नाडकर्णी, लक्ष्मण घाडीगांवकर, अभय राणे, रंजन राणे, अमोल रासम, सभापती हर्षदा वाळके, जिल्हा परिषद सदस्या सुप्रिया मेस्त्री, सुप्रिया पाटील, शीतल दळवी आदी मान्यवर उपस्थित होते. --- ## वाघाची नखे, सुळे आणि बिबट्याची नखे विकणाऱ्या आंतरराज्यीय वन्यजीव तस्करी रॅकेटचा पर्दाफाश - **URL**: https://jagrutmaharashtranews.com/news/vaghaca-nakha-sali-aanae-bbtayaca-nakha-vakanaeriya-aatararajayaya-vanayajava-tasakara-rakataca-parathafasha - **Published**: 2026-11-03 17:38 - **Category**: प्रशासन - **Author**: दादा सारंग सावंतवाडी प्रतिनिधी✍️ : वन्यप्राण्यांच्या अवयवांची अवैध विक्री करणाऱ्या आंतरराज्यीय तस्करी रॅकेटचा सावंतवाडी वनविभागाने पर्दाफाश केला आहे. कुडाळ आणि वेंगुर्ले येथे सापळा रचून केलेल्या कारवाईत तीन संशयितांना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून वाघाचा सुळा, बिबट्याची नखे तसेच सोन्यामध्ये मढवलेले वन्यप्राण्यांचे सुळे जप्त करण्यात आले आहेत. वनपरिक्षेत्र अधिकारी कुडाळ यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली.अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे रोहिदास हरिश्चंद्र कामत (वय ४८, रा. कामतवाडी, वायंगणी, ता. वेंगुर्ला), विजय रविकांत शिंदे (वय ३१, रा. मुळदे, ता. कुडाळ) आणि मुनाफ इस्माईल मुकादम (वय ४०, रा. अनपूर, विजयदुर्ग, ता. देवगड) अशी आहेत. यातील रोहिदास कामत हा महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या वेंगुर्ला बसस्थानकात शिपाई म्हणून कार्यरत असल्याची माहिती वनविभागाने दिली.वनविभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, मुख्य संशयित रोहिदास कामत याने पैशांच्या लोभापोटी वन्यप्राण्यांचे अवशेष विक्री करण्याचा प्रयत्न केला होता. याची माहिती मिळाल्यानंतर वनाधिकाऱ्यांनी बनावट ग्राहकाच्या माध्यमातून सापळा रचला. सुरुवातीला आरोपीने वेंगुर्ला बसस्थानक येथे भेटण्यास बोलावून १२ वाघनखांच्या विक्रीसाठी अडीच लाख रुपयांचा व्यवहार निश्चित केला होता.त्यानंतर कुडाळ बसस्थानकातील काळप नाका परिसरात वाघनखे दाखविण्याचे ठरले. रोहिदास कामत याने आपल्या साथीदारांमार्फत हा मुद्देमाल दाखविण्याची व्यवस्था केली. याच वेळी दबा धरून बसलेल्या वनविभागाच्या पथकाने कुडाळ बस डेपोच्या प्रवेशद्वारावर तिघांनाही रंगेहात पकडले.संशयितांची अंगझडती घेतली असता, वाघाचा पाच सेंटीमीटर लांबीचा एक सुळादात, बिबट्याची प्रत्येकी चार सेंटीमीटर लांबीची दोन नखे आणि सोन्यामध्ये मढवलेले दोन सेंटीमीटर लांबीचे वन्यप्राण्यांचे दोन सुळेदात असा मुद्देमाल आढळून आला. हा मुद्देमाल वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ अंतर्गत अनुसूची एकमध्ये संरक्षित असलेल्या वन्यप्राण्यांशी संबंधित असून, त्यांची शिकार करून अवशेष मृगयाचिन्हांच्या स्वरूपात विक्रीसाठी बाळगल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.या प्रकरणी वनपाल नेरूर तर्फ हवेली यांनी गुन्हा दाखल केला आहे. तिन्ही संशयितांना अटक करून प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी, कुडाळ यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने आरोपी क्रमांक एक व दोन यांना दोन दिवसांची वन कोठडी, तर तिसऱ्या आरोपीला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.ही कारवाई उपवनसंरक्षक मिलीश शर्मा आणि अतिरिक्त कार्यभार सांभाळणारे उपवनसंरक्षक किरण जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच डॉ. सुनील लाड यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. यामध्ये कुडाळचे वनपरिक्षेत्र अधिकारी चेतन पाटील, वनपाल संजय हजारे, सूर्यकांत सावंत, पोलीस हवालदार गौरेश राणे, वनरक्षक अतुल खोत, ब्रह्मकुमार भोजने, अनिकेत माने, समीर खरवत, प्रवीण कमळकर आणि वाहनचालक राहुल मयेकर यांनी सहभाग घेतला.गोवा आणि कर्नाटक राज्यांच्या सीमेला लागून असलेला सिंधुदुर्ग जिल्हा पश्चिम घाटाच्या जैवविविधतेने समृद्ध असून, विविध व्याघ्र प्रकल्पांना जोडणारा महत्त्वाचा वन्यजीव कॉरिडॉर आहे. त्यामुळे वन्यप्राण्यांची शिकार आणि त्यांच्या अवयवांच्या तस्करीला आळा घालण्यासाठी सावंतवाडी वनविभागाने विशेष मोहीम अधिक तीव्र केली आहे. वन्यप्राण्यांची शिकार किंवा अवयवांच्या तस्करीसंदर्भात कोणतीही माहिती नागरिकांकडे असल्यास त्यांनी वनविभागाला कळवावी. माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल, असे आ --- ## ऐतिहासिक मोती तलावाच्या काठावर १० नोव्हेंबरला भव्य दीपोत्सव; अभिनव फाउंडेशनचा उपक्रम - **URL**: https://jagrutmaharashtranews.com/news/aitahasaka-mata-talvacaya-kathavara-navahabral-bhavaya-thapatasava-abhanava-faudashanaca-upakarama - **Published**: 2026-11-03 16:58 - **Category**: सामाजिक - **Author**: दादा सारंग सावंतवाडी प्रतिनिधी✍️ : दीपावलीच्या सणाचा आनंद अधिक द्विगुणित करण्यासाठी अभिनव फाउंडेशन, सिंधुदुर्ग यांच्या वतीने सावंतवाडीतील ऐतिहासिक मोती तलावाच्या काठावर भव्य दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवार, १० नोव्हेंबर २०२६ रोजी सायंकाळी ७ वाजता या दीपोत्सवाचा शुभारंभ होणार असून, दिव्यांच्या लखलखत्या प्रकाशात मोती तलावाचा परिसर उजळून निघणार आहे.या दीपोत्सवाचे खास आकर्षण म्हणजे नागरिकांसाठी तयार करण्यात येणारा ‘दीपावली शुभेच्छा सेल्फी पॉईंट’. या माध्यमातून नागरिकांना दीपावलीच्या आनंददायी क्षणांची छायाचित्रे काढून आठवणी जतन करता येणार आहेत. तसेच या सोहळ्याला सांस्कृतिक कार्यक्रमांचीही जोड देण्यात आली असून, विविध मनोरंजक कार्यक्रमांचा आनंद उपस्थितांना घेता येणार आहे.सावंतवाडीच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वैभवाचे प्रतीक असलेल्या मोती तलावाच्या काठावर आयोजित करण्यात आलेला हा दीपोत्सव शहराच्या सौंदर्यात आणखी भर घालणार आहे. असंख्य दिव्यांच्या प्रकाशाने उजळलेला तलाव परिसर आणि त्याला लाभलेली सांस्कृतिक कार्यक्रमांची साथ यामुळे हा सोहळा विशेष आकर्षण ठरणार आहे.दीपावलीच्या निमित्ताने आयोजित या अनोख्या उपक्रमात सावंतवाडी शहरासह परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे आणि दीपोत्सवाचा आनंद घ्यावा, असे आवाहन अभिनव फाउंडेशन, सिंधुदुर्ग यांच्या वतीने करण्यात आले आहे.प्रकाशाचा उत्सव, सांस्कृतिक परंपरेचा जागर आणि ऐतिहासिक मोती तलावाचे नयनरम्य सौंदर्य यांचा सुरेख संगम अनुभवण्याची संधी या दीपोत्सवाच्या माध्यमातून सावंताडीकरांना मिळणार आहे. --- ## पिंपरी-चिंचवड पोलीस दलाच्या विविध विकास प्रकल्पांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन व लोकार्पण - **URL**: https://jagrutmaharashtranews.com/news/papara-cacavada-palsa-thalcaya-vavathha-vakasa-parakalpaca-makhayamatara-thavathara-fadanaevasa-yacaya-hasata-uthaghatana-va-lkarapanae - **Published**: 2026-11-03 16:52 - **Category**: प्रशासन - **Author**: दादा सारंग पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी✍️ : पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या विविध विकास प्रकल्पांचा शुभारंभ, उद्घाटन आणि लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, गृह राज्यमंत्री योगेश कदम, नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ, पिंपरी-चिंचवडचे महापौर रवी लांडगे, पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे, खासदार श्रीरंग बारणे आणि पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.पिंपरी-चिंचवड पोलीस दलाने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, विविध सामाजिक उपक्रम आणि जलद तपासाच्या माध्यमातून गुन्हे नियंत्रणात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. आगामी काळात पिंपरी-चिंचवड शहराचा विस्तार पुण्यापेक्षाही अधिक होण्याची शक्यता असल्याने भविष्यातील आव्हानांचा विचार करून पोलीस दलाने आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने गुन्हे नियंत्रण अधिक प्रभावी करावे आणि या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी सज्ज राहावे, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.युवाशक्तीला योग्य दिशा देण्यासाठी अमली पदार्थांविरोधात व्यापक जनजागृती आणि ठोस प्रयत्न होणे आवश्यक आहेत. त्यासाठी घर, परिसर, गाव, जिल्हा आणि संपूर्ण महाराष्ट्र अमली पदार्थमुक्त करण्याचा संकल्प प्रत्येकाने करावा, असेही मुख्यमंत्री म्हणाले.यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी, नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी पोलीस दलाला आवश्यक त्या सुविधा उपलब्ध असणे महत्त्वाचे असल्याचे सांगितले. पिंपरी-चिंचवड पोलीस दलाला देण्यात आलेल्या अत्याधुनिक सुविधा गुन्हे नियंत्रणासोबतच वाहतूक व्यवस्थापनासाठीही उपयुक्त ठरतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. नागरिकांच्या सुरक्षेसाठी अहोरात्र कार्यरत असलेल्या पोलिसांना हक्काची घरे आणि आवश्यक सुविधा मिळाव्यात, यासाठी शासनाकडून विविध स्तरांवर प्रयत्न सुरू असून त्यासाठी कालबद्ध कार्यक्रम निश्चित करण्यात आल्याचेही त्यांनी नमूद केले.उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी पिंपरी-चिंचवड शहराच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने तसेच पोलीस दलाच्या आधुनिकीकरणासाठी हा महत्त्वाचा दिवस असल्याचे सांगितले. उद्घाटन आणि भूमिपूजन झालेल्या विविध विकास प्रकल्पांमुळे शहराच्या सुरक्षित भविष्याचा मजबूत पाया घातला जात आहे. स्वर्गीय अजित पवार यांनी पोलीस आयुक्तालयाच्या इमारतीसाठी १८० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता. या निधीच्या माध्यमातून स्वतंत्र आणि आधुनिक पोलीस मुख्यालय उभारण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण वाटचाल होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.या विविध प्रकल्पांच्या माध्यमातून पिंपरी-चिंचवड पोलीस दलाचे आधुनिकीकरण, गुन्हे नियंत्रण, वाहतूक नियमन आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी आवश्यक पायाभूत सुविधा अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्यात येत आहेत. --- ## महिला उद्योजिकांचा गौरव; स्वावलंबनाचा संदेश - **URL**: https://jagrutmaharashtranews.com/news/mahal-uthayajakaca-garava-savavalbnaca-sathasha - **Published**: 2026-11-03 15:08 - **Category**: सामाजिक - **Author**: दादा सारंग वेंगुर्ला प्रतिनिधी✍️: महिलांनी विविध क्षेत्रांत स्वतःचा व्यवसाय उभा करून आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी व्हावे आणि आपल्या कार्यातून इतरांनाही रोजगाराच्या संधी उपलब्ध करून द्याव्यात, या उद्देशाने इनरव्हील क्लब ऑफ वेंगुर्ला आणि लक्ष्मी आधार सेवा फाउंडेशन, वेंगुर्ला यांच्या संयुक्त विद्यमाने महिला उद्योजिकांचा सन्मान करण्यात आला.या उपक्रमात स्थानिक पातळीवर विविध व्यवसायांच्या माध्यमातून आपली स्वतंत्र ओळख निर्माण करणाऱ्या १२ महिला उद्योजिकांचा मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. प्रणया भोसले, स्मिता कासले, भाग्यलक्ष्मी घारे, ज्योती देसाई, सीमा नाईक, सुजाता संदीप देसाई, अक्षता साळगावकर, करिष्मा सोसुरकर, सारिका काळसेकर, सीमा मराठे, प्रणाली अंधारी आणि अस्मिता कुंभार यांचा यावेळी सन्मान करण्यात आला. वेदिका विशाल परब आणि संध्या तेरसे यांच्या हस्ते संबंधित महिला उद्योजिकांना मानपत्र प्रदान करण्यात आले.महिलांनी केवळ नोकरीच्या संधींच्या प्रतीक्षेत न राहता स्वतःच्या व्यवसायाची सुरुवात करून आत्मनिर्भर होण्याची गरज आहे. त्याचबरोबर स्वतःच्या व्यवसायाचा विस्तार करताना इतर महिलांसह स्थानिक नागरिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचा दृष्टिकोनही महत्त्वाचा असल्याचे या उपक्रमातून अधोरेखित करण्यात आले.विविध क्षेत्रांत व्यवसाय उभारून जिद्द, मेहनत आणि सातत्याच्या जोरावर आपली ओळख निर्माण करणाऱ्या महिला उद्योजिकांच्या कार्याचे यावेळी कौतुक करण्यात आले. त्यांच्या व्यावसायिक वाटचालीला प्रोत्साहन देण्यासाठी आयोजित करण्यात आलेला हा सन्मान सोहळा उपस्थितांसाठी प्रेरणादायी ठरला.कार्यक्रमाला लक्ष्मी आधार सेवा फाउंडेशनच्या अध्यक्षा ज्योती देसाई, सचिव वृंदा गवंडळकर, खजिनदार डॉ. दिपाली देसाई, सदस्य शुभदा नवार, आकांक्षा परब, काजल गिरप आणि दिपाली अभ्यंकर उपस्थित होत्या.तसेच इनरव्हील क्लब ऑफ वेंगुर्लाच्या सचिव श्रीया परब, उपाध्यक्ष सई चव्हाण, आरती गिरप, रसिका मठकर, ॲड. अनुराधा वेर्णेकर, वैभवी दाभोलकर आणि हर्षदा शिरसाट यांची उपस्थिती होती.महिला उद्योजिकांच्या कर्तृत्वाचा गौरव करत त्यांच्या पुढील वाटचालीस प्रोत्साहन देणारा हा उपक्रम महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरला. --- ## पिंगुळी पाझर तलाव उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी राजकीय आरोप-प्रत्यारोपांना वेग! - **URL**: https://jagrutmaharashtranews.com/news/pagali-pajhara-talva-upashhanaecaya-thasariya-thavasha-rajakaya-aarapa-paratayarapana-vaga - **Published**: 2026-11-03 15:01 - **Category**: राजकीय - **Author**: दादा सारंग कुडाळ प्रतिनिधी✍️ : पिंगुळी येथील पाझर तलावाच्या संरक्षणासाठी सुरू असलेल्या बेमुदत उपोषणाचा आज दुसरा दिवस होता. जिल्हा परिषद सदस्य गंगाराम सडवेलकर यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या या आंदोलनाला ग्रामस्थांचा वाढता पाठिंबा मिळत असतानाच, तलावाशेजारी प्रस्तावित बंगला प्रकल्पावरून आमदार निलेश राणे आणि सडवेलकर यांच्यातील राजकीय संघर्ष अधिक तीव्र झाला आहे. एकमेकांवर आर्थिक तडजोडीचे आरोप करत दोघांनीही पिंगुळी ग्रामदेवतेसमोर येऊन देवावरचे फूल उचलण्याचे आव्हान दिल्याने या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे.पिंगुळी पाझर तलावाचे अस्तित्व धोक्यात येण्याची तसेच तलावातील पाणी दूषित होण्याची शक्यता व्यक्त करत ग्रामस्थांनी प्रस्तावित बंगला प्रकल्पाला विरोध केला आहे. याच पार्श्वभूमीवर सोमवारपासून गंगाराम सडवेलकर यांच्या नेतृत्वाखाली बेमुदत उपोषण सुरू करण्यात आले आहे. उपोषणाच्या दुसऱ्या दिवशीही ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आंदोलनाला पाठिंबा दर्शवला. यावेळी संजय वेतुरेकर आणि हेमंत देशपांडे यांनी उपोषणकर्त्यांना मार्गदर्शन केले. तलावाच्या रक्षणासाठी ग्रामस्थांनी पक्षभेद विसरून एकजुटीने लढा देण्याचे आवाहन करण्यात आले.दरम्यान, आमदार निलेश राणे यांनी व्हिडिओच्या माध्यमातून माजी आमदार वैभव नाईक यांच्यावर टीका केली. तसेच जिल्हा परिषद सदस्य गंगाराम सडवेलकर यांच्यावर गंभीर आरोप करत, संबंधित बंगला प्रकल्पाच्या विकासकासोबत जिल्हा परिषद निवडणुकीपूर्वी, निवडणुकीदरम्यान आणि निवडणुकीनंतर आर्थिक तडजोड केल्याचा दावा केला. आपले आरोप खोटे असतील तर सडवेलकर यांनी पिंगुळी ग्रामदेवतेसमोर येऊन देवावरचे फूल उचलून सत्य स्पष्ट करावे, असे आव्हान राणे यांनी दिले.आमदार राणे यांच्या आरोपांना गंगाराम सडवेलकर यांनीही व्हिडिओद्वारे प्रत्युत्तर दिले. आर्थिक तडजोडीचे आरोप फेटाळून लावत त्यांनी उलट प्रस्तावित बंगला प्रकल्पामध्ये राणे परिवाराचीच आर्थिक भागीदारी असल्याचा आरोप केला. आपला आरोप खोटा असल्याचे सिद्ध करण्यासाठी आमदार निलेश राणे यांनीही पिंगुळी ग्रामदेवतेसमोर येऊन देवावरचे फूल उचलावे, असे प्रतिआव्हान सडवेलकर यांनी दिले.या आंदोलनाला माजी आमदार वैभव नाईक, अमित सामंत, धीरज परब, अभय शिरसाट यांच्यासह पिंगुळीतील ग्रामस्थ, सर्वपक्षीय पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी उपस्थित राहून पाठिंबा दिला.एकीकडे पिंगुळी पाझर तलावाच्या अस्तित्वाचा प्रश्न ऐरणीवर आला असताना दुसरीकडे या विषयाला राजकीय आरोप-प्रत्यारोपांची किनार लाभली आहे. आर्थिक भागीदारीच्या आरोपांवरून दोन्ही नेत्यांमध्ये सुरू झालेल्या आव्हान-प्रतिआव्हानामुळे पिंगुळीतील वातावरण चांगलेच तापले असून, या संपूर्ण प्रकरणाकडे आता कुडाळ तालुक्याचे लक्ष लागले आहे. --- ## लोकशाहीच्या रक्षणासाठी नागरिकांनी जागरूक राहणे गरजेचे! – पालकमंत्री नितेश राणे - **URL**: https://jagrutmaharashtranews.com/news/lkashahacaya-rakashhanaesatha-nagarakana-jaganprka-rahanae-garajaca-palkamatara-natasha-ranae - **Published**: 2026-11-03 14:53 - **Category**: राजकीय - **Author**: दादा सारंग कणकवली प्रतिनिधी✍️: देशाची अंतर्गत सुरक्षा, बांगलादेशी व रोहिंग्या घुसखोरांचा प्रश्न, मतदार यादी शुद्धीकरणाची SIR प्रक्रिया आणि लोकशाही संस्थांचे संरक्षण या महत्त्वपूर्ण विषयांवर सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. कणकवली तालुक्यातील जानवली येथील हॉटेल निलम कंट्री साईड येथे आयोजित ‘राष्ट्र चिंतन संवाद’ कार्यक्रमात ‘लोकशाही वाचवा, अराजकता हटवा’ या विषयावर ते बोलत होते.यावेळी बोलताना मंत्री राणे यांनी बेकायदा घुसखोरीचा मुद्दा राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत गंभीर असल्याचे सांगितले. बनावट कागदपत्रांच्या आधारे देशात वास्तव्य करणे तसेच अशा व्यक्तींची नावे मतदार यादीत समाविष्ट होण्याचे प्रकार रोखणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. मतदार यादीच्या शुद्धीकरणासाठी राबविण्यात येणाऱ्या SIR प्रक्रियेमुळे दुबार, चुकीच्या आणि अपात्र नोंदींची पडताळणी होण्यास मदत होईल. परिणामी पात्र भारतीय नागरिकांचा मतदानाचा अधिकार अधिक सुरक्षित राहील, असे त्यांनी स्पष्ट केले.पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली देशाच्या सुरक्षेसाठी सुरू असलेल्या प्रयत्नांचाही त्यांनी उल्लेख केला. बेकायदा घुसखोरांच्या विरोधात ‘डिटेक्ट, डिलीट, डिपोर्ट’ ही भूमिका महत्त्वाची असल्याचे सांगत देशाच्या सुरक्षेशी कोणतीही तडजोड होता कामा नये, असे मत त्यांनी व्यक्त केले.लोकशाही व्यवस्थेमध्ये सरकार बदलण्याचा अधिकार हा जनतेचा असल्याचे सांगतानाच लोकशाही संस्थांबाबत जाणीवपूर्वक अविश्वास निर्माण करून अराजकता पसरविण्याचे प्रयत्न चिंताजनक असल्याचे राणे म्हणाले. देशाच्या भवितव्याचा विचार करताना राजकीय पक्षांच्या पलीकडे जाऊन प्रत्येकाने प्रथम भारतीय नागरिक म्हणून विचार करण्याची आवश्यकता आहे. देशाची सुरक्षा आणि लोकशाहीचे संरक्षण ही केवळ सरकारची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाने त्यासाठी जागरूक राहिले पाहिजे, असे आवाहनही त्यांनी केले.या कार्यक्रमाला माजी आमदार अजित गोगटे, भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, डॉ. मिलिंद कुलकर्णी, महिला मोर्चा अध्यक्षा श्वेता कोरगावकर, भाजप सरचिटणीस संदीप साटम, तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, सुषमा प्रभूखानोलकर यांच्यासह जिल्ह्यातील विविध क्षेत्रांतील बुद्धिजीवी, मान्यवर आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. --- ## पंडित दीनदयाळ उपाध्याय स्वयंम योजनेसाठी १३ नोव्हेंबरपर्यंत ऑफलाईन अर्ज करता येणार - **URL**: https://jagrutmaharashtranews.com/news/padata-thanathayali-upathhayaya-savayama-yajanasatha-navahabraparayata-oifaliina-araja-karata-yanaera - **Published**: 2026-11-03 13:12 - **Category**: प्रशासन - **Author**: दादा सारंग सिंधुदुर्गनगरी प्रतिनिधी✍️ : इतर मागासवर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील धनगर समाजाच्या उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षात ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय स्वयंम योजना’ राबविण्यात येणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र विद्यार्थ्यांना १३ नोव्हेंबर २०२६ पर्यंत ऑफलाईन पद्धतीने अर्ज सादर करता येणार आहेत.या योजनेंतर्गत विमुक्त जाती व भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील (NT-C) बारावीनंतर पदवी, पदव्युत्तर, व्यावसायिक आणि बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेतलेल्या विद्यमान विद्यार्थ्यांना लाभ दिला जाणार आहे. सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षासाठी अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली असून, ऑनलाईन पोर्टल सुरळीत होईपर्यंत विद्यार्थ्यांना ऑफलाईन पद्धतीने अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.त्यानुसार योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या पात्र विद्यार्थ्यांनी आपले अर्ज १३ नोव्हेंबर २०२६ पर्यंत सहायक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण कार्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, सिंधुदुर्गनगरी, ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग येथे जमा करावेत.जिल्ह्यातील संबंधित पात्र विद्यार्थ्यांनी अंतिम मुदतीची वाट न पाहता विहित कालावधीत अर्ज सादर करून योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे सहायक संचालक उदयसिंह गायकवाड यांनी केले आहे.